मुंबई :प्रतिनिधी :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे गृह आणि नगरविकास ही दोन्ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे आली आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास खातं असेल. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जलसंपदा खातं असेल. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि ऊर्जा मंत्रालय असेल.
मागील दोन दिवसांपासून गृह खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिलं अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवलं आहे.
एकनाथ शिंदे
गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
छगन भुजबळ
ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्रक विकास, सामजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन
बाळासाहेब थोरात
महसूल, ऊर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर?
दरम्यान, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अधिवेशनात महाविकासआघाडीचे केवळ सहा मंत्रीच दिसतील. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची आशा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा