बुधवार, २२ जुलै, २०२६

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त* *सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती मा. श्री. संजय देसाई साहेब व संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल, कुंभारगाव येथे विविध सामाजिक उपक्रमां अंतर्गत वृक्षारोपण व विद्यार्थांना खाऊ वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले* होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी *लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्कुल मधील विद्यार्थ्यांनी दादांच्या कार्या बद्दल मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनाच्या निमित्ताने भारताचा नकाशा रांगोळीच्या माध्यमातून काढुन त्यामध्ये निसर्गातील वस्तुचा वापर करून सुदंर आकर्षक डिझाइन तयार करून कडेला मेणबत्त्या ठेवून प्रज्वलित करण्यात आल्या तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी स्कुलच्या परिसरात  वृक्षारोपण करण्यात आले.* तसेच *विद्यार्थ्यांना खाऊ वाटप* केले दादांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. *संजिवन प्रतिष्ठानचे सचिव प्रा सचिन पुजारी सर आपल्या मनोगतात लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या कार्याची माहिती व अनुभव व्यक्त करून विनम्र अभिवादन*  केले 
 *सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण अर्थ व क्रिडा सभापती मा श्री संजय देसाई यांनी आपल्या मनोगतात म्हणाले कि, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांनी सामाजिक, शैक्षणिक ,कृषी  विकासात्मक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.दादांनी घालून देण्यात आलेल्या विचारांचा वसा व  वारसा परंपरा इथुन पुढील काळात देखील आम्ही सदैव चालु ठेऊ असे आश्वासन दिले.* . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ खोत मॅडम यांनी केले व सुत्रसंचलन सौ वर्षा साळुंखे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ अर्चना पुजारी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढील प्रमाणे उपस्थित होते - 
मा श्री प्रशांत पाटील संचालक रयत साखर कारखाना शेवाळवाडी (म्हासोली) , श्री वसंतराव पतंगे शेठ (कापड व्यापारी) , श्री संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य), श्री दिलीप देसाई (प्रगतशील शेतकरी), श्री सुनील धर्माधिकारी (सामाजिक कार्यकर्ते) , श्री विजय कचरे (माजी ग्रामपंचायत सदस्य),, श्री सोमनाथ गुरव (युवा उद्योजक), प्रा सचिन पुजारी सर तसेच नवभारत को आॉप क्रेडिट सोसायटी सर्व प्रशासकिय स्टाफ आणि संजिवन प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संपूर्ण छायाचित्र व शुटिंग दै.कृष्णाकाठ व साप्ताहिक स्पंदनचे पत्रकार व कुंभारगाव सोसायटीचे संचालक मा श्री राजेंद्र पुजारी यांनी केले...

मंगळवार, १४ जुलै, २०२६

*मोरेवाडी हादरली! घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा धुडगूस, दोन गाभण शेळ्यांचा खात्मा,*



कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026
 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे  सोमवारी रात्रीच्या सुमारास घराजवळील शेडमध्ये घुसलेल्या बिबट्याने दोन गाभण शेळ्यांची शिकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी  मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.

ही घटना शेतकरी शिवाजी केशव मोरे यांच्या घराजवळील शेडमध्ये रात्री घडली. नेहमीप्रमाणे शेळ्या शेडमध्ये बांधून शिवाजी मोरे झोपले होते. पहाटे उठून पाहिले असता शेडमध्ये रक्ताचा सडा आणि दोन गाभण शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. बिबट्याने शेळ्यांच्या गळ्यावर आणि पोटावर हल्ला करून त्यांचा खात्मा केला.

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोहर यादव यांनी भोसगावचे वनपाल रमेश कुंभार आणि कुंभारगावचे वनरक्षक शरद ताले यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत शेळ्यांचे फोटो आणि पुरावे गोळा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. वनविभागाकडून नुकसान भरपाईचे आश्वासन देण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाटण तालुक्यातील या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.  जनावरे चारण्यासाठी बाहेर पडण्यास महिला-शेतकरी घाबरत आहेत.

घटनास्थळी आज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या भागात वरचेवर या घटना घडत आहेत. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

गुरुवार, ९ जुलै, २०२६

*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान*

*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान* 
जून ते सप्टेंबर हा कालावधी डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असतो. हा कालावधी पारेषण काळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे आगमन  झाले. त्यामुळे मान्सून कालावधीत हवेत आर्द्रता अधिक असते. पावसाच्या कालावधीत डासांना अंडी घालण्यासाठी साचलेल्या पाण्यांची ठिकाणे, डबकी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. या कालावधीत सर्वत्र डासांचा उच्छाद सुरू असतो. एडिस एजिप्टाय, अॅनाफेलिस, क्युलेक्स या प्रमुख तीन डासांसह इतर डासही मोठ्या प्रमाणावर आढळतात.

 *डासांचे आयुष्य& जीवन क्रम* 

 *अंडी अळी-कोष - डास* 
 हा जीवनक्रम ८ दिवसांचा असतो.
नर डास पाना, फुलांचा रस पितो, मादी डास मनुष्य, जनावरांचे रक्त शोषते.
मादी डासाचे आयुष्य २१ ते २७दिवस, नर डासाचे आयुष्य ५ दिवस असते.
मादी डास एकावेळी १५० ते २०० अंडी घालते. हे डास जीवन कालावधीत १ हजार ते २ हजार अंडी घालते.
एडिस एजिप्टाय डासाची मादी साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालते.
अॅनाफेलिस डासाची मादी साचलेल्या पाण्यात (डबकी वगैरे) अंडी घालते.
डास साधारणपणे ४ कि.मी. अंतरापर्यंत हवेतून उडत जाऊ शकतो.
डास १० मीटर उंचीपर्यंत उडतो. विशेष परिस्थितीत तो ४० ते १०० मीटर उंचीपर्यंत उडतो.


 *पट्टेरी एडिस* : तिरकी अॅनाफेलिस

एडिस डास (टायगर मॉस्क्युटो) दिवसा चावतो. या डासांच्या पायावर, शरीरावर पांढरे पट्टे असतात. या डासाची अळी पाण्यात स्प्रिंगप्रमाणे हालचाल करते. या डासाच्या मादीपासून डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका या आजारांचा प्रसार होतो. बाधित रुग्णाला चावलेला हा डास निरोगी माणसाला चावल्यानंतर विषाणूचा प्रसार होतो. मलेरिया अर्थात हिवताप या आजारास अॅनाफेलिस डासाची मादी कारणीभूत आहे. अॅनाफेलिस डास ४५ अंश कोनात (तिरका) बसतो. पावसामुळे नगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभर डासांची घनता वाढू लागली आहे. दिवसा आणि रात्रीही डासांच्या झुंडी दिसून येतात. त्यामुळे आजाराचा धोका वाढला आहे.

 *चिकुनगुनियाही ठरू शकतो घातक* 

चिकुनगुनिया हा आजार विषाणूमुळे होतो. एडिस एजिप्टाय या डासाच्या मादीपासून त्याचा प्रसार होतो. तीव्र स्नायू आणि सांधेदुखीसह अचानक ताप येतो. चिकुनगुनिया तापामुळे काही टक्के रुग्णांमध्ये संधिवात होऊ शकतो. वृद्ध आणि कॉमोरबिड व्यक्तीसाटी घातक ठरू शकतो. विषाणूने दूषित असलेल्या एडिस एजिप्टाय या डासाची मादी चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांत चिकुनगुनियाची सुरुवात होते. सांधे व स्नायूदुखी या प्रमुख लक्षणासह डोकेदुखी, मळमळ, थकवा आणि पुरळ ही लक्षणेही असू शकतात. कोणताही उपचार किंवा लस नाही. वेदना, सूज आणि ताप यासारख्या लक्षणापासून मुक्त होण्यासाठीची औषधे दिली जातात. हा आजार १० ते १२ दिवस टिकतो आणि कमी होतो.

 *कोरडा दिवस... तो का पाळायचा?* 

अंड्यापासून डास तयार होण्याचा कालावधी (जीवनचक्र) ८ दिवसांचा आहे. हे जीवनचक्र तोडले तर डासांची उत्पत्ती थांबते. त्यासाठी आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळावा, असे आवाहन केले जाते. पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून घासून, पुसून कोरडी करणे म्हणजेच ड्राय डे. ड्राय डे पाळल्यास डासांचे जीवनचक्र तुटते. एडिस, एजिप्टाय डासाची अंडी पाणी साठवण्याच्या भांड्याच्या कडेला चिकटलेली असतात. ४ महिने ते वर्षभर ही अंडी त्याच अवस्थेत राहू शकतात. त्यानंतर त्यांना पाणी मिळाले तर त्यांचे जीवनचक्र सुरू होते. त्यामुळे पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा घासू-पुसून स्वच्छ व कोरडी करणे आवश्यक आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव चे
वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव सर, व डॉ. क्षितिजा पाटील मॅडम याच्या 
मार्गदर्शना खाली

 श्री पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव येथे 

 डास आळी प्रात्यक्षिक व गप्पी मासे  दाखण्यात आले श्री देशमुख सर यानी प्रास्ताविक केले  आरोग्य कर्मचारी यानी डेग्यु,चिकनगुण्या,मलेरिया किटक जन्य आजाराबाबत श्री पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव येथे जनजागृती  व उपाय योजना बाबत माहिती सांगण्यात आली  तेव्हा उपस्थित आरोग्य सहाय्यक श्री जाधव राव साहेब, श्री धुमाळ रावसाहेब तसेच आरोग्य सहाय्यिका खाडे सिस्टर, तसेच लॅब टेक्निशियन श्री बंडगर आण्णा तसेच आरोग्य सेवक श्री एस.आर.बोंद्रे, श्री ए. एस.संकपाळ, श्री आर.बी.भोकरे तसेच आरोग्य सेविका एस.डी.कुंभार, तसेच आशा सेविका सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक उपस्थित होते

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...