ढेबेवाडी (पाटण) : प्रतिनिधी
शाळेत निघालेल्या मुलीवर धारदार शस्त्राने सात वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना शिद्रुकवाडी (ता. पाटण) येथे घडली. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे विभागात खळबळ उडाली. हल्ल्यानंतर संशयीत हल्लेखोर ऊसाच्या शेतात पळून गेला.
इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी शिद्रुकवाडी येथील विद्यार्थ्यांनी खळे येथे शाळेसाठी निघाली होती. त्यावेळी शिद्रुकवाडी खळे या मार्गावर दबा धरून बसलेल्या एका हल्लेखोराने तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यावेळी तिने केलेल्या प्रतिकाराने हल्लेखोर पळून गेला. गंभीर जखमी झालेली मुलगी तशीच शाळेत गेल्यानंतर तिने हकीकत सांगितली.
त्यानंतर तिला ढेबेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
त्या हेल्लेखोरावर लवकरात लवकर कडक कारवाई करायला हवी.
उत्तर द्याहटवा