कुमजाई पर्व प्रतिनिधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुमजाई पर्व प्रतिनिधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

घणसोली : आठवडे बाजारच्या विरोधात; तरुणांची सोशल मीडियावर जनजागृती


नवी मुंबई प्रतिनिधी

ब्रिटिश काळातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या घणसोली गावात आठवडे बाजारामुळे चोऱ्या माऱ्यांच्या प्रकार वाढले आहेत. वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृतपणे चालणारा घणसोलीतील संडे बाजार बंद करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना अलीकडेच एक निवेदन दिले आहे.

घणसोली सद्गुरू रुग्णालय, सरपंच दगडू चाहू पाटील चौक, गावदेवी मंदिर परिसर, साई सदानंदनगर ते डी-मार्ट मॉल परिसर, गावदेवीवाडी रोड ते स्वातंत्र्यसंग्राम चौकपर्यंत दर रविवारी आठवडे बाजार भरविला जातो.

रस्त्यावरच हा बाजार भरत असल्याने त्याचा फटका येथील दळणवळणाला बसत आहे. प्रत्येक रविवारी जवळपास अडीच हजार फेरीवाले येथील रस्त्यावर अतिक्रमण करतात. या गर्दीचा फायदा घेऊन काही आंबटशौकीन तरुणांकडून महिलांना धक्काबुक्की केली जाते. अनेकदा महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे जुजबी कारण देऊन महापालिकेचे अधिकारी कारवाईकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात याच आठवडे बाजारावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांनी तीन वेळा कारवाई केली होती. घणसोलीतील अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांचे या फेरीवाल्यांशी लागेबांधे असल्यामुळे त्यानंतर आजपर्यंत या आठवडे बाजारावर कारवाई करण्यात आली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

घणसोलीतील सरपंच दगडू चाहू पाटील चौकाला या फेरीवाल्यांनी अक्षरश: विळखा घातला आहे. दर रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत रस्त्यावरून चालताही येत नाही. एखाद्या वेळी गावात काही दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडी किवा पोलिसांच्या वाहनांनाही गर्दीतून वाट काढणे अवघड होणार आहे. संडे बाजारामुळे घरातून बाहेर जाणेही कठीण झाले आहे.

फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पालिकेच्या पोर्टलवर आठवडे बाजार कायमचा बंद करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आता गावातील तरुणपिढी पुढे सरसावली आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रत्यक्षात पाहणी करून बाजार त्वरित बंद करावा, किंवा वाहतूककोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन हा बाजार अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश पांडुरंग नाईक यांनी केली आहे.

शिद्रुकवाडी ता.पाटण,: शाळकरी मुलीवर धारदार शस्त्राने वार

ढेबेवाडी (पाटण) : प्रतिनिधी

शाळेत निघालेल्या  मुलीवर धारदार शस्त्राने सात वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना शिद्रुकवाडी (ता. पाटण) येथे घडली. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे विभागात खळबळ उडाली. हल्ल्यानंतर संशयीत हल्लेखोर ऊसाच्या शेतात पळून गेला.

इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी शिद्रुकवाडी येथील विद्यार्थ्यांनी खळे येथे शाळेसाठी निघाली होती. त्यावेळी शिद्रुकवाडी खळे या मार्गावर दबा धरून बसलेल्या एका हल्लेखोराने तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यावेळी तिने केलेल्या प्रतिकाराने हल्लेखोर पळून गेला. गंभीर जखमी झालेली मुलगी तशीच शाळेत गेल्यानंतर तिने हकीकत सांगितली.

त्यानंतर तिला ढेबेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शताब्दी रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम

मुंबई मानखुर्द कुमजाई पर्व प्रतिनिधी
 
राजकारणातील पितामह ,आधुनिक Kमहाराष्ट्राचे जनक आणि शेतकऱ्यांचे कैवारी, सह्याद्रीची उंचीही फिकी पडावी असे व्यक्तिमत्व, राजकारणाच्या अथांग सागरातील थोर युगपुरूष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा मा.खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोंवंडी येथील शताब्दी आणि ट्राम्बो येथील शहाजी रुग्णालयातील रुग्णांना मा. आ.नवाब मलिक साहेब यांच्या प्रेरणेने समाजसेविका मा. सना मलिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली रूग्णांना  फळे वाटप करण्यात आले. यावेळी  मा.सना मॅडम राष्ट्रवादी अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष मा.संजय कांबळे,युवा तालुका अध्यक्ष श्री. अभिजीत तळशीकर 
महिला तालुका अध्यक्क्षा सौ. गीताताई पाटील ,अणुशक्ती नगर मधील सर्व वार्ड अध्यक्ष  मा.ऍड तानाजी पवार सर  व सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते 

बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

बाल क्रीडा स्पर्धेतुन उज्वल भविष्य घडवणारे खेळाडू घडावेत : प्रा.सचिन पुजारी

तळमावले क्रीडा प्रतिनिधी कुमजाई पर्व

स्व. यशवंतराव चव्हाण केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धाच्या जि .प. प्राथ . शाळा रूवले येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .

विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा व बालक्रीडा स्पर्धा या सारख्या सुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळत आहे .
रूवले ता .पाटण येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर महिंद आणि बनपूरी या केंद्राच्या बालक्रीडा स्पर्धा उत्साहात नुकत्याच पार पडल्या . वैयक्तिक क्रीडा प्रकारात १००, २००, ४०० , ६०० , ८०० मी . धावणे बुद्धिबळ गोळाफेक थाळीफेक लांब उडी इ . तर सांघिक प्रकारात कबड्डी खोखो रस्सी खेच व ४x१०० रिले यांचा समावेश होता . शाळेचे मुख्याध्यापक श्री . सूर्यकांत मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली रुवले शाळेतील सर्व शिक्षकांनी दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली . कार्यक्रमास मा . हणमंतराव साळुंखे, सरपंच रुवले ,केंद्रप्रमुख मिलिंद कांबळे , श्री . माणिक खटावकर , सदस्य निर्मल ग्रामपंचायत कुंभारगाव, समाधान भालेकर , सदस्य ग्रा पं . रुवले , माजी सरपंच दगडू साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे परिसरातील गावांचे आजी माजी सदस्य, शिक्षण व क्रीडाप्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी दोन्ही केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी आपले योगदान दिले . महिंद केंद्रासाठी समन्वयक म्हणून श्री .शंकर मोहिते यांनी तर बनपूरी केंद्रासाठी श्री अशोक पाटील, ज. तु . गार्डे यांनी काम पाहिले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत श्री . सूर्यकांत मोकाशी यांनी केले सूत्रसंचालन श्री . भिंगारदेवे व अशोक पाटील यांनी केले .स्पर्धा संपले नंतर निकाल श्री गार्डे व श्री गोसावी यांनी जाहीर केला .आभार श्री नौशाद संदे यांनी व्यक्त केले .

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

ब्रेकिंग : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. तेलंगाणाचे पोलीस महानिरिक्षक जितेंद्र यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी कोर्टानं या चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस गुरुवारी रात्री ज्या ठिकाणी गुन्हा घडला होता त्या ठिकाणी घेऊन गेले होते.

"नेमकी काय आणि कशी घटना घडली याची माहिती घेत असताना आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला, त्यानंतर झालेल्या एन्काउंटरमध्ये चारही जण मारले गेले," असं एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

हैदराबादपासून 50 किमी अंतरावर असलेल्या चटनपल्ली गावात ही घटना घडली आहे.

घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कुटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.

टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.

थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला.

मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

त्यानंतर शमशाबाद पोलीसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता.

राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँकेच्या विलीनीकरणाचा विचार- जयंत पाटील

मुंबई : कुमजाई पर्व ऑनलाइन 
घोटाळ्यांमुळे निर्बंध लादण्यात आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-औपरेटिव्ह (पीएमसी) बँक आता राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनीच ही माहिती दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न करीत आहे. ही बँक राज्य सहकारी बँकेते विलीन करण्याचा विचार आहे. राज्य सरकारने तशी विचारणा राज्य सहकारी बँकेकडे केली आहे. तसेच पीएमसी बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्यासाठी राज्य सरकार रिझर्व्ह बँकेशीही चर्चा करेल.
देशभरात शाखा असलेल्या पीएमसी बॅँकेत साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दीड महिन्यापूर्वी रिझर्व्ह बॅँकेने बॅँकेवर निर्बंध आणले. त्यामुळे हजारो खातेदारांचे हाल सुरू झाले. पीएमसी बँकेच्या संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने एचडीआयएल कंपनीला ४३५५ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. बँकेने दिलेल्या एकूण कर्जाच्या ७0 टक्के रक्कम केवळ एचडीआयएलला देण्यात आली.
पीएमसी बँकेचा व्यवस्थापकीय संचालक, काही संचालक तसेच एचडीआयएल कंपनीचा प्रमुख व त्याचा मुलगा सध्या तुरुंगामध्ये आहेत. या बँकेच्या ७८ टक्के खातेदारांना त्यांच्या खात्यातील सर्व रक्कम काढण्याची मुभा मिळाली आहे, असे तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते. मात्र ज्यांच्या मोठ्या रकमा बँकेत आहेत, त्यांना पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. विवाह, मृत्यू, औषधोपचार आदी कारणांसाठी बँकेतून अधिक रक्कम काढणे आता शक्य असले तरी त्यासाठी अर्ज व पुरावे सादर करावे लागत आहेत.

'खातेदारांनी चिंता करू नये'
- पीएमसीमधील सामान्य खातेदारांच्या रक्षणासाठी सर्व प्रयत्न करेल, असे सांगून जयंत पाटील म्हणाले की, खातेदारांचे पैसे कोणत्याही स्थितीत बुडता कामा नयेत, अशीच आमची इच्छा आहे.
- पीएमसी बँकेचे विलिनीकरण झाल्यास सुमारे ९५ टक्के खातेदारांना मोठा दिलासा मिळू शकेल. अर्थात या प्रक्रियेला एक ते दीड महिन्याचा वेळ लागेल. मात्र खातेदारांनी चिंता करू नये, असे सरकारचे आवाहन आहे.

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

मराठा आरक्षणावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घ्या- आमदार शंभूराज देसाई


सातारा पाटण : कुमजाई पर्व प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या दंगली प्रकरणी युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली होती. या प्रकरणात मराठा युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने त्यांना त्रास होत आहे. ते गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई आता पुढे सरसावले आहेत

महाराष्ट्रात राज्यातील सकल मराठा समाजाला आरक्षण मुळे संदर्भात विविध पक्षांचे व संघटनाचा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली होती.

राज्यातील मराठा समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात केलेल्या आंदोलनामुळे या सर्वपक्षीय सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर दाखल झालेल्‍या गुन्ह्यांमुळे त्यांना त्रास होत आहे. ते गुन्हे मागे घ्यावेत अशा आशयाचं पत्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.


मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

PMC बँक प्रकरण : तीन संचालकांना अटक

मुंबई कुमजाई पर्व ऑनलाइन 
पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज बँकेच्या तीन संचालकांना अटक केली आहे. जगदीश मुखे, मुक्ति बावीसी आणि तृप्ती बने अशी त्यांची नावं आहेत. त्यांना उद्या मुंबई न्यायालायात हजर केले जाणार आहे.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे.

पीएमसी बँकेच्या सुमारे ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण ठेव काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

याचबरोबर एकावेळी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती आज लोकसभेत अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, रिझर्व्ह बँकेबरोबर सकारात्मक समन्वयाद्वारे याबाबत सरकार पावलं उचलत आहे. तसेच, अचानक आरोग्य विषयक उद्भवलेली गंभीर स्थिती, लग्न समारंभ, शिक्षणातील अडचणी आदी प्रसंगी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना खात्यातून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देखील असल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी दिली होती.

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...