बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्था, कुंभारगाव यांच्या वतीने सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे कुंभारगाव व पंचक्रोशी परिसरात घरोघरी वाटप.

जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्था, कुंभारगाव यांच्या वतीने सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे कुंभारगाव व पंचक्रोशी परिसरात घरोघरी वाटप.

कुंभारगाव | दि. ३१ डिसेंबर २०२५

जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्थेच्या सभासदांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी अत्यंत आकर्षक व उपयुक्त अशी दिनदर्शिका प्रकाशित केली असून, या दिनदर्शिकेला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या दिनदर्शिकेत विभागातील उसत्व यात्रा, विविध धार्मिक व सांस्कृतिक यात्रा, महत्त्वाचे सण-उत्सव, तिथी-वार, तसेच सामाजिक उपक्रमांची सविस्तर व अचूक माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांद्वारे परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. दिनदर्शिका वाटपाचा उपक्रम हा केवळ माहितीपुरता मर्यादित न राहता, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

या दिनदर्शिकेच्या निर्मिती व वाटपासाठी संस्थेचे सर्व सभासद, पदाधिकारी, हितचिंतक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच पुढील काळातही अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सर्वांनी संस्थेला साथ द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्था, कुंभारगाव यांचा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा व प्रेरणादायी ठरत असून, येणाऱ्या वर्षातही संस्थेकडून विविध लोकहिताचे उपक्रम राबवले जातील, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

घणसोली प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार श्री. संजय किसन सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल.


घणसोली प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार श्री. संजय किसन सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून घणसोली  प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार श्री. संजय किसन सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला आहे. हा अर्ज युवा नेते संजय आंबुळकर (बापू)युवा उद्योजक बाबा शेठ बोत्रे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. “राजकारण नव्हे तर प्रामाणिक जनसेवा” हे ध्येय समोर ठेवून श्री. संजय किसन सावंत यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.

घणसोली प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला व युवकांच्या समस्या या सर्व मुद्द्यांवर ठोस आणि वेळेत उपाययोजना करण्याचा विश्वास संजय सावंत यांनी यावेळी  नागरिकांना दिला. स्थानिक पातळीवर विकासकामांमध्ये पारदर्शकता, नागरिकांचा थेट सहभाग आणि प्रशासनावर जबाबदारीची पकड ठेवणे हे आपल्या कार्यपद्धतीचे मुख्य सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते संजय आंबुळकर (बापू) म्हणाले, “नवी मुंबईच्या विकासासाठी स्वच्छ प्रतिमा व जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे. श्री. संजय सावंत हे प्रभागातील प्रत्येक घटकाचा आवाज बनतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
तर युवा उद्योजक बाबा शेठ बोत्रे यांनी, “समाजासाठी काम करण्याची तळमळ आणि विकासाची दृष्टी असलेले उमेदवार पुढे यावेत, यासाठीच आम्ही संजय सावंत पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असे सांगितले.

अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग ९ ‘ड’ मधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असून, स्थानिक प्रश्नांवर थेट काम करणाऱ्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासावर उभ्या राहिलेल्या श्री. संजय किसन सावंत यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. आगामी प्रचारात विकास, पारदर्शकता व जनसेवा हेच केंद्रबिंदू असणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

पाटण - ग्रामीण प्रतिभेची राष्ट्रीय पातळीवर भरारी; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कु. वृषाली पवार कथाकथन करणार.

ग्रामीण प्रतिभेची राष्ट्रीय पातळीवर भरारी; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कु. वृषाली पवार कथाकथन करणार
कोयना एज्युकेशन सोसायटी, पाटण संचलित मोरणा विद्यालय व शामराव दाजीराव देशमुख ज्युनिअर कॉलेज, मोरगिरी येथील विद्यार्थिनी असलेल्या कु. वृषाली पवार हिने आपल्या वक्तृत्वकलेच्या आणि कथाकथनातील प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर ही मानाची संधी मिळवली आहे. सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन या स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनीला अशा प्रतिष्ठित राष्ट्रीय पातळीवरील साहित्यिक व्यासपीठावर सहभागी होता येत असल्याने ही बाब विशेष कौतुकास्पद मानली जात आहे. कु. वृषाली पवार हिच्या यशामागे तिची मेहनत, सातत्य, वाचनाची आवड तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विविध वक्तृत्व व साहित्यिक उपक्रमांमध्ये तिने यापूर्वीही उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्याचाच परिपाक म्हणून तिला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या मोठ्या मंचावर कथाकथन करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, सहाध्यायी तसेच पालकांनी कु. वृषाली पवार हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिभा सादर करता येते, हे तिच्या यशामुळे अधोरेखित झाले असून, तिची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

शेंडेवाडी - मारुती सीताराम मोरे (तात्या) यांचे दुःखद निधन.

मारुती सीताराम मोरे (तात्या)  यांचे दुःखद निधन.

शेंडेवाडी (कुंभारगाव), ता. पाटण येथील ज्येष्ठ नागरिक मारुती सीताराम मोरे (तात्या) यांचे सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने शेंडेवाडी व परिसरात शोककळा पसरली आहे.

मारुती मोरे हे गावात प्रेमाने ‘तात्या’ या नावाने ओळखले जात होते. अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ व समाजाभिमुख स्वभाव ही त्यांची ओळख होती. गावातील विविध सार्वजनिक, सामाजिक व सामुदायिक कामांमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहत असत. कोणतेही सामाजिक कार्य असो किंवा गावातील अडचणी — तात्या नेहमी पुढाकार घेऊन मदतीसाठी उभे राहत, त्यामुळे ते सर्वांच्या जिव्हाळ्याचे बनले होते.

त्यांच्या साधेपणामुळे, प्रामाणिकपणामुळे व सहकार्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये त्यांना विशेष मान-सन्मान होता. तरुण पिढीसाठी ते मार्गदर्शक तर ज्येष्ठांसाठी विश्वासू सहकारी होते.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखद प्रसंगी, मोरे कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो व दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

रक्षाविसर्जन विधी उद्या 31 डिसेंबर 2025 रोजी वैकुंठधाम शेंडेवाडी कुंभारगाव तालुका पाटण येथे सकाळी नऊ वाजता होईल.

जनसहकार पतसंस्थेच्या नूतन २०२६ दिनदर्शिकेचे तळमावले येथे भव्य प्रकाशन

तळमावले | प्रतिनिधी जनसहकार पतसंस्थेच्या नूतन २०२६ दिनदर्शिकेचे तळमावले येथे भव्य प्रकाशन
आज मंगळवार दि. ३०/१२/२०२५ रोजी जनसहकार पतसंस्थेच्या नूतन 2️⃣0️⃣2️⃣6️⃣ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा तळमावले येथे उत्साहात पार पडला. संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या या सोहळ्याला मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. या शुभप्रसंगी संस्थेचे संस्थापक/चेअरमन मा. श्री. मारुती मोळावडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विलास गोडांबे शेठ (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पाटण)उपस्थित होते. तसेच व्हाइस चेअरमन मा. श्री. अमोल मोरे, संचालक ा. श्री. प्रशांत पोतदार शेठ, मा. श्री. आनंदा माने शेठ, मा. श्री. मिलिंद ताईंगडे शेठ, मा. श्री. सुनिल आडावकर शेठ, मा. श्री. संदीप टोळे शेठ आदींची उपस्थिती होती. याशिवाय संस्थेचे सल्लागार ा. श्री. विकास मोरे शेठ, मा. डॉ. श्री. संदीप मोहिते सर, श्री. उमेश काळे शेठ, मा. श्री. सतीश सागावकर शेठ, मा. श्री. जयवंत दिंडे शेठ, व्यापारी मा. श्री. तानाजी माने शेठ श्री. नागेश शिद्रुक दादा, मा. श्री. विपुल ताईंगडे, मा. श्री. महेश करपे तसेच सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मान्यवरांनी संस्थेच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. जनसामान्यांच्या आर्थिक गरजांना तत्पर व पारदर्शक सेवा देत संस्थेने विश्वासार्हतेची परंपरा जपली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नव्या वर्षात सभासद, ठेवीदार व ग्राहकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद व उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. उत्साही वातावरणात हा प्रकाशन सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

🔥 मानखुर्द वॉर्ड 143 : रचना गवस उमेदवारीनं राजकीय समीकरणं ढवळली – खरी लढत आता सुरू!

मानखुर्द वॉर्ड 143 : रचना गवस उमेदवारीनं राजकीय समीकरणं ढवळली – खरी लढत आता सुरू!

मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १४३ (मानखुर्द) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांनी कु. रचना रवींद्र गवस यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करताच, या वॉर्डमधील राजकारणाला अचानक वेग आला आहे. आतापर्यंत तुलनेने शांत वाटणारा हा वॉर्ड आता राजकीय रणांगण बनण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत.


🟡 राष्ट्रवादी (अजित पवार गट) : आखलेली रणनीती, ठरवलेला चेहरा

माजी मंत्री नवाब मलिक आणि अणुशक्ती नगरच्या विद्यमान आमदार सना मलिक यांच्या नेतृत्वाखाली रचना गवस यांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने वॉर्ड १४३ मध्ये पहिली ठोस चाल टाकली आहे.
रचना गवस यांचे वडील रवींद्र गवस हे मनसेचे माजी विभागप्रमुख. अलीकडेच त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता.

गवस यांची स्थानिक ओळख, संघटनात्मक अनुभव आणि मलिक गटाची ताकद यामुळे राष्ट्रवादीने सुरुवातीलाच आपली भूमिका आक्रमक ठेवली आहे.

🟠 विरोधक अजूनही संभ्रमात

या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणजे —

  • शिवसेना (UBT) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना - राष्ट्रवादी (SP)
  • काँग्रेस - वंचित 
  • शिवसेना शिंदे गट – भाजप महायुती

 या  आघाड्यांकडून अजून एकही अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही.

यामुळे राष्ट्रवादीला मानसिक आघाडी मिळाली असून, “आम्ही मैदानात, बाकी अजून बैठकीत” अशी स्थिती तयार झाली आहे.


🟧 महायुतीत अंतर्गत स्पर्धा, उमेदवारीवर ताण

महायुतीच्या वाटपानुसार वॉर्ड क्रमांक १४३ शिवसेना शिंदे गट लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. मात्र, याच ठिकाणी उमेदवारीसाठी मोठी चुरस असल्याने नाव ठरवण्यात विलंब होत आहे.
कोण टिकणार आणि कोण बाजूला पडणार, हे येत्या १–२ दिवसांत स्पष्ट होईल, असं चित्र आहे.

उशीर झाला, तर संघटनात्मक नुकसान होण्याची शक्यता महायुतीला नाकारता येत नाही.


🔵 UBT–मनसे : रस्सीखेच, पण निर्णय नाही

दुसरीकडे शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यात वॉर्ड १४३ साठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

कोण लढणार या प्रश्नांची उत्तरं अजून गुलदस्त्यातच असून, अधिकृत घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

🔮 पुढील ४८ तास निर्णायक

राजकीय जाणकारांच्या मते, येत्या एक-दोन दिवसांत:सर्व पक्षांचे उमेदवार स्पष्ट होतील,प्रचाराची दिशा ठरेल ,खरी निवडणूक रंगात येईल

सध्या मात्र एवढं नक्की की, रचना गवस यांच्या उमेदवारीने वॉर्ड १४३ मधील राजकीय खेळाची सुरुवात राष्ट्रवादीने आपल्या बाजूने करून घेतली आहे..

🔥 पाटण पंचायत समिती: देसाई विरुद्ध पाटणकर – ही निवडणूक सत्तेची नव्हे, तर अस्तित्वाची!

🔥 पाटण पंचायत समिती: देसाई विरुद्ध पाटणकर – ही निवडणूक सत्तेची नव्हे, तर अस्तित्वाची!

मिशन पंचायत समिती पाटण निवडणूक विश्लेषण भाग 1  -  श्री.प्रदीप विष्णु माने ( संपादक - साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज )

पाटण पंचायत समितीची येणारी निवडणूक ही नेहमीची स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत राहिलेली नाही. ती आता मंत्री शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर या दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांसाठी प्रतिष्ठेची, अस्तित्वाची आणि पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरवणारी निर्णायक लढाई बनली आहे.

⚔️ देसाईंसाठी “डू ऑर डाय”

राज्याचे पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर शंभूराज देसाई आज सत्तेच्या सर्वोच्च टप्प्यावर आहेत. अशा वेळी पाटण पंचायत समिती हातातून निसटली, तर त्यांच्या वाढत्या राजकीय वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उभं राहील.
म्हणूनच ही निवडणूक केवळ जिंकण्याची नाही, तर मोठ्या फरकाने जिंकून विरोधकांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याची आहे. यासाठीच देसाईंनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच तालुक्यात तळ ठोकून प्रशासन, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

🟧 पाटणकरांसाठी अखेरची संधी?

दुसरीकडे सत्यजित पाटणकर यांच्यासाठी ही लढाई राजकीय पुनरागमनाची अखेरची संधी ठरू शकते. मागील अपयशांची साखळी तोडायची असेल, तर पाटण पंचायत समिती जिंकण्यावाचून पर्याय नाही. भाजपसारखा सत्ताधारी पक्ष पाठीशी असल्यामुळे पाटणकर गट अधिक आक्रमक झाला आहे.
जर याही निवडणुकीत अपयश आलं, तर पाटणकर गट दीर्घकाळ राजकीयदृष्ट्या कोपऱ्यात फेकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

🧠 खरी लढाई गणितांची

या निवडणुकीत भावनिक मुद्द्यांपेक्षा गणित अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. पंचायत समितीचे १४ गण हे दोन्ही गटांसाठी रणांगण बनले आहेत.
दोन्ही बाजूंनी उमेदवार जवळपास निश्चित असून “तयारीला लागा” असे गुप्त संदेश गेले असल्याची चर्चा रंगत आहेत. यावरूनच हे स्पष्ट होतं की पडद्यामागची खेळी उघडपणे सुरू आहे.

🚩 पंचायत समिती > जिल्हा परिषद

यावेळी जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीवरच अधिक लक्ष केंद्रीत केलं गेलं आहे. कारण पंचायत समितीवरील सत्ता म्हणजे तालुक्यातील विकास निधी, प्रशासनावर पकड आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची मजबूत पायाभरणी. त्यामुळे ही लढत भविष्यातील विधानसभा राजकारणाची सेमीफायनल मानली जात आहे.

म्हणूनच पाटण पंचायत समितीची निवडणूक ही केवळ स्थानिक सत्ता बदलाची नाही, तर पाटण तालुक्याच्या पुढील १० वर्षांच्या राजकीय दिशेचा निर्णय घेणारी ठरणार आहे.
पाटणमध्ये आता लढाई सुरू झाली आहे – आणि ती शांततेत नव्हे, तर राजकीय रणसंग्रामात! 

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

महिंदमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा भव्य शुभारंभ!विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावाचा कायापालट!

महिंदमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा भव्य शुभारंभ!विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावाचा कायापालट!


महिंद (ता. पाटण) | साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी :
काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले (ता. पाटण, जि. सातारा) येथील शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रथम पुष्प उद्घाटन कार्यक्रम आज मौजे महिंद येथे मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या उद्घाटन कार्यक्रमासाठी मा. बापूसो सावंत सर (विकास समिती सदस्य, के.सी. कॉलेज तळमावले व उपाध्यक्ष, माजी विद्यार्थी मंडळ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. पांडुरंग नलवडे (व्हा. चेरअमन, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळी) यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे मॅडम होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते  प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व कॉलेजचा ‘झेप’ अंक देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे मा. बापूसो सावंत सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थी हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू असून राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्त्व विकासाची प्रभावी चळवळ आहे. NSS मुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, नेतृत्वगुण व सेवाभाव निर्माण होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

उद्घाटक मा. पांडुरंग नलवडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य “Not Me, But You” हे संपूर्ण आयुष्य समृद्ध करणारे असल्याचे सांगितले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव, ग्रामविकास, आरोग्य व साक्षरता अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य NSS च्या माध्यमातून घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

रा.से.यो.मुळे ग्रामविकासाचा इतिहास घडला – प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वांग खोऱ्यातील ग्रामपंचायतींचा कसा कायापालट झाला, याचा सविस्तर इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. NSS हे केवळ शिबिर नसून समाजाशी जोडणारी जीवनशाळा असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास श्री.शिवाजीराव शेवाळे (उपाध्यक्ष, लो. बा. दे. कामगार सोसायटी), श्री विकास गिरीगोसावी (माजी संचालक, लो. बा. दे. सह. साखर कारखाना, मरळी),श्री सुरेश सपकाळ (शिवसेना, पाटण उपतालुका प्रमुख),सौ. नंदा शेडगे (सरपंच, महिंद),
सौ. माया साळुंखे (सदस्य, महिंद ग्रामपंचायत),
श्री प्रवीण शेडगे (उपसरपंच, महिंद),
श्री प्रल्हाद साळुंखे (माजी चेअरमन),
श्री रमेश मोरे (सरपंच, साईकडे),श्री चंद्रकांत कदम,
प्रा. डॉ. संभाजी नाईक,प्रा. विलास शेंडगे,
प्रा. डॉ. दादासो जाधव,प्रा. चंद्रकांत पुटवाड,
प्रा. महेंद्र काजारी,तसेच गणेश सोनवले (शिपाई) आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महेश चव्हाण सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. ज्योती उर्फ मनिषा पाटील मॅडम यांनी केले.

या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून महिंद गावात विविध सामाजिक, स्वच्छता व विकासात्मक उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


🟢मा. श्री. संजय देसाईंकडून नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा.श्री.राजेंद्रसिंह यादव यांचा सत्कार.



🟢मा. श्री. संजय देसाईंकडून नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा.श्री.राजेंद्रसिंह यादव यांचा सत्कार.

कराड | प्रतिनिधी (साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज):
कराड नगरपरिषद निवडणुकीत जनतेतून थेट निवडून आलेले नवनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री राजेंद्रसिंह यादव मेहरबान तसेच नगरसेवक मा. श्री विजयसिंह (भाऊ) यादव यांची प्रचंड मतांनी झालेल्या विजयाबद्दल शनिवारी त्यांचा सन्मान करण्यात आला.

शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती तसेच विद्यमान जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  मा. श्री संजय देसाई साहेब यांनी दोघांची  भेट घेत बुके देऊन भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना संजय देसाई साहेब म्हणाले की, “कराड नगरपरिषदेत युवक नेतृत्वाला मिळालेली संधी ही शहराच्या विकासासाठी नवी दिशा देणारी आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या माध्यमातून कराडचा सर्वांगीण विकास घडेल, असा विश्वास आहे.”

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नागरिकांनी दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत, “कराड शहराच्या विकासासाठी पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल,” असे सांगितले. नगरसेवक विजयसिंह यादव यांनीही शहराच्या मूलभूत सुविधांवर भर देत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहण्याची ग्वाही दिली.

या भेटीदरम्यान शहरातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषद पंचायत समिती रणसंग्रामाची नांदी!ना. शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पाटण मतदार संघात उद्या संवाद मेळाव्यांचा झंझावात.



🟠 जिल्हा परिषद पंचायत समिती रणसंग्रामाची नांदी!ना. शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पाटणमध्ये उद्या संवाद मेळाव्यांचा झंझावात.

पाटण | प्रतिनिधी (साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज):

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये संवाद वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली गटस्तरीय संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या संवाद मेळाव्यांमधून स्थानिक नागरिकांच्या समस्या, अपेक्षा, विकासकामांचा आढावा तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील चार प्रमुख जिल्हा परिषद गटांमध्ये हे संवाद मेळावे आयोजित करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे.

या संवाद मेळाव्यांना
🔹 लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा)
🔹 मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रविराज देसाई (दादा)
यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

🗓️ रविवार, २८ डिसेंबर २०२५ – कार्यक्रमाचे वेळापत्रक

🔸 मल्हारपेठ जिल्हा परिषद गट
⏰ सकाळी ११.०० वाजता
📌 ग्रामपंचायत समोर, मल्हारपेठ

🔸 सुपने जिल्हा परिषद–पंचायत गट
⏰ दुपारी ०१.०० वाजता
📌 लक्ष्मीपुत्र मल्टीपर्पज हॉल, तांबवे फाटा

🔸 मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गट
⏰ दुपारी ०३.०० वाजता
📌 बाजारतळ, ढेबेवाडी

🔸 काळगाव जिल्हा परिषद गट
⏰ सायंकाळी ०५.०० वाजता
📌 बाजारतळ, तळमावले

या संवाद मेळाव्यांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत विकासकामांची दिशा ठरवली जाणार असून स्थानिक नेतृत्व, कार्यकर्ते व नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे.तरी संबंधित जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पाटण तालुक्यात नवी ताकद ! कार्यकारिणी जाहीर, श्री मधुकर नारायण पाटील (बापू) यांची तालुकाध्यक्षपदी निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पाटण तालुक्यात नवी ताकद! मधुकर पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड, कार्यकारिणी जाहीर
कराड | दि. २६ डिसेंबर (साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पाटण तालुक्याच्या संघटनात्मक बांधणीला आज नवी दिशा मिळाली. कराड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात पाटण तालुका कार्यकारिणी व विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी पाटण तालुक्यातील मौजे तारळे गावचे ज्येष्ठ नागरिक, अनुभवी सामाजिक कार्यकर्ते तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे माजी सदस्य श्री मधुकर नारायण पाटील (बापू) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पाटण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड राज्यसभेचे विद्यमान खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री नितीन काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (AP) चे ]अध्यक्ष मा. श्री बाळासाहेब सोळस्कर, कार्याध्यक्ष मा. श्री संजय देसाई साहेब, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. श्री विक्रमबाबा पाटणकर, मा. श्री राजेश पाटील आबा वाठारकर (माजी संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक), मा. श्री सादिक इनामदार (अल्पसंख्यांक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुतन तालुकाध्यक्ष मा. श्री मधुकर (बापू) पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा, शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा व संघटन कौशल्याचा पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या नियुक्त्यांमुळे पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक संघटित, बळकट व सक्रिय होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास खासदार श्री नितीन काका पाटील देसाई व्यक्त करण्यात येत आहे.

समाजसेवेचा वसा, विकासाचा ध्यास : ‘कोरठणचा राजा सामाजिक सेवा संस्था’ची भव्य दिनदर्शिका २०२६ प्रकाशित.



समाजसेवेचा वसा, विकासाचा ध्यास : ‘कोरठणचा राजा सामाजिक सेवा संस्था’ची भव्य दिनदर्शिका २०२६ प्रकाशित.


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज कामोठे | प्रतिनिधी श्री.वसंत भिकाजी पुंडे :
समाजसेवेचा अखंड ध्यास आणि ग्रामविकासाची ठाम ओढ घेऊन कार्यरत असलेल्या ‘कोरठणचा राजा सामाजिक सेवा संस्था’ यांच्या वतीने समस्त ग्रामस्थ पिंपळगावकरांसाठी नवीन वर्षाची खास भेट म्हणून भव्य दिनदर्शिका २०२६ प्रकाशित करण्यात आली.

श्री क्षेत्र कोरठण खंडेरायाच्या कृपा-आशीर्वादाने २५ डिसेंबर २०२५ रोजी कामोठे येथील शिव मंदिर व गणेश मंदिर या पवित्र स्थळी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या मंगलप्रसंगी संस्थेचे निष्ठावंत व सक्रिय सभासद तसेच माता-माय माऊली यांच्या  शुभहस्ते दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.

या दिनदर्शिकेमध्ये कोरठणचा राजा खंडेरायाचे दर्शन, धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व, सण-उत्सव, तिथी-वार, उपक्रमांची माहिती यांचा समावेश असून प्रत्येक घरात श्रद्धा, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा पोहोचवण्याचा संस्थेचा उद्देश आहे. ग्रामस्थांनी ही दिनदर्शिका आपल्या घरात लावून कुलदैवताचे रोज दर्शन घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवर, सभासद, माता-भगिनी तसेच ग्रामस्थांचे संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

तसेच दिनदर्शिकेच्या छपाईसाठी जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करणारे दाते, मार्गदर्शक तसेच छपाईपासून ते सर्वांपर्यंत दिनदर्शिका पोहोचवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे विशेष आभार संस्थेने मानले.

जाहीर आवाहन :- 
गावातील सर्व मुंबईकर ग्रामस्थ व पिंपळगाव परिसरातील नागरिकांना ही दिनदर्शिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

समाजसेवा, धार्मिक परंपरा आणि ग्रामविकास यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.


पाटण - बिबट्यांची दहशत संपणार? साताऱ्यात ‘हायटेक एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; २५ पिंजरे, अलार्म आणि संरक्षक चर खोदण्याचा निर्णय. - पालकमंत्री शंभूराज देसाई

पाटण - बिबट्यांची दहशत संपणार? साताऱ्यात ‘हायटेक एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; २५ पिंजरे, अलार्म आणि संरक्षक चर खोदण्याचा निर्णय

पाटण साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात बिबट्या व मानव यांच्यात वाढत चाललेला संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने बहुआयामी उपाययोजना हाती घेतल्या असून, येत्या काळात जिल्ह्यात हायटेक एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित अलार्म प्रणाली, २५ पेक्षा अधिक पिंजरे आणि संरक्षक चर (खंदक) उभारले जाणार आहेत. या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

ग्रामीण भागात बिबट्यांचा वाढता वावर आणि जनावरांवरील हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यासाठी २५ पिंजरे उपलब्ध करून दिले असून, त्यांचा वापर संवेदनशील गावांमध्ये केला जाणार आहे. यामुळे बिबट्यांचे सुरक्षित पकड कार्य सुलभ होऊन मानवी जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, शहरी व निमशहरी भागांमध्ये बिबट्यांची आगाऊ सूचना मिळावी यासाठी आवश्यक ठिकाणी एआय तंत्रज्ञानावर आधारित अलार्म बसवले जाणार आहेत. बिबट्या परिसरात येण्यापूर्वीच नागरिकांना इशारा मिळाल्याने आपत्कालीन परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळता येणार आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात, विशेषतः सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्यालगतच्या दुर्गम गावांमध्ये, बिबट्यांचा मानवी वस्तीतील शिरकाव रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोठे संरक्षक चर खोदण्याची मोहीम राबवली जाणार आहे. ही चर वनविभागाच्या हद्दीलगतच्या शेती क्षेत्रामध्ये घेतली जाणार असून, त्यातून बिबट्यांचे शेती व वस्ती भागात येणे आटोक्यात येण्याची अपेक्षा आहे. पाटण, सातारा आणि जावली हे तीन तालुके या मोहिमेत प्राधान्याने समाविष्ट असतील.

या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एकूणच, एआय तंत्रज्ञान, पिंजरे आणि संरक्षक चर अशा एकत्रित उपाययोजनांमुळे सातारा जिल्ह्यात बिबट्यांमुळे निर्माण होणारी भीती आणि हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल, अशी आशा आहे.

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

करपेवाडी - वडिलांच्या स्मरणार्थ करपे बंधूंचे आदर्श कार्य; गावात ५ बेंचचे लोकार्पण.

करपेवाडी - वडिलांच्या स्मरणार्थ करपे बंधूंचे आदर्श कार्य; गावात ५ बेंचचे लोकार्पण.

(साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी तळमावले )
तळमावले - लोकसहभागातून गावविकास साधता येतो, याचे उत्तम उदाहरण करपेवाडी गावचे सुपुत्र तथा सामाजिक जाणिवेतून कार्यरत असलेले मा. संतोष विष्णु करपे व विक्रम विष्णु करपे यांनी दिले आहे. त्यांनी त्यांचे वडील कै. विष्णु गणपती करपे (आप्पा) यांच्या पावन स्मरणार्थ गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी मेन रोड व स्मशानभूमी परिसरात एकूण ५ बेंच उपलब्ध करून दिल्या आहेत.

या बेंचमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, पादचारी तसेच स्मशानभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांना विश्रांतीसाठी मोठा आधार मिळणार आहे. उन्हाळा, पावसाळा किंवा इतर प्रसंगी बसण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

या उपक्रमाबद्दल सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने मा. संतोष करपे व विक्रम करपे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. वडिलांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी कार्य करण्याची त्यांची भावना प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमुळे गावातील एकोपा व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

करपे बंधूंचा हा उपक्रम गावातील तरुणांसाठी आदर्श ठरणारा असून, भविष्यातही अशाच प्रकारचे लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मानखुर्दमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा.



बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मानखुर्दमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा.

मुंबई, मानखुर्द | दि. २५ डिसेंबर
(साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज, मानखुर्द प्रतिनिधी)

बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी मानखुर्द येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सर्व हिंदू संघटना, सामाजिक संस्था तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले अन्याय, हल्ले, जबरदस्तीचे धर्मांतर, मंदिरांची तोडफोड व मानवी हक्कांचे उल्लंघन या घटनांमुळे संपूर्ण हिंदू समाजात तीव्र संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच पीडित हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात येत आहे.

हा निषेध मोर्चा टी जंक्शन, महाराष्ट्र नगर फ्लायओव्हरच्या खाली, मानखुर्द, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून, शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाद्वारे केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षिततेसाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

या मोर्चामध्ये सहभागी होऊन हिंदू एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाज, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.


मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत शिवसेना UBT–मनसे युतीचा एल्गार! मानखुर्दमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, परिसर घोषणांनी दणाणला.


मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत शिवसेना UBT–मनसे युतीचा एल्गार! मानखुर्दमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, परिसर घोषणांनी दणाणला.

मुंबई, दि. २४ डिसेंबर २०२४
(साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज – मानखुर्द प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. या ऐतिहासिक युतीच्या आनंदात मानखुर्द परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना शाखा क्रमांक १४३ मध्ये शिवसैनिक व मनसे सैनिकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला.

युतीची बातमी समजताच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाखा कार्यालयात जमले. केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.

 यावेळी
“उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है!”
“राज साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है!”
अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

शिवसेना UBT व मनसे युतीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठी ताकद मिळणार असून, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मानखुर्दसारख्या महत्त्वाच्या विभागात दोन्ही पक्षांची एकजूट ही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या प्रसंगी दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, शाखाप्रमुख,महिला आघाडीच्या कार्यकर्त्यां तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत युतीला जाहीर पाठिंबा दिला आणि आगामी निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिवसेना UBT–मनसे युतीमुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असून, त्याचे पडसाद मानखुर्दसह संपूर्ण मुंबईत उमटू लागले आहेत. आगामी काळात ही युती मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी निर्णायक लढत देणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

घरपट्टी भरली की डस्टबिन मोफत! ताईगडेवाडी ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम


घरपट्टी भरली की डस्टबिन मोफत! ताईगडेवाडी ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम.

तळमावळे, दि. २४ डिसेंबर
(साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत ताईगडेवाडी (ता. पाटण) यांच्या वतीने सन २०२५–२६ या आर्थिक वर्षातील घरपट्टी वेळेत भरणाऱ्या नागरिकांना मोफत डस्टबिन देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कर भरण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीने स्वच्छता, करसंकलन आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू केला आहे. घरपट्टी भरल्यावर प्रत्येक कुटुंबाला ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी उपयुक्त ठरणारे डस्टबिन दिले जात असून त्यामुळे गावातील स्वच्छतेला चालना मिळणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना सरपंच सूरज यादव यांनी सांगितले की, “घरपट्टी भरणे ही ग्रामपंचायतीची महत्त्वाची जबाबदारी असून त्यातूनच गावाच्या विकासकामांना गती मिळते. नागरिकांनी वेळेत कर भरावा, तसेच स्वच्छतेकडेही गांभीर्याने पाहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांचा मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.”

याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग व स्वच्छता कर्मचाऱ्यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभत आहे. करसंकलन वाढल्यास गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होणार असून ताईगडेवाडी ग्रामपंचायत समृद्ध पंचायतराज अभियानात आदर्श ठरण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व घरपट्टी वेळेत भरून गावाच्या सर्वांगीण विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

ढेबेवाडी खोऱ्यात अंगावर काटा आणणारा थरार! एसटी बससमोरच ‘तारा’ वाघिणीचा रस्त्यावर अवतार.

ढेबेवाडी खोऱ्यात अंगावर काटा आणणारा थरार! एसटी बससमोरच ‘तारा’ वाघिणीचा रस्त्यावर अवतार. 

 |साप्ताहिक कुमजाई पर्व  प्रतिनिधी ढेबेवाडी - 

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत मुक्तसंचार करणाऱ्या STR-05 उर्फ ‘तारा’ या प्रौढ वाघिणीचे बुधवारी सकाळी थरारक दर्शन झाले. माईंगडेवाडी येथे मुक्कामी असलेली एसटी बस पाटणकडे रवाना होत असतानाच अचानक झुडपातून वाघीण थेट रस्त्यावर आल्याने काही क्षणांसाठी प्रवाशांचा श्वास रोखला गेला. वाघिणीची झलक पाहताच बसमधील प्रवाशांचे काळजाचे ठोके चुकले, तर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीच्या घनदाट जंगलात उभारण्यात आलेल्या सुरक्षित कुंपणात प्रौढ वाघिणीला सुरुवातीला ठेवण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळी तिने कुंपण ओलांडत यशस्वी मुक्तसंचार केला. काही दिवस ‘सॉफ्ट रिलीज’ प्रक्रियेत असलेली तारा सुरक्षितपणे कुंपणाबाहेर पडून चांदोलीच्या कोअर जंगलात दाखल झाली होती.

नैसर्गिक अधिवास शोधण्याच्या उद्देशाने तिने जंगल क्षेत्रात भटकंती सुरू केल्याचे वनविभागाने यापूर्वी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर पाटण खोऱ्यासह लगतच्या ग्रामीण भागात अधूनमधून तिचे दर्शन होत असून, नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.

बुधवारी सकाळी ढेबेवाडी खोऱ्यातील माईंगडेवाडी

परिसरात तिचे पुन्हा दर्शन झाले. रस्त्यावर अचानक वाघीण आल्याने काही काळ वाहतूक थांबली. काही क्षणांनी ती शांतपणे जंगलाच्या दिशेने निघून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र हा थरारक प्रसंग तालुक्यासह जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास टाळावा, जंगलालगतच्या भागात अनावश्यक वर्दळ करू नये, जनावरे चरायला नेताना विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाघिणीच्या हालचालींवर वनविभागाचे पथक बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तळमावळे - बी.कॉम. २००६ बॅचची मातृसंस्थेला कृतज्ञतेची अनोखी भेट; डॉ. बापूजी साळुंखे ग्रंथालयास ५० हजारांची ग्रंथसंपदा.

बी.कॉम. २००६ बॅचची मातृसंस्थेला कृतज्ञतेची अनोखी भेट; डॉ. बापूजी साळुंखे ग्रंथालयास ५० हजारांची ग्रंथसंपदा

तळमावले, दि. २३ डिसेंबर २०२५ |साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी.

येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले या महाविद्यालयाच्या बी.कॉम. भाग ३ (२००६ बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणसंस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे ग्रंथालयास तब्बल ५० हजार रुपये किमतीच्या स्पर्धा परीक्षा उपयुक्त ग्रंथांची अमूल्य भेट दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही भव्य ग्रंथभेट देण्यात आली.

आपण ज्या महाविद्यालयात घडून आलो, त्या संस्थेप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत ही उल्लेखनीय पहल केली. या ग्रंथसंपदेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले संदर्भग्रंथ, मार्गदर्शक पुस्तके व चालू घडामोडींवरील साहित्याचा समावेश आहे.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे यांनी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले की, “त्याग आणि परोपकार हाच जीवनातील सर्वात मोठा ठेवा आहे. महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीत माजी विद्यार्थी–विद्यार्थिनींचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे माजी विद्यार्थी सामाजिक बांधिलकीतून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. आपले कार्यकर्तृत्व हीच आपली खरी ओळख आहे. अशा दानशूर व होतकरू माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरकाकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले ही संस्था या ग्रंथदानाबद्दल सदैव कृतज्ञ राहील. “आपण दिलेले मौलिक ग्रंथ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असून, तळमावलेसारख्या ग्रामीण भागातून भविष्यात अनेक प्रशासकीय अधिकारी घडण्यास यामुळे हातभार लागेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाचनाच्या महत्त्वावर भर देताना प्राचार्या साळुंखे म्हणाल्या, “वाचन हा उत्तम संस्कार आहे. वाचनाने जीवन समृद्ध, अर्थपूर्ण व सुसंस्कारित होते. वाचन माणसाला माणूसपणाकडे नेते आणि ज्ञानसंवर्धनातून चांगल्या विचारांची निर्मिती होते.”

या समारंभास मा. संतोष पाटील (माजी विद्यार्थी), महाविद्यालयातील विद्यार्थी–विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग व प्रशासकीय सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जी. एन. पोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. बी. एस. सालवाडगी यांनी केले.
या ग्रंथदानामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळाली असून, माजी विद्यार्थ्यांनी घालून दिलेला हा आदर्श निश्चितच अनुकरणीय ठरणार आहे.

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढीचा दुचाकी वाहन वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढीचा दुचाकी वाहन वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी शिवडे (ता. कराड) : 23 डिसेंबर महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, शिवडे (ता. कराड, जि. सातारा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने दुचाकीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सल्लागार श्री. प्रकाश मुसळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आली.

यानंतर संस्थेचे संचालक श्री. संजय देशमाने यांच्या हस्ते करण जगन्नाथ शेडगे यांना दुचाकीचे वितरण करण्यात आले. तसेच सल्लागार श्री. कमलेश दळवी यांच्या हस्ते सुशांत संदीप देशमाने यांना दुचाकी सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमामुळे सभासदांना दैनंदिन कामकाजास तसेच रोजगार व व्यवसायासाठी मोठा हातभार लागणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या वेळी संस्थेचे कुटुंब प्रमुख महेश उबारे साहेब, चेअरमन श्री. प्रमोद देशमाने, व्हाईस चेअरमन सौ. उज्वला उबारे, संचालक नागेश अडसुळे, कांतीलाल जगदाळे, संजय शेजवळ, संजय देशमाने, सूर्यकांत म्हेत्रे, विजय देशमाने, अनुप कात्रे, तसेच मनीषा अडसुळे, मनीषा वाघमारे, उमा कळसकर आदी संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय सल्लागार संजय नागमल, धनंजय केंजळे, अरुणा येवले मॅडम, सीमा वाघमारे व इतर मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यवस्थापक श्री. तानाजी वेताळ यांनी उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री. कांतीलाल जगदाळे यांनी आभार प्रदर्शन करून संस्थेच्या या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

मानखुर्द : शेवाळे कुटुंबात उमेदवारीचा पेच; माजी नगरसेविकेचा अचानक झालेल्या प्रभाग बदलामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण.

साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द परिसरातील राजकारण तापू लागले असून उमेदवारीच्या गणितांमुळे शिवसेनेत (शिंदे गट) अंतर्गत चर्चांना वेग आला आहे. मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १४२ मधून माजी नगरसेविका वैशाली शेवाळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच, अचानक झालेल्या प्रभाग बदलामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
प्रभाग १४२ मधून यापूर्वी एसटी आरक्षणातून निवडून आलेल्या वैशाली शेवाळे यांनी यावेळीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. २०१७ नंतर त्यांनी प्रभागातील तळागाळातील नागरिकांशी थेट संपर्क साधत काम केल्याने त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली होती. त्यामुळे आरक्षण सर्वसाधारण महिला गटासाठी खुले झाल्यानंतरही त्या पुन्हा याच प्रभागातून लढतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, याच दरम्यान शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी देखील प्रभाग १४२ मधून नगरसेविका पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये उमेदवारीचा पेच निर्माण झाला. अखेर नाईलाजाने वैशाली शेवाळे यांना प्रभाग १४२ सोडून धारावीतील प्रभाग क्रमांक १८३ मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून मानखुर्दमधील प्रभाग १४२ मध्ये शेवाळे कुटुंबाचे वर्चस्व आहे. यावेळीही त्या कुटुंबातीलच सदस्य उमेदवारीसाठी पुढे आल्याने विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोपही केला जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल शेवाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर वैशाली शेवाळे यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाची वाट धरली. दरम्यान, कामिनी शेवाळे या गेल्या अनेक वर्षांपासून अप्रत्यक्षपणे राजकारणात सक्रिय आहेत. त्या २००२ साली भायखळा येथून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. २०१७ साली पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सामाजिक कार्यक्रम, महिला मेळावे, हळदी-कुंकू, मंगळागौर यांसारख्या उपक्रमांमधून त्यांचा जनसंपर्क कायम राहिला आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा नगरसेविका पदासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेविका वैशाली शेवाळे म्हणाल्या, “माझा जन्म धारावीतील आहे. यापूर्वी सासरी म्हणजे मानखुर्दमध्ये जनसेवेची संधी मिळाली. त्या प्रभागातील काम पाहून धारावीतील नागरिकांनी मला तिथून निवडणूक लढवण्याची मागणी केली. त्यामुळे मी प्रभाग १४२ सोडून १८३ मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.” दरम्यान, याबाबत कामिनी शेवाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, ‘जाऊबाई जोरात’ या चर्चेमुळे मानखुर्द आणि धारावी परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणुकीत शेवाळे कुटुंबाची रणनीती काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

मा.मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा ८२ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होणार.

मा.मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा ८२ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होणार.
पाटण, दि. २२ साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तसेच पाटण विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) यांचा ८२ वा वाढदिवस शनिवार, दि. २७ डिसेंबर रोजी पाटण तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी बुधवार, दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता श्रीराम मंदिर, पाटण येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात येणार असून विविध उपक्रमांची जबाबदारी कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती वाढदिवस संयोजक समितीच्यावतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत पाटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन विकास, शैक्षणिक व आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी आजही जनतेच्या स्मरणात आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, स्पर्धा, शिबिरे तसेच विविध सेवा कार्ये आयोजित करण्याचा निर्धार संयोजक समितीने केला आहे. या नियोजन बैठकीस पाटण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सदस्य, विविध संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक, बूथ समिती अध्यक्ष व सदस्य, तसेच महिला, युवक व युवती यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाढदिवस संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे. विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होणारे कार्यक्रम हे केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांतून त्यांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ठरणार असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

ढेबेवाडी - समग्र शिक्षणांतर्गत आयसीटी उपक्रमामुळे राज्यातील गरीब विद्यार्थी बनणार संगणक साक्षर

समग्र शिक्षणांतर्गत आयसीटी उपक्रमामुळे राज्यातील गरीब विद्यार्थी बनणार संगणक साक्षर.
ढेबेवाडी | साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये आधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून, प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र संगणक इन्स्ट्रक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. आधुनिक युगात टिकून राहण्यासाठी संगणक साक्षरता अत्यावश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालक ीमती आर. विमला यांनी आयसीटी (Information Communication Technology) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील तब्बल ३८ शाळांमध्ये संगणक शिक्षणाचा उपक्रम यशस्वीरीत्या सुरू असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळणीचे ज्ञान दिले जात आहे. राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर. विमला यांच्या सूचनेनुसार व सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आजच्या संगणकयुगात शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच संगणकाचे मूलभूत ज्ञान मिळणे आवश्यक आहे. विशेषतः गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार असून, त्यांच्या शैक्षणिक व भविष्यातील करिअरच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरेल. येणाऱ्या काळात या संगणक प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात निश्चितच भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

“मंत्र्यांची फौज आली तरी फरक पडणार नाही; मंद्रूळकोळे विजय आमचाच” – ना. शंभूराज देसाई

मंद्रूळकोळे जि. प. मतदारसंघातील विजय आमचाच; कोणाच्या ताकदीला घाबरत नाही – ना. शंभूराज देसाई यांचा निर्धार ढेबेवाडी | साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी
पाटण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीत मंद्रूळकोळे जिल्हा परिषद मतदारसंघातील विजय निश्चितपणे आपलाच असणार आहे, असा ठाम आणि आक्रमक दावा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केला. “माझे पूर्ण लक्ष ढेबेवाडी विभागातील जिल्हा परिषद मतदारसंघांवर आहे. कोण उभं राहणार, किती मोठी ताकद लावणार, कोण प्रचाराला येणार याची आम्हाला अजिबात भीती नाही. आम्ही निवडणुकीपुरते नाही तर कायम जनतेत आहोत. त्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची आमची नोंद जनतेच्या मनात आहे,” असे ठणकावून सांगत ना. देसाई यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले.
कामाच्या जोरावरच विजय – प्रचाराची भीती नाही मंद्रूळकोळे खुर्द (ता. पाटण) येथे ग्रामीण रस्ते विकास ३०५४ योजनेतून होत असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी **डॉ. दिलीपराव चव्हाण (माजी चेअरमन), विलास गोडांबे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), ज्योतीराज काळे, पंजाबराव देसाई, संतोष गिरी, दिलीपराव जानुगडे, मनोज मोहित, रणजीत पाटील, प्रकाश पवार, आदर्श सरपंच रविंद्र माने, सरपंच मनोज पाटील, सरपंच आत्माराम पाचुपते यांची प्रमुख उपस्थिती होती. “मंत्रिमंडळातील माझे सहकारी जरी इथे प्रचाराला आले तरी फरक पडत नाही. तुम्ही घाबरू नका, मी समर्थ आहे,” असे सांगत ना. देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला. सत्ता सेवा करण्यासाठी, गटबाजीसाठी नव्हे. ना. देसाई पुढे म्हणाले, “लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई आणि स्व. आबासाहेब देसाई यांची एकच शिकवण होती – सत्ता, पद, अधिकार मिळाले की गटातटाचा विचार न करता काम करा. कारण ही पदं लोकांच्या सेवेसाठी असतात.” राजकारणात टिकायचं असेल तर **लोकांशी प्रामाणिक राहावं लागतं, अन्यथा जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेते, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. संकटात कोण उभं राहिलं हे जनता विसरत नाही. “पूर, अतिवृष्टी, दरड कोसळणे, रस्ते बंद होणे, कोरोना महामारी – प्रत्येक संकटात कोण जनतेच्या पाठीशी ठाम उभं राहिलं, हे लोकांनी अनुभवलं आहे. संकटात न दिसणारे लोक निवडणुकीपुरते पुढे येतात, पण जनता अशांना ओळखते,” असा टोला देत निवडणूकपुरत्या राजकारणावर त्यांनी जोरदार प्रहार केला. माथाडी चळवळ म्हणजे सामाजिक बांधिलकी. स्व. अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत माथाडी कामगारांना एकत्र आणले. त्या चळवळीच्या पाठीशी स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सरकारची संपूर्ण ताकद उभी केली. “ही केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर सामाजिक बांधिलकी होती,” असे सांगत ना. देसाई यांनी आपल्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली. १ कोटी ५५ लाखांचा निधी – कार्यकर्त्यांचा अभिमान.
उपसरपंच संजय लोहार म्हणाले, “ना. शंभूराज देसाई हे राज्यातील प्रभावी मंत्री आहेत, याचा तालुक्याला अभिमान आहे. त्यांचा कार्यकर्ता चिवट व स्वाभिमानी आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी मंद्रूळकोळे खुर्दसाठी १ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी दिला, याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.” ३०५४ च्या निधीवर श्रेयलढाई करणाऱ्यांना टोला ना. शंभूराज देसाई म्हणाले, “मंद्रूळकोळे खुर्दच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू दिला जाणार नाही. ग्रामीण रस्ते विकास ३०५४ योजनेतून या गावासाठी **५० लाख रुपये मीच तातडीने मंजूर केले**. या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ३०५४ योजनेतील कामे ही **स्थानिक आमदाराच्या शिफारशीनेच** होत असतात, हे श्रेय लाटणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. अज्ञान पाजळू नये,” असा थेट टोला त्यांनी नाव न घेता हाणला. या कार्यक्रमात अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष सागर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावेळी प्रा. सुरेश पाटील, रोहित चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. रविंद्र उर्फ राजू रोडे यांनी स्वागत केले, तर रणजित पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास सतिश कापसे, अविनाश साळुंखे, बबन पाटील, अविनाश कापसे, अनिल लोहार, प्रकाश पाटील, सदाशिव काळुगडे, सदाशिव कदम महाराज, बजरंग भुरुगडे, दीपक पाटील, सर्जेराव कुंभार, अविनाश काटकर, नयन दुर्गावळे, राम काटकर, सचिन लोहार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

*कुंभारगाव - जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्थेच्या १० वर्षांचा समाजकार्याचा गौरवशाली प्रवास.*

कुंभारगाव - जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्थेच्या १० वर्षांचा समाजकार्याचा गौरवशाली प्रवास.

साप्ताहिक कुमजाई पर्व - कुंभारगाव | प्रतिनिधी

कुंभारगाव येथील जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्था (स्थापना सन २०१५) यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत यशस्वीपणे १० वर्षे पूर्ण केली आहेत. सर्व ग्रामस्थांचे आशीर्वाद, कार्यकर्त्यांचे सहकार्य, कमिटी सदस्यांचे मार्गदर्शन आणि सर्व स्तरातील सभासदांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेचा हा प्रेरणादायी प्रवास घडून आला आहे.

संस्थेची स्थापना करताना अनेक अडचणी व अडथळे आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता, सर्वांना सोबत घेऊन समाजकारण हाच एकमेव उद्देश समोर ठेवत संस्थेने वाटचाल सुरू ठेवली. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता, सर्व गट, तट, पक्ष व संघटनांना एकत्रित ठेवून लोकहिताचे निर्णय घेत सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विनास्वार्थ समाजसेवा करण्याचा संस्थेचा मूलमंत्र राहिला आहे.

आरोग्य, पाणी, शिक्षण, आपत्ती निवारणात मोलाची कामगिरी

गेल्या दहा वर्षांत संस्थेमार्फत आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पाणीटंचाईच्या काळात वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाळीव जनावरांचे लसीकरण, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, बालचमुंसाठी किल्ले स्पर्धा, गणेश मंडळांना पाणी व आरतीपुस्तकांचे वाटप अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

आपत्तीच्या काळात धावून जाणारी मदतीची हात

सन २०१९ मधील कोल्हापूर–सांगली पूरस्थिती असो वा २०२२ मधील अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन—संस्थेने वेळोवेळी जीवनावश्यक वस्तू, कपडे व घरगुती साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

परंपरा जपणारे व एकोपा वाढवणारे उपक्रम

दरवर्षी संस्थेच्या नावाचे कॅलेंडर मुंबईपासून गाव-पंचक्रोशीतील वाड्या-वस्त्यांपर्यंत घरोघरी वाटप करण्याची परंपरा आजही सुरू आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भगवे झेंडे वाटप, गावातील ध्वजस्तंभ उभारणी, गणेशोत्सवातील सामाजिक सहभाग अशा उपक्रमांतून एकोपा, राष्ट्रभक्ती व सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत केली जात आहे.

शिवविचारांची प्रेरणा

ही संस्था ज्या महान आदर्शांवर चालते, ते आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (जाणता राजा) यांचे विचार. त्यांच्याच नावाने आणि प्रेरणेने संस्थेने समाजसेवेचा वसा जपला आहे. पुढील काळातही सर्वांच्या साथीने अशीच लोकहिताची कामे अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दहा वर्षांचा हा गौरवशाली प्रवास म्हणजे नुसती यादी नाही, तर समाजाशी नाते जपणाऱ्या नि:स्वार्थ सेवाभावाची साक्ष आहे. पुढील काळातही जाणता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्था कुंभारगाव समाजसेवेच्या वाटेवर आदर्शवत कार्य करत राहील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

*क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने २०२६ दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन.*

क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने २०२६ दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन.

कुठरे पवारवाडी :
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सन २०२६ ची दिनदर्शिका पवारवाडी गावातील ग्रामस्थांच्या सहभागातून अत्यंत उत्साहात प्रकाशित करण्यात आली. धार पवार समाजातील ज्येष्ठांना मान देत तसेच बांधव-भगिनींच्या उपस्थितीत या दिनदर्शिकेचे औपचारिक अनावरण करण्यात आले.

क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था ही विशेषतः पवार बांधवांच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडणीसाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील धार पवार समाज एकत्र यावा, समाजात बंधुभाव वाढावा, तसेच आपले गोत्र, मूळ पुरुष, कुलदेवता व संस्कार यांची जपणूक व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. याचबरोबर नव्या पिढीला समाजाचा गौरवशाली, सुसंस्कृत व लढाऊ इतिहास माहिती व्हावा, यासाठी संस्थेकडून विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविले जातात.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून कुठरे पवारवाडी येथे आयोजित कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांना सन्मान देत त्यांच्या हस्ते २०२६ दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य आणि परंपरेच्या जतनाचा उत्तम आदर्श ठरला.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अंकुशराव पाटील होते. तसेच उद्योजक जगदीश शेठ, पंकज पवार, जगन्नाथ पवार, देवांक पवार आणि संस्थेचे सचिव अविनाश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने धार पवार बांधव व भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले आणि समाजहितासाठी सुरू असलेल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

कराडात मित्रावरच कोयत्याने वार; अल्पवयीनाकडून गंभीर हल्ला.

कराडात मित्रावरच कोयत्याने हल्ला; एक गंभीर जखमी.


कराड, दि. १८ (साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी) 
येथील मंगळवार पेठ परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्रावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठ परिसरात गुरुवारी सायंकाळी काही मित्र एकत्र असताना पूर्वी झालेल्या वादाचा विषय पुन्हा उफाळून आला. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद वाढत गेल्याने एका अल्पवयीन युवकाने आपल्या मित्रावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने अचानक वार केला.

हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर मित्रांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोयत्याचा वार थेट जखमी युवकाच्या पाठीवर बसल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात दोघेही युवक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून हल्ला करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास कराड शहर पोलीस करत आहेत.



“कुंभारगाव - वडिलांच्या रक्षेचे पाण्यात विसर्जन न करता वृक्षारोपणातून जिवंत स्मारक”

“कुंभारगाव - वडिलांच्या रक्षेचे पाण्यात विसर्जन न करता वृक्षारोपणातून जिवंत स्मारक”

कुंभारगाव – साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी
 पाटण तालुक्यातील कुंभारगावातील जुन्या पिढीतील प्रगतशील, प्रामाणिक व कष्टाळू ज्येष्ठ शेतकरी कै. दत्तात्रय विठ्ठल देसाई यांचे दि. १६ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांनी पारंपरिक रीतिरिवाजांना पर्याय देत पर्यावरणपूरक व समाजाला दिशा देणारा आदर्श उपक्रम राबविला.

आज दि.१८ डिसेंबर रोजी रक्षा विसर्जनाच्या दिवशी, कै. देसाई यांच्या रक्षेचे पाण्यात विसर्जन न करता त्या रक्षेचा उपयोग करून त्यांनी ज्या शेतीत आयुष्यभर कष्ट करून कुटुंबाचा संसार फुलविला, त्या शेतीत बेल, सुपारी, आवळा, सिताफळ, फणस आदी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वडिलांची आठवण कायमस्वरूपी जिवंत राहावी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाला मिळावा, या उद्देशाने देसाई कुटुंबाने हा उपक्रम राबविला.

या उपक्रमामुळे कुंभारगाव विभागात देसाई कुटुंबाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक जाणीव जपण्याचा संदेश दिला आहे.

वृक्षारोपणवेळी मुलगा विकास सेवा सोसायटी. कुंभारगावचे संचालक श्री. जगन्नाथ दत्तात्रय देसाई, पत्नी सौ. संगीता जगन्नाथ देसाई, मुलगा सनी, भाऊ श्री. दिलीप दत्तात्रय देसाई व पत्नी सौ. उज्वला दिलीप देसाई, श्री. संजय दत्तात्रय देसाई व पत्नी सौ. सुनीता संजय देसाई, मुलगा साईश, मुलगी मधुरा, चुलते श्री. राजाराम देसाई तसेच कुंभारगाव शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, वृक्ष मित्र श्री. जालिंदर पाटील (बनपुरी) आदी उपस्थित होते.

परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत पर्यावरणपूरक कृतीतून पितृऋण फेडण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

दुर्दैवी घटना! जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार;मान्याचीवाडी परिसरात हृदयद्रावक घटना; नातेवाइकांकडून घातपाताचा आरोप

दुर्दैवी घटना! जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार;मान्याचीवाडी परिसरात हृदयद्रावक घटना; नातेवाइकांकडून घातपाताचा आरोप
पाटण | प्रतिनिधी पाटण तालुक्यातील नेरळे–मेंढेघर रस्त्यावर मान्याचीवाडी (गुंजाळी) गावानजीक मंगळवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात जेसीबीच्या धडकेत दुचाकीवरील विवाहित महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नम्रता भाऊ कानडे (वय २३, रा. किल्ले मोरगिरी, ता. पाटण) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले मोरगिरी येथील भाऊ मनोहर कानडे (वय २७) हे पत्नी नम्रता कानडे यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच ५० डब्ल्यू ८२७४ वरून मोरगिरीकडे जात होते. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास नेरळे–मेंढेघर रस्त्यावर मान्याचीवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या जेसीबी (क्रमांक एमएच ११ यू ६९८९) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात नम्रता कानडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर भाऊ कानडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, या घटनेत घातपाताची शक्यता व्यक्त करत, सखोल चौकशी होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृत महिलेच्या नातेवाइकांनी घेतला. यामुळे घटनास्थळी व रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी नातेवाइकांना घटनास्थळी नेऊन प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली व प्राथमिक तपासाची माहिती दिल्यानंतर नातेवाइकांनी रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेतला. आज दुपारी पोलिस बंदोबस्तात नम्रता कानडे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताबाबत जखमी भाऊ कानडे यांचे वडील मनोहर कानडे यांनी पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे किल्ले मोरगिरी व परिसरात शोककळा पसरली असून अवघ्या २३ व्या वर्षी नम्रता कानडे यांचा अकाली मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

*पाटण: कुणबी प्रमाणपत्रांवरील अन्यायाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा* *शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी पाटण येथे महत्त्वाची आयोजन बैठक*

पाटण : कुणबी प्रमाणपत्रांवरील अन्यायाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी पाटण येथे महत्त्वाची आयोजन बैठक
पाटण : कुणबी प्रमाणपत्रासाठी पुरावे सादर करून अर्ज केलेल्या अनेक मराठा समाजबांधवांचे अर्ज चुकीची नियमावली लावून व तांत्रिक कारणे पुढे करून निकाली काढले जात असल्याचा गंभीर आरोप सकल मराठा समाज, पाटण तालुक्याच्या वतीने करण्यात आला आहे. या अन्यायाविरोधात पुढील तीव्र आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शुक्रवार दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता पाटण तालुका प्राथमिक शिक्षक बँक सभागृह, मुळगाव रोड, पाटण येथे एक महत्त्वाची आयोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्र नाकारण्यात आलेल्या अर्जदारांची प्रकरणे, प्रशासनाकडून लावली जात असलेली चुकीची नियमावली, तसेच पुढील आमरण उपोषणासह तीव्र आंदोलनाचा निर्णय यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तहसील कार्यालयात कुणबी प्रमाणपत्रासाठी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात एकत्रित भूमिका घेण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. चुकीच्या नियमावलीमुळे अर्जदारांवर अन्याय कुणबी नोंदी असलेले पुरावे, जुनी महसुली कागदपत्रे, वंशावळी, गाव नमुने व ऐतिहासिक नोंदी असूनही अनेक अर्जदारांचे अर्ज फेटाळले जात आहेत. शासनाच्या मूळ निर्णयाच्या विरोधात जाऊन काही ठिकाणी अतिरिक्त व अवास्तव अटी लावल्या जात असल्याने समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा अन्याय केवळ काही व्यक्तींवर नव्हे, तर संपूर्ण मराठा समाजाच्या हक्कांवर घाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. “नोंदी आहेत, हक्क आहे; तरीही आरक्षण नाही..!” सकल मराठा समाजाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेला हा मुद्दा गेल्या ५८ वर्षांपासून कुणबी नोंद असलेल्या मराठा कुटुंबांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधतो. नोंदी असूनही आरक्षणाचा लाभ न मिळणे, तसेच प्रमाणपत्रासाठी वारंवार अपमानास्पद प्रक्रियेला सामोरे जावे लागणे, ही गंभीर बाब असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज केलेले व चुकीच्या कारणांवरून अर्ज नाकारण्यात आलेले सर्व अर्जदार, तसेच मराठा समाजातील सर्व समाजबांधवांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज – पाटण तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असून, प्रशासनाने तात्काळ न्याय न दिल्यास आमरण उपोषणासारखे तीव्र पाऊल उचलले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कुणबी नोंदींच्या जतनाची तातडीची गरज मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तावेज दुर्लक्षित पाटण : कुणबी प्रमाणपत्रांच्या संदर्भात महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली असून १८८० ते १९१२ या कालावधीतील कुणबी नोंदी मोडी लिपीमध्ये उपलब्ध आहेत, मात्र या नोंदी आजपर्यंत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. याउलट १९१३ ते २०२५ या कालावधीतील सर्व कुणबी नोंदी मराठी भाषेत असून त्या नोंदी शासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. मोडी लिपीतील नोंदी सार्वजनिक न झाल्यामुळे अनेक कुणबी नोंद असलेल्या मराठा कुटुंबांना आजही प्रमाणपत्रासाठी संघर्ष करावा लागत आहे. ऐतिहासिक पुरावे असूनही ते उपलब्ध न करून दिल्याने समाजावर अन्याय होत असल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे. समाजबांधवांच्या प्रयत्नातून मोडी नोंदींचा शोध दरम्यान, काही गावांमधील मोडी लिपीतील कुणबी नोंदी सकल मराठा समाज बांधवांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शोधण्यात यश आले आहे. या नोंदींमुळे अनेक कुटुंबांचे ऐतिहासिक हक्क सिद्ध होत असून, त्या नोंदी शासनाने अधिकृतरीत्या मान्य करून सार्वजनिक कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. जीर्ण दस्तावेजांच्या जतनाची मागणी सदर मोडी लिपीतील नोंदी असलेले दस्तावेज अत्यंत जीर्ण व नाजूक अवस्थेत असून, काळाच्या ओघात ते नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मौल्यवान ऐतिहासिक कागदपत्रांचे डिजिटायझेशन, शास्त्रीय पद्धतीने जतन व भाषांतर (मोडी ते मराठी) तातडीने करणे आवश्यक असल्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

आरोग्य सेवक होणार आता ग्राम आरोग्य अधिकारी.

आरोग्य सेवक होणार आता ग्राम आरोग्य अधिकारी
सातारा: राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना. प्रकाश आबीटकर यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात भेट घेतली. या बैठकीत राज्यातील आरोग्य सेवकांचे पदनाम बदल व प्रलंबित असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती राज्य प्रवक्ते अरुण गादगे यांनी दिली. ग्रामीण व्यवस्थेचा कणा असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याचे 'आरोग्यसेवक' हे पदनाम बदलून त्यांना समाजातील सन्मान अधोरेखित करणारे 'ग्राम आरोग्य अधिकारी' किंवा 'आरोग्य उपनिरीक्षक' त्याऐवजी अधिक सकारात्मक अर्थ असलेले 'ग्राम आरोग्य दूत' असे पदनाम देण्याची सूचना आरोग्य मंत्र्यांनी मांडली. मात्र राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांचा शैली दर्जा व कामाचा अनुभव लक्षात घेता ग्राम आरोग्य अधिकारी असे पदनाम बदल करणे बाबत निवेदन दिले. ग्रामपंचायत अधिकारी, तलाठ्याचे ग्राम महसूल अधिकारी, तंत्रज्ञ यांचे प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी असे पदनाम बदल झाल्याचे निदर्शनास आणून दिले व 'ग्राम आरोग्य अधिकारी' हेच नाव करावे असे सुचवले याबाबत आरोग्य मंत्र्यांनी स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन दिले. आरोग्य सेवकांच्या नवीन सेवा प्रवेश नियमानुसार आरोग्य सेवकाची शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान उत्तीर्ण केली असून सॅनिटरी कोर्स बंधनकारक केला आहे तर पदोन्नतीसाठी कृषी सेवकांचे कृषी सहाय्यक अधिकारी, प्रयोगशाळा बीएससी पदवी पूर्ण असल्याचे बंधनकारक आहे. शैक्षणीक पात्रता व आरोग्यविषयक अत्यंत जबाबदारीचे काम त्यामुळे 'ग्राम आरोग्य अधिकारी' हे पदनाम होण्यास कोणतीही अडचण येत नाही. या बैठकीत राष्ट्रसेवा संघटनेने आरोग्य विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. हिवताप विभागाचा सुधारित आकृतीबंध तात्काळ लागू करणे, हिवताप विभागातील पदे शहरी भागात वाढवणे, रखडलेल्या, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक पदोन्नती तातडीने देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. कोरोना महामारीच्या काळात तर आरोग्य सेवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाडी-वस्ती, दुर्गम भागांमध्ये जाऊन नागरिकांना आरोग्य सेवा पुरव ली. गरोदर माता, नवजात व लहान मुले, किशोरवयीन, वृद्ध नागरिक अशा घटकांपर्यंत सातत्याने पोहोचून सेवा देणारा हा घटक खऱ्या अर्थाने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरला आहे. वर्षभर साथ रोगाच्या काळात संसर्गजन्य, असंसर्गजन्य भागातून फिरती व उपाययोजना करावी लागतात त्यामुळे ग्रामसेवकंप्रमाणे कायम फिरती भत्ता पाच हजार रूपये तसेच आरोग्य भत्ता मिळावा, ग्रामसेवक व तलाठी यांच्याप्रमाणे पदोन्नतीचे टप्पे ठेऊन आरोग्य सेवकावरील अन्याय मिटावा याकरिता मंत्रालयीन बैठकीमध्ये मुद्दे मांडणार असल्याचे राज्य प्रवक्ते अरुण गादगे, गणेश दहिफळे, बंडा पाटील यांनी दिली

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ गवत कापणाऱ्या महिलेवर अचानक झडप; हाताला गंभीर दुखापत

ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ गवत कापणाऱ्या महिलेवर अचानक झडप; हाताला गंभीर दुखापत.
ढेबेवाडी (ता. पाटण) : तालुक्यातील भालेकरवाडी (बनपुरी) गावालगतच्या शिवारात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्याने गवत कापत असलेल्या महिलेवर अचानक झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मालन खाशाबा भालेकर (वय ६५) या महिला गंभीर जखमी झाल्या असून, सुदैवाने त्या मोठ्या अनर्थातून बचावल्या आहेत. मालन भालेकर या सकाळच्या सुमारास जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शिवारात गेल्या होत्या. गवत कापण्याचे काम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या हातावर जोरदार चावा घेतल्याने हाताचा लचकाच तोडल्यासारखी गंभीर जखम झाली. अचानक झालेल्या हल्ल्याने त्या घाबरून गेल्या, मात्र त्यांनी धैर्याने आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या शिवारात काम करणारे शेतकरी मदतीसाठी धावले. शेतकऱ्यांची चाहूल लागताच बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत मालन भालेकर यांना तत्काळ पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे भालेकरवाडी, बनपुरी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवारात मोकाटपणे फिरणाऱ्या बिबट्यामुळे शेतकरी, महिला व मजूर यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यापूर्वीही या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या असून, आजच्या हल्ल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत तसेच गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा.

## राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी ### – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा.
**मुंबई, दि. 15 :** बृहन्मुंबईसह राज्यातील एकूण **29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान** तर **16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी** होणार असल्याची घोषणा **राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे** यांनी आज केली. या निवडणुकांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह राज्यभरातील एकूण **2,869 जागांसाठी** निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित सर्व महानगरपालिका क्षेत्रात **आचारसंहिता लागू** झाली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव **सुरेश काकाणी** उपस्थित होते. श्री. वाघमारे यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक प्रक्रिया **सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन** राहून राबविण्यात येत आहे. ### अधिसूचना व मतदानाची वेळ बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिसूचना **16 डिसेंबर 2025**, तर उर्वरित 28 महानगरपालिकांची अधिसूचना **18 डिसेंबर 2025** रोजी प्रसिद्ध केली जाईल. सर्व महानगरपालिकांमध्ये **15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान** होणार आहे. ### आचारसंहिता लागू निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घोषणा किंवा कृती करता येणार नाहीत. मात्र, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन मदतीबाबत आवश्यक उपाययोजनांना आचारसंहितेची अडचण असणार नाही. ### महानगरपालिकांची स्थिती राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी **जालना व इचलकरंजी** या दोन नव्याने निर्मित आहेत. * 5 महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये * 18 महानगरपालिकांची मुदत 2022 मध्ये * 4 महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपलेली आहे. ### बहुसदस्यीय प्रभाग पद्धत बृहन्मुंबई वगळता उर्वरित **28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने** निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला **3 ते 5 मते** द्यावी लागतील. बृहन्मुंबईत मात्र **एक सदस्यीय प्रभाग पद्धत** असल्याने प्रत्येक मतदाराला एकच मत देता येईल. ### नामनिर्देशन प्रक्रिया महानगरपालिका निवडणुकीसाठी **नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने** स्वीकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशन कालावधी – **23 ते 30 डिसेंबर 2025** छाननी – **31 डिसेंबर 2025** माघार – **2 जानेवारी 2026** चिन्ह वाटप व अंतिम यादी – **3 जानेवारी 2026** ### मतदार व मतदान व्यवस्था या निवडणुकांसाठी राज्यभरात * **एकूण मतदार : 3,48,78,017** * पुरुष : 1,81,93,666 * महिला : 1,66,79,755 * इतर : 4,596 * **एकूण मतदान केंद्रे : 39,147** पुरेशा प्रमाणात **ईव्हीएम यंत्रांची व्यवस्था** करण्यात आली असून, बृहन्मुंबईसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. ### ‘मताधिकार’ मोबाईल ॲप मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती मिळण्यासाठी **‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप** उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तसेच **[https://mahasecvoterlist.in/](https://mahasecvoterlist.in/)** या संकेतस्थळावरूनही मतदार यादी पाहता येणार आहे. ### ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा मतदान केंद्रांवर **ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला व लहान मुलांसह येणाऱ्या महिलांना प्राधान्य** देण्यात येईल. रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, वीज, सावली व शौचालयांची व्यवस्था अनिवार्य असेल. ### प्रचारावर 48 तासांची बंदी मतदान संपण्याच्या **48 तास आधी म्हणजे 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 नंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार व जाहिरात बंद** राहील. ### खर्च मर्यादा * बृहन्मुंबई, पुणे, नागपूर – ₹15 लाख * ‘ब’ वर्ग – ₹13 लाख * ‘क’ वर्ग – ₹11 लाख * ‘ड’ वर्ग – ₹9 लाख राज्य निवडणूक आयोगाने सर्व महानगरपालिका आयुक्तांना **मतदार जागृती वाढवण्याचे स्पष्ट निर्देश** दिले असून, शांततापूर्ण, पारदर्शक व निष्पक्ष निवडणूक पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ---

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...