संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पाटण तालुक्यात नवी ताकद ! कार्यकारिणी जाहीर, श्री मधुकर नारायण पाटील (बापू) यांची तालुकाध्यक्षपदी निवड.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पाटण तालुक्यात नवी ताकद!
मधुकर पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड, कार्यकारिणी जाहीर
कराड | दि. २६ डिसेंबर (साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पाटण तालुक्याच्या संघटनात्मक बांधणीला आज नवी दिशा मिळाली. कराड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात पाटण तालुका कार्यकारिणी व विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी पाटण तालुक्यातील मौजे तारळे गावचे ज्येष्ठ नागरिक, अनुभवी सामाजिक कार्यकर्ते तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे माजी सदस्य श्री मधुकर नारायण पाटील (बापू) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पाटण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ही निवड राज्यसभेचे विद्यमान खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री नितीन काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (AP) चे ]अध्यक्ष मा. श्री बाळासाहेब सोळस्कर, कार्याध्यक्ष मा. श्री संजय देसाई साहेब, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. श्री विक्रमबाबा पाटणकर, मा. श्री राजेश पाटील आबा वाठारकर (माजी संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक), मा. श्री सादिक इनामदार (अल्पसंख्यांक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुतन तालुकाध्यक्ष मा. श्री मधुकर (बापू) पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा, शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा व संघटन कौशल्याचा पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या नियुक्त्यांमुळे पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक संघटित, बळकट व सक्रिय होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास खासदार श्री नितीन काका पाटील देसाई व्यक्त करण्यात येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा