*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान*
जून ते सप्टेंबर हा कालावधी डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असतो. हा कालावधी पारेषण काळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे मान्सून कालावधीत हवेत आर्द्रता अधिक असते. पावसाच्या कालावधीत डासांना अंडी घालण्यासाठी साचलेल्या पाण्यांची ठिकाणे, डबकी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. या कालावधीत सर्वत्र डासांचा उच्छाद सुरू असतो. एडिस एजिप्टाय, अॅनाफेलिस, क्युलेक्स या प्रमुख तीन डासांसह इतर डासही मोठ्या प्रमाणावर आढळतात.
*डासांचे आयुष्य& जीवन क्रम*
*अंडी अळी-कोष - डास*
हा जीवनक्रम ८ दिवसांचा असतो.
नर डास पाना, फुलांचा रस पितो, मादी डास मनुष्य, जनावरांचे रक्त शोषते.
मादी डासाचे आयुष्य २१ ते २७दिवस, नर डासाचे आयुष्य ५ दिवस असते.
मादी डास एकावेळी १५० ते २०० अंडी घालते. हे डास जीवन कालावधीत १ हजार ते २ हजार अंडी घालते.
एडिस एजिप्टाय डासाची मादी साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालते.
अॅनाफेलिस डासाची मादी साचलेल्या पाण्यात (डबकी वगैरे) अंडी घालते.
डास साधारणपणे ४ कि.मी. अंतरापर्यंत हवेतून उडत जाऊ शकतो.
डास १० मीटर उंचीपर्यंत उडतो. विशेष परिस्थितीत तो ४० ते १०० मीटर उंचीपर्यंत उडतो.
*पट्टेरी एडिस* : तिरकी अॅनाफेलिस
एडिस डास (टायगर मॉस्क्युटो) दिवसा चावतो. या डासांच्या पायावर, शरीरावर पांढरे पट्टे असतात. या डासाची अळी पाण्यात स्प्रिंगप्रमाणे हालचाल करते. या डासाच्या मादीपासून डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका या आजारांचा प्रसार होतो. बाधित रुग्णाला चावलेला हा डास निरोगी माणसाला चावल्यानंतर विषाणूचा प्रसार होतो. मलेरिया अर्थात हिवताप या आजारास अॅनाफेलिस डासाची मादी कारणीभूत आहे. अॅनाफेलिस डास ४५ अंश कोनात (तिरका) बसतो. पावसामुळे नगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभर डासांची घनता वाढू लागली आहे. दिवसा आणि रात्रीही डासांच्या झुंडी दिसून येतात. त्यामुळे आजाराचा धोका वाढला आहे.
*चिकुनगुनियाही ठरू शकतो घातक*
चिकुनगुनिया हा आजार विषाणूमुळे होतो. एडिस एजिप्टाय या डासाच्या मादीपासून त्याचा प्रसार होतो. तीव्र स्नायू आणि सांधेदुखीसह अचानक ताप येतो. चिकुनगुनिया तापामुळे काही टक्के रुग्णांमध्ये संधिवात होऊ शकतो. वृद्ध आणि कॉमोरबिड व्यक्तीसाटी घातक ठरू शकतो. विषाणूने दूषित असलेल्या एडिस एजिप्टाय या डासाची मादी चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांत चिकुनगुनियाची सुरुवात होते. सांधे व स्नायूदुखी या प्रमुख लक्षणासह डोकेदुखी, मळमळ, थकवा आणि पुरळ ही लक्षणेही असू शकतात. कोणताही उपचार किंवा लस नाही. वेदना, सूज आणि ताप यासारख्या लक्षणापासून मुक्त होण्यासाठीची औषधे दिली जातात. हा आजार १० ते १२ दिवस टिकतो आणि कमी होतो.
*कोरडा दिवस... तो का पाळायचा?*
अंड्यापासून डास तयार होण्याचा कालावधी (जीवनचक्र) ८ दिवसांचा आहे. हे जीवनचक्र तोडले तर डासांची उत्पत्ती थांबते. त्यासाठी आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळावा, असे आवाहन केले जाते. पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून घासून, पुसून कोरडी करणे म्हणजेच ड्राय डे. ड्राय डे पाळल्यास डासांचे जीवनचक्र तुटते. एडिस, एजिप्टाय डासाची अंडी पाणी साठवण्याच्या भांड्याच्या कडेला चिकटलेली असतात. ४ महिने ते वर्षभर ही अंडी त्याच अवस्थेत राहू शकतात. त्यानंतर त्यांना पाणी मिळाले तर त्यांचे जीवनचक्र सुरू होते. त्यामुळे पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा घासू-पुसून स्वच्छ व कोरडी करणे आवश्यक आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव चे
वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव सर, व डॉ. क्षितिजा पाटील मॅडम याच्या
मार्गदर्शना खाली
श्री पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव येथे
डास आळी प्रात्यक्षिक व गप्पी मासे दाखण्यात आले श्री देशमुख सर यानी प्रास्ताविक केले आरोग्य कर्मचारी यानी डेग्यु,चिकनगुण्या,मलेरिया किटक जन्य आजाराबाबत श्री पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव येथे जनजागृती व उपाय योजना बाबत माहिती सांगण्यात आली तेव्हा उपस्थित आरोग्य सहाय्यक श्री जाधव राव साहेब, श्री धुमाळ रावसाहेब तसेच आरोग्य सहाय्यिका खाडे सिस्टर, तसेच लॅब टेक्निशियन श्री बंडगर आण्णा तसेच आरोग्य सेवक श्री एस.आर.बोंद्रे, श्री ए. एस.संकपाळ, श्री आर.बी.भोकरे तसेच आरोग्य सेविका एस.डी.कुंभार, तसेच आशा सेविका सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा