संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५
ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ गवत कापणाऱ्या महिलेवर अचानक झडप; हाताला गंभीर दुखापत
ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
गवत कापणाऱ्या महिलेवर अचानक झडप; हाताला गंभीर दुखापत.
ढेबेवाडी (ता. पाटण) : तालुक्यातील भालेकरवाडी (बनपुरी) गावालगतच्या शिवारात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्याने गवत कापत असलेल्या महिलेवर अचानक झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मालन खाशाबा भालेकर (वय ६५) या महिला गंभीर जखमी झाल्या असून, सुदैवाने त्या मोठ्या अनर्थातून बचावल्या आहेत.
मालन भालेकर या सकाळच्या सुमारास जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शिवारात गेल्या होत्या. गवत कापण्याचे काम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या हातावर जोरदार चावा घेतल्याने हाताचा लचकाच तोडल्यासारखी गंभीर जखम झाली. अचानक झालेल्या हल्ल्याने त्या घाबरून गेल्या, मात्र त्यांनी धैर्याने आरडाओरडा सुरू केला.
त्यांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या शिवारात काम करणारे शेतकरी मदतीसाठी धावले. शेतकऱ्यांची चाहूल लागताच बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत मालन भालेकर यांना तत्काळ पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे भालेकरवाडी, बनपुरी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवारात मोकाटपणे फिरणाऱ्या बिबट्यामुळे शेतकरी, महिला व मजूर यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यापूर्वीही या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या असून, आजच्या हल्ल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.
परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत तसेच गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार व प्रभावी करण्याच्या दृष्टीने हेळगाव .येथे जनआरोग्य समितीची बैठक उत्साहात पार पडली.
सदर बैठकीस जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे व विविध गावचे सरपंच जन आरोग्य समितीचे सदस्य व हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
-
साप्ताहिक कुमजाई पर्व सविस्तर बातमी: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरातील दख्खन (कळकदरा) येथे ३१ मार्च रोजी घड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा