मंगळवार, २३ जून, २०२६

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई -
यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीडा या विभागातून यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेची अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये नावीन्यपूर्ण विविध उपक्रम राबवले जातात. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे  हे नववे वर्ष आहे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या निमित्ताने करण्यात येतो.

नवी मुंबई या ठिकाणी 15 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 5 वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा सामाजिक निशिगंधा कापडणीस, माधवी सूर्यवंशी ,अर्चना सदरे, नारायण म्हात्रे ,मेघा शिंपी , संध्या माने ,रमेश पाटील, आदित्य मोरे ,शरद निकम उद्योजक विभागातून अनिकेत पोखरकर, नितीन भोसले ,दीपक कोकाटे, संजय पाटील, रुपेश कोलते, ओमकार शिंदे, सचिन पवार क्रीडा विभागातून नमिता पाटील, राहुल पाटील वैद्यकीय सेवा विभागातून विशाल पाटील शिक्षण विभागातून भरत ढेरे कलाक्षेत्रातून नम्रता पाटील, शुभ्रा भोसले साहित्य क्षेत्रातून डॉक्टर सुनिता चव्हाण, सचिन अवघडे, बाळकृष्ण पाटील, संजय नायकवडी, पुनम खंडागळे पत्रकार क्षेत्रातून बबलू पेशकर आदी मान्यवरांचा  गौरव होणार आहे. सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे यांनी यशस्वी उद्योजक मुलाला घडवल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

रविवार, १४ जून, २०२६

*महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचा माने परिवाराकडून सन्मान*


तळमावले/प्रतिनिधी :
माणसाच्या आयुष्यातील ७५ वे वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सव हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. या आनंदाला सामाजिक कृतज्ञतेची जोड देत मान्याचीवाडी ( कुंभारगाव ) येथील माने परिवाराने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. विष्णु कृष्णा माने यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार' मिळाल्याबद्दल पत्रकार संदीप डाकवे यांचा माने परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

विष्णु कृष्णा माने यांनी आपल्या आयुष्याची ७५ यशस्वी वर्षे पूर्ण केल्याबद्दल माने परिवाराने एका भव्य आणि कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात कला, साहित्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी अखंडपणे झटणाऱ्या संदीप डाकवे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. माने परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. डाकवे यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कौटुंबिक सोहळ्याला सामाजिक चळवळीची जोड दिल्याबद्दल परिसरामध्ये माने परिवाराचे कौतुक होत आहे. याप्रसंगी विष्णू माने, जिजाबाई माने, शरद माने, रेश्मा माने, प्रदीप माने व जयश्री माने यांच्यासह मान्याचीवाडीतील ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कृतज्ञतेने भारावलो : संदीप डाकवे
सत्काराला उत्तर देताना संदीप डाकवे भावुक झाले. ते म्हणाले, "विष्णु माने यांच्या अमृतमहोत्सवासारख्या अत्यंत पवित्र आणि कौटुंबिक सोहळ्यात माने परिवाराने माझ्या कार्याची दखल घेतली, हा माझ्यासाठी खूप मोलाचा क्षण आहे. या आपुलकीच्या सन्मानामुळे समाजात आणखी जोमाने कार्य करण्याची मोठी ऊर्जा मला मिळाली आहे."

गुरुवार, ११ जून, २०२६

*२० जूनपासून पाटण मतदारसंघात 'एसआयआर' (SIR) मोहीम; उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांची माहिती.* *मतदारयादी शुद्धीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – प्रांताधिकारी*



केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे शुद्धीकरण, अद्ययावतीकरण व त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ जाहीर केला आहे.महाराष्ट्रात या मोहिमेस २० जूनपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नव्या पात्र मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह बनविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २० ते २९ जून या कालावधीत गणना प्रपत्रांची छपाई, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच अन्य पूर्वतयारीची कामे केली जाणार आहेत. ३० जून ते २९ जुलै 2026 या कालावधीत २६१ पाटण विधानसभा मतदारसंघातील ४२४ मतदान केंद्रांवरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्रांचे वाटप करणार आहेत.

संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने हे प्रपत्र भरून द्यावयाचे असून त्यामधील माहितीच्या आधारे मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यात येणार आहे. भरलेली प्रपत्रे पुन्हा बीएलओंकडून संकलित केली जाणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही केले जाणार असून नवीन मतदान केंद्रांची निर्मिती, केंद्रांचे विलीनीकरण तसेच मतदान केंद्रांच्या नावात किंवा ठिकाणात आवश्यक बदल करण्यात येणार आहे.

२९ जुलै 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांच्या आधारे ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा ३ ऑक्टोबरपर्यंत केला जाणार असून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एसआयआर मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सन २००२ च्या मतदार यादीशी विद्यमान मतदारांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख ९ हजार २२६ मतदारांपैकी २ लाख ७३ हजार ८५४ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून हे प्रमाण ८८.५६ टक्के इतके आहे. मात्र अद्याप ३५ हजार ३७२ मतदारांचे मॅपिंग पूर्ण होणे बाकी असल्याची माहिती टोम्पे यांनी दिली. सन २००२ मध्ये अन्यत्र वास्तव्यास असलेल्या मतदारांची जुनी नोंद उपलब्ध न होणे तसेच विवाहानंतर सासरी आलेल्या महिला व नवविवाहितांकडून माहेरच्या मतदार यादीतील नातेवाइकांची माहिती उपलब्ध न होणे, ही मॅपिंग प्रक्रियेतील प्रमुख अडचण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदारयादी शुद्धीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – प्रांताधिकारी सोपान टोम्पे

मतदारयादी शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही त्यांनी तातडीने संबंधित बीएलओंशी संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच कुटुंबातील मयत, दुबार अथवा स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. मतदार यादीतील अचूकता वाढविणे आणि लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देणे हा या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश असून, सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी केले आहे.


मंगळवार, २ जून, २०२६

*जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*

*🏆 जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*
कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि जिंकण्याची जिद्द यांच्या बळावर मुंबईच्या चार कन्यांनी आसामच्या भूमीवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. आसाम येथे आयोजित करण्यात आलेल्या ३ऱ्या साऊथ आशियाई मर्दानी स्पोर्ट्स स्पर्धा तसेच ६व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत देवकर फिटनेस अँड स्पोर्ट्स क्लब, मुंबई आणि मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई शहर यांच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण १६ पदकांची कमाई केली. त्यांच्या या यशामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मर्दानी स्पोर्ट्स आणि पारंपरिक मर्दानी तसेच कराटे कुमिते आणि कराटे काता अश्या ४ प्रकार मध्ये स्पर्धेत *वैदेही घोलप* हिने २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक जिंकत सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरी केली. *रिया सिंग* हिने २ सुवर्ण व २ कांस्य पदकांची कमाई करत आपले कौशल्य सिद्ध केले. *अंजली दुबे* हिने १ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले, तर *तृष्णा राऊत* हिने २ सुवर्ण व २ कांस्य पदके जिंकून स्पर्धेत आपला ठसा उमटवला.

मर्दानी स्पोर्ट्स आणि कराटे या दोन्ही प्रकारांमध्ये या विद्यार्थीनींनी दाखवलेली शिस्त, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती विशेष कौतुकास्पद ठरली. देशातील आणि दक्षिण आशियातील विविध राज्ये व देशांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांवर आपली मोहोर उमटवली.

या यशामागे प्रशिक्षक ऋषिकेश देवकर, श्रेयस खेडेकर, गणेश शिखरे आणि वैष्णवी कोकाटे यांचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे हे यशस्वी फलित असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाचे सचिव संतोष खंदारे तसेच तांत्रिक संचालक केतन आंधळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारे यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

मुंबईच्या या जिद्दी कन्यांनी मिळवलेले यश हे केवळ पदकांपुरते मर्यादित नसून, ते युवा पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारे आहे. त्यांची मेहनत, समर्पण आणि चिकाटी अनेक नवोदित खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या यशामुळे मुंबई शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव अधिक उंचावला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*मोरेवाडी हादरली! घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा धुडगूस, दोन गाभण शेळ्यांचा खात्मा,*

कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026  चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे  सोमवारी रात्रीच्य...