कुमजाई पर्व ऑनलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुमजाई पर्व ऑनलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

कुंभारगाव ता.पाटण ;- वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पाटण : तालुक्यातील कुंभारगाव मान्याचीवाडी येथे समाजसेवक मा.चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री भैरवनाथ गणेश मंडळ व ग्रामस्थ मंडळ चाळकेवडी यांच्या सहकार्याने कुंभारगाव परिसरातील सुमारे 250 गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
डॉ.दिलीप चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमला सुरवात झाली.
 याप्रसंगी डॉ. दिलीप चव्हाण, सुभाष बावडेकर,अमित शेटे,सुरेश पवार, पांडुरंग जाधव, विशाल चाळके, रघुनाथ माटेकर,राहुल पेंढारकर दिनेश मोळावडे,दिलीप घाडगे,भरत चाळके,
सौ. नंदाताई चाळके, सरपंच चाळकेवाडी इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गुढेकर यांनी केले व  संजय सावंत यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



मनसेचा वर्धापन दिन यंदा नवी मुंबईत

मुंबई ;- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आता १४ व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. पण यावर्षी वर्धापन दिन जरी दरवर्षी प्रमाणे असला तरी यंदाचा वर्धापन दिन हा नवी मुंबईत साजरा करण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत असून, तशी अंतर्गत चर्चा सध्या मनसेमध्ये सुरू आहे. नवी मुंबई महानगर पालिका डोळ्यासमोर ठेवूनच राज ठाकरे वर्धापन दिन नवी मुंबईमध्ये साजरा करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे

झेंड्याचा रंग बदलल्या नंतर पहिलाच वर्धापन

दरम्यान, मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा झाल्यानंतर मनसेचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे.तसेच यंदा मनसेचा १४ वा वर्धापन दिन असून, हिंदुत्वाचा नवा विचार घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर जे काही राजकीय नाट्य घडले त्याच्यावर मी सविस्तर बोलेन असे सांगितले होते. त्यामुळे राज ठाकरे मनसेचा वर्धापन दिनी काय राजकीय चिडफाड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता मनसेचे कार्यक्रम मुंबई बाहेरही होणार

विशेष बाब म्हणजे, जसे मनसेचे कार्यक्रम हे नेहमी मुंबईमध्ये होत असतात तसेच कार्यक्रम आता महाराष्ट्रातील इतर भागात देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर मराठी भाषा दिन कार्यक्रम हा ठाण्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

कर्जमाफीची दुसरी यादी 28 तारखेला जाहीर केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच सरकार पुढे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.दरम्यान, ठाकरे सरकारच्या योजना उघड्या डोळ्यांनी विरोधी पक्षांनी बघाव्या, असा चिमटा देखील उद्धव यांनी यावेळी भाजपला काढला.

पिंपरखेड (ता. शिरूर) ; दयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

टाकळी हाजी -पोलीस सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद हरिश्‍चंद्र ढोमे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दयानंद ढोमे यांना दोनवेळा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. पोलीस सेवेमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रायगड, सातारा, पुणे, कोल्हापूर येथे उत्कृष्ट सेवा करून आतापर्यंत त्यांना 621 पदके मिळाली आहेत.
तसेच राज्यस्तरीय पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व विविध पुरस्कार मिळाले आहेत. तंटामुक्ती अभियान उत्कृष्टरित्या सातारा येथे राबविल्याने माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.गुन्हे अन्वेषण विभाग, दारूबंदी, विविध गुन्ह्यांचा तपास, तंटामुक्ती, कायदा सुव्यवस्था या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचे हस्ते राष्ट्रपती पदक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील व पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल उपस्थित होते.याप्रसंगी सौ. मंदाताई रामदास बोंबे सरपंच ग्रामपंचायत पिंपरखेड, ग्रामस्थ आणि समाजसेवक श्री रामदासशेठ बोंबे यांनी श्री ढोमे साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भोर नसरापूर ;- प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे हाल आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून सेविका गायब

नसरापूर - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालयास कुलूप असल्याने नाहक त्रास सहन करत खासगी रुग्णवाहिका करून भोर रुग्णालयात जावे लागले. या वेळी कामावर असताना आरोग्य केंद्राला कुलूप लावून घरी निघून गेलेल्या आरोग्य सेविकेला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा मागितला असून, निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावली आहे.
माळेगाव (ता. भोर) येथील कविता काशिनाथ खडाखडे या महिलेस रात्रीच्या वेळी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना नसरापूर प्राथमिक केंद्रात आणले. मात्र, आरोग्य केंद्रास कुलूप लावलेले होते. त्या वेळी कामावर असलेल्या आरोग्य सेविका विद्या हेम्बाडे या कुलूप लावून घरी निघून गेल्या होत्या.

नातेवाइकांनी त्यांना फोन करून बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे भोर ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. आरोग्य केंद्रास चक्क कुलूप ठोकून घरी निघून गेलेल्या आरोग्य सेविकेबद्दल नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती लहुनाना शेलार यांनी केली आहे.

याबाबत रुग्ण महिलेचे भाऊ दौलत कोळी यांनी सांगितले की, त्या दिवशी दुपारीच आम्ही माझ्या गर्भवती बहिणीस नसरापूर आरोग्य केंद्रात आणले होते. त्या वेळी सोनोग्राफीसाठी भोरला पाठविण्यात आले. भोर येथे उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी केल्यावर आम्हाला प्रसूतीसाठी अजून दोन दिवस वेळ असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही घरी परतलो. मात्र, रात्रीच्या नऊ वाजण्याच्या सुमारास बहिणीस प्रसूतिवेदना होऊ लागल्याने आम्ही तातडीने नसरापूर आरोग्य केंद्रात नेले. तिथे आरोग्य केंद्रास कुलूप होते व आमची दखल घेतली नाही. शेवटी खासगी रुग्णवाहिकेने भोर उपजिल्हा रुग्णालयात जावे लागले.


शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

उद्योजक सर्जेराव यादव,तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना मानाचा अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण‘ पुरस्कार घोषित

इस्लामपूर /प्रतिनिधी

येथील लोकराज्य विद्या फाँडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचे अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण‘ पुरस्कार उद्योजक सर्जेराव यादव व तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना घोषित केले आहेत

शनिवार दि२९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे व राज्याचे माजी मंत्रीजेष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती फौडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी दिली.

शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सांगली रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरमधील सार्वजनिक स्मशानभूमीत हा समारंभ होणार आहेफौंडेशनने गेल्या दोन वर्षात स्मशानभूमींची स्वच्छता करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवून अंधश्रध्दा निर्मूलनाचेही काम केले आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी आभगवानराव साळुखेनगराध्यक्ष निशिकांत पाटील,पक्षप्रतोद विक्रम पाटीलनगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवारपोतदारसंजय पाटीलढोबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेहा समारंभ यशस्वीतेसाठी फाँडशनचे अध्यक्ष सुवर्णा कोळेकरउपाध्यक्ष मानसिंग ठोंबरेसदस्य आशा तांदळे यांच्यासह अन्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

धामणीत बिबट्या हाय. मुक्कामी

ढेबेवाडी - धामणी (ता. पाटण) येथे भरवस्तीत बिबट्याचा संचार वाढला आहे. योगेश सावंत यांच्या घरासमोर बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले.

विशेष म्हणजे बिबट्यासोबत एक बछडा असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. बिबट्या लोकवस्तीत आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. तेंव्हा एक बिबट्या त्या परिसरात वावरत होता. तो ये-जा करणाऱ्या वाहन चालक व दुचाकीस्वारांना दिसत होता. त्यामुळे वाहनधारक रात्रीच्या सुमारास त्या मार्गावरून जीव मुठीत धरुन प्रवास करत होते. तेंव्हापासून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर वाढला आहे. योगेश सावंत यांच्या घरासमोरच भरवस्तीत रात्री साडे आठच्या सुमारास त्याचे बछड्यासह दर्शन झाले. दुसऱ्या दिवशी प्रकाश महाजन यांच्या भरवस्तीतील घरासमोर पुन्हा त्याचे दर्शन झाले. बिबट्याचे लोकवस्तीत वारंवार दर्शन होऊ लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

येथील अजय सावंत हे आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना रस्त्यात त्यांच्या गाडीसमोरच बिबट्या उभा राहिला. ते थांबले तेंव्हा बिबट्याने गुरगुरत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर तो निघून गेला. यामुळे विभागात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची कल्पना ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये या परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यात आता गवा रेड्यांचा कळप शेतात घुसून उभ्या पिकांची नासाडी करू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडूनही पंचनामे करण्यापलीकडे उपाययोजना झाल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.वन विभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सभापती संगीता पुजारी यांनी केली आहे.


पाटीलवाडी रुवले ता.पाटण श्री दत्त मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा

रुवले ता.पाटण;-
वाल्मिकी ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गुरुवर्य प.पूज्य सदगुरु श्री सोनाजी महाराज संकल्पित  पाटीलवाडी,रुवले ता.पाटण येथे  श्री।सदगुरु दत्त सेवा संस्था (रामचंद्र नगर ठाणे ) यांच्या योगदानाने भव्य मांदिर बांधण्याचा  संकल्प केला व तो पूर्णत्वास नेला. 
या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमचा  शुभारंभ मंगळवार दि.२५ रोजी सकाळी स्थलशुद्धी,श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, श्री मूर्ती अभिषेक, श्रीच्या मूर्तीची मिरवणूक, जलाधिवास,धान्यादिवास, करून होणार आहे रात्रौ ९.०० वाजता ह.भ.प.श्री संदीप महाराज कोळेकर ( नेहरू टेकडी) यांचे प्रासादिक कीर्तन होणार आहे 
बुधवार दि.२६.रोजी सकाळी ७.३० वाजता मुख्य देवता पूजन,होमहवन, मुर्ती प्राणप्रतिष्ठा,व ११.३० वाजता कलशारोहन सोहळा प.पु.गगनगिरी महाराज आश्रम ढाणकळ मठाधीपती (कोयना धरण) प.पु.स्वामी मयेकर महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे व दुपारी १२.३०वाजता पूर्णाहुती विधी होणार आहे.
त्यानंतर दुपारी १.०० वा.महाआरती होईल व दुपारी २.००वा. महाप्रसाद होणार आहे
तरी आपण सहकुटुंब,सहपरिवार उपस्थित राहून ह्या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री।सदगुरु दत्त सेवा संस्था (रामचंद्र नगर ठाणे ) दत्तभक्त,सेवेकरीआणि ग्रामस्थ
मंडळ पाटीलवाडी,रुवले यांच्या वतीने करण्यात आले आहे 

मालदनचा बंदरा धोकादायक स्थितीत

मालदन, ता. पाटण येथे वांग नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंधार्‍याच्या बांधकामाची पडझड झाली आहे. त्यामुळे बंधारा धोकादायक बनला आहे. या बंधार्‍याची कृष्णा खोरे महामंडळाने तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा भविष्यात बंधारा वाहून जाऊन मालदनसह अनेक गावांना उन्हाळ्यात गंभीर पाणी टंचाई 
होऊ शकते.
मालदन येथील वांग नदीवर कृष्णा खोरे विकास महामंडळाने काही वर्षापूर्वी कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधला आहे. या बंधार्‍यामुळे मालदन, गुढे, मान्याचीवाडी परिसरातील अनेक छोट्या मोठ्या गावातील शेकडो एकर शेती बारमाही पाण्याखाली आलेली आहे.
शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने शेती फायदेशीर झाली आहे . अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न देखील या बंधार्‍यामुळे सुटला आहे. परंतु यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व महापुराने या बंधार्‍याला दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. यामधून सातत्याने पाण्याचा निचरा होवू लागला आहे. पाण्याच्या प्रवाहाने बांधकामास पडलेले भगदाड दिवसेंदिवस मोठे होत असून गळीतीचे प्रमाण वाढत आहे. शिवाय बंधार्‍याच्या दक्षिण बाजूस असलेल्या संरक्षण भिंतीचे देखील महापुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भिंतीचे बांधकाम पडले आहे.

वांग- मराठवाडी आणि महिंद धरणातून सोडलेले पाणी गळतीमुळे जास्त काळ टिकत नसल्याने काही दिवसातच नदीचे पात्र कोरडे पडत आहे. फेब्रुवारीत पाण्याची ही अवस्था असेल तर पुढील तीन महिने पाणी पुरणार कसे, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आवासून उभा आहे.

पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्‍याचे पिलर खिळखिळे झाले आहेत. बंधार्‍यास मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी बंधरा वाहून जाऊ शकतो अशी भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. शिवाय बंधार्‍यातून लागलेली गळती न थांबवल्यास येणार्‍या उन्हाळ्यात पाणी साठवणीवर सुध्दा मोठा परिणाम होऊ शकतो. कृष्णा खोरे महामंडळाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने बंधार्‍याच्या बांधकामाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात बंधार्‍याचा फक्त सांगाडा उरेल अशी भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे या परिसरातील गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी करत आहेत



ढेबेवाडी भोसगव ; वन्यप्राण्यांचा धुमाकूळ -अडीचशे एकरांत नुकसान : रानडुक्कर, गव्यांचा उपद्रव वाढला

सणबूर : रानडुक्कर आणि गव्यांच्या कळपांनी ढेबेवाडी विभागातील भोसगाव येथील शेतशिवार परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महिनाभरातच सुमारे अडीचशे एकरांतील रब्बी ज्वारीचे पीक त्यांनी फस्त केल्याचे वनविभागाकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती आभाळ कोसळल्यासारखी झाली आहे.
जवळपास खाद्य उपलब्ध होत नसल्याने वन्यप्राण्यांनी आजूबाजूच्या सपाटीच्या गावांकडे मोर्चा वळविला आहे. तेथील शेती वाचवतानाही शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. काळगाव परिसरात सध्या गव्यांचा तर ढेबेवाडी खोऱ्यात रानडुकरांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रब्बी ज्वारीचे पीक काढणीला आले असतानाच शिवारेच्या शिवारे रातोरात फस्त होऊ लागल्याने तोंडचा घास हिरावल्यासारखी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्र्रवाने हैराण झालेल्या ढेबेवाडीतील डोंगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रामराम ठोकल्याने पडीक क्षेत्र वर्षागणिक वाढत चालले आहे.

वन्यप्राण्यांच्या उपद्र्रवाने हा हंगामही वाया गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुक्कर जुमानत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतक-यांची शिवारे लांब आणि अडवळणीच्या ठिकाणी असल्याने रात्री तेथे राखणीला थांबणे शक्य होत नाही.

सकाळी पाहावे लागते उद्ध्वस्त पीक
शेतातील काम आटोपल्यानंतर शेतकरी घराकडे जातात. त्यावेळी पीक चांगले असते. मात्र दुसऱ्या दिवशी शेतात येताच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त पीक पाहून धक्का बसतो. वन्यप्राणी रात्रीत पिकाची पूर्णत: नासाडी करतात.

खरिपातील ज्वारीचे पीक पावसामुळे हातातून गेल्याने सर्व आशा रब्बी ज्वारीवरच होत्या; पण काढणीला आठवडा उरला असतानाच एकरातील ज्वारीचे पीक रानडुकरांनी रातोरात फस्त केले.
- किरण देशमुख, नुकसानग्रस्त शेतकरी, भोसगाव

वनविभागाच्या कार्यालयाकडे पीक नुकसानीच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जात आहेत.
- एस. एस. राऊत, वनपाल

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

पिंपळगाव रोठा ता.पारनेर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

पारनेर, 21 फेब्रुवारी - शिवाच्या नामाने जीवनाचे कल्याण होते. धर्म टिकला, संस्कार टिकला तरच आपण टिकणार आहोत. लंकाधिपती रावण म्हणत संसार चांगला, परमार्थ वाईट, संत तुकाराम म्हणत परमार्थ चांगला.पण संसार वाईट,नाथ महाराज म्हणत संसार चांगला,परमार्थही चांगला तर सामान्य मनुष्य म्हणतो परमार्थ वाईट व संसारही वाईट म्हणून प्रत्येक ठिकाणी परमार्थ पाहावा, असे प्रतिपादन ह.भ.प.शारदा सूर्यवंशी यांनी केले.
श्री त्र्यंबकेश्वर महादेव देवस्थान पिंपळगाव रोठा ता.पारनेर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला महाशिवरात्री निमित्त परिसरातील हजारो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेत विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.येथील देवस्थान पुरातन असुन सुर्याचे पहिले किरण येथील पिंडीवर पडतात.सकाळी ६ वाजता महादेवाची पूजा अभिषेक आरती झाल्यानंतर सकाळी १० वाजता कोरठण देवस्थानचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड यांच्या मातोश्री उल्हासाबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ ह.भ.प. शारदा सूर्यवंशी यांचे शिवभक्ती महिमा यावर किर्तन झाले

शाहूवाडीचे शेतकरी करणार मुंबईत आंदोलन...

कोल्हापूर शाहूवाडी;- 
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेती पिकांचे वन्यजीवांकडून नुकसान होते. काही वेळा वन्यजीवांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होतात. त्यामुळे यंदाच्या हंगामात जवळपास तीनशे हेक्‍टर जमीन नापिक ठेवली आहे. यात केवळ वन्यजीवांच्या उपद्रवाला त्रासूनही शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची दखल वन्यजीव विभागाने घेतली नसल्याने याबाबत दाद मागण्यासाठी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेती वाचवा जनसंघर्ष कृती समितीतर्फे आंदोलनाची तयारी सुरू आहे.
शाहूवाडी तालुक्‍यातील उखळू नावाचे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे.

उखळू, आंबाईवाडा परिसरापासून पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची हद्द सुरू होते. गावानजीक जंगल आहे. तेथील गवे, माकडे, रान डुक्कर, मोर प्रकल्पाजवळील शेतीत येतात. पूर्णवाढ झालेले किंवा कोवळे पीक खाऊन टाकतात. अशात रात्री शेतीची राखण करण्यास जाणेही धोकादायक बनते. कारण गव्यांचा कळप असतो, किंवा एखादा गवाही रस्त्यात, शेतीत कधीही येऊ शकतो. एकट्यादुकट्या व्यक्तींवर अशा वन्यजीवांकडून हल्ले होतात तर बिबट्यांचाही वावर या परिसरात आहे. त्यामुळे भीतीने शेतीची राखण करणेही मुश्‍कील होते. त्यातूनही कोणी चिकाटीने शेती केली तर वन्यजीवांकडून नुकसान झाल्यास विविध कागदोपत्री पुरावे द्यावे लागतात, पंचनामा होतो. त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर नुकसानभरपाई मिळते. यात अनेकदा जितका शेतीला खर्च झाला त्यापेक्षा निम्मी अधिक रक्कम मिळाल्याचा अनुभवही काही शेतकऱ्यांनी घेतला आहे.

तीन महिन्यांत कोल्हापुरात नाईट लँडिंग....

हा मनस्ताप टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी ठरवून पीक घेतले नाही. त्यामुळे उखळू नजीकच्या दोन गावात जवळपास २५० हेक्‍टर जमिनी पडिक ठेवली गेली. शेतकऱ्यांनी वन्यजीव विभागाकडे दाद मागतली. मात्र, त्याची दखल घेतली नाही म्हणून शाहूवाडी तालुक्‍यातील अन्य गावातील जंगला नजीकच्या शेतीत वन्यजीवांकडून नुकसान होते अशा सात ते आठ गावातील शेतकरी एकत्र येऊन सर्वजन एकत्र वनमंत्र्यांकडे दाद मागणार आहेत. त्यासाठी मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. त्याचे नियोजन होत आहे. त्यानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे आंदोलन होईल.

शेती वाचवा जनसंघर्ष कृती समितीतर्फे वन्यजीवांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत वन्यजीव विभागाकडे दाद मागण्यात येणार आहे. या समितीत परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आहेत. भागातील बहुतेक शेतकऱ्यांच्या घरातील एखादी व्यक्ती रोजगारासाठी मुंबईत आहे. त्यांचीही शेतजमीन येथील जंगलानजीकच्या गावात आहे. त्यामुळे त्या व्यक्तींच्या सहभागाने मुंबईत आंदोलन होणार आहे.
हरीष कांबळे, निमंत्रक, कृती समिती

काळगाव,भरेवाडीवर आत्ता "CCTV" ची नजर

काळगाव,ता.पाटण ;- 
गाव परिसरात वाढत असलेली गुन्हेगारी ही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्हींचा उपयोग होतो. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला आळा बसू शकतो
 हे लक्षात घेऊन काळगाव येथे ढेबेवाडी पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक मा.श्री.उत्तमराव भजनावळे साहेब यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत काळगाव यांच्या यांच्याकडून काळगाव गाव परिसरात CCTV आणि भरेवाडी फाटा येथे प्रत्येकी 1 या प्रमाणे दोन 120 वॅट चे 4 LED बल्प हायमास्ट बसवण्यात आले आणि अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काळगाव यांच्या वतीने भरेवाडी फाटा येथे CCTV बसवण्यात आले.तरी या कामासाठी ग्रामविकास अधिकारी काळगाव,सरपंच,सदस्य तसेच अष्टविनायक पतसंस्था यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.ह्या ठिकाणी CCTV  बसवल्यामुळे चोरी व इतर गैरप्रकारांना नक्की आळा बसेल अशी माहिती श्री.नितीन पाटील पोलीस पाटील काळगाव यांनी "कुमजाई पर्व" शी बोलताना दिली

ढेबेवाडी ;- वांग खोऱ्याची मराठी फिल्म इंडस्ट्रीजला भुरळ अभिनेते मकरंद अनासपुरे यांची उमरकांचन गावास भेट


ढेबेवाडी सणबूर -
गेल्या काही महिन्यांपासून ढेबेवाडी जवळील मालदन या गावांमध्ये 'प्रेमी' या मराठी चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल. एवढेच काय तर वांग मराठवाडी धरणाच्या जलाशयालगत असलेल्या उमरकांचन या गावांमध्ये 'टफ' या मराठी चित्रपटाचे शुटिंग सुरू होत असून त्यांची तयारी पाहण्यासाठी स्वतः मकरंद अनासपुरे यांनी उमरकांचन गावाला भेट दिली. एकूणच निसर्गरम्य वांग खोऱ्याची मराठी फिल्म इंडस्ट्रीजला भुरळ पडली असल्याचे यावरून दिसून येते

अभिनेते मकरंद अनासपुरे यांची उमरकांचन गावास भेट

म्हसवड महाशिवरात्री ;-भाविकांना उद्या भुयारातील शिवलिंगाचे दर्शनाची संधी

म्हसवड :-
 महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्‍वरी देवस्थान मंदिरामधील मुख्य गाभाऱ्यामधील "श्रीं'च्या मूर्तीखाली वर्षभर कुलूपबंद असलेल्या भुयारामधील शिवलिंग रात्री दहा वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. वर्षातून एकदाच तेही शिवरात्रीस या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळत असल्यामुळे दूरगावचे प्रत्येक वर्षी शिवरात्रीस सुमारे दहा हजार भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या दर्शनासाठी वाढत्या संख्येने होणाऱ्या गर्दीमुळे यंदा भाविकांसाठी नवीन प्रशस्त बांधकाम केलेल्या दर्शन बारीतून जलद गतीने भुयारात प्रवेशासाठी मंदिर ट्रस्टीने व्यवस्था केली आहे.
श्री सिद्धनाथ हे काशी विश्‍वेश्‍वरचा अवतार संबोधले जातात. माण नदीच्या काठावर पूर्णत: हेमाडपंथीय दगडी कामाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामातील वेगळे वैशिष्ट्यपूर्ण बांधकामातील म्हणजे मुख्य गाभाऱ्यातील "श्रीं'च्या मूर्तीखाली भुयार आहे. त्यामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. शिवलिंगानजीकच भिंतीस एक गवळचे शिल्पही आहे. या भुयाराचा दरवाजा मंदिराच्या गाभाऱ्यास "श्रीं'च्या मूर्तीलगत आहे. तो पारंपरिक रिवाजानुसार वर्षभर कुलूपबंदच ठेवण्यात येतो. शिवरात्रीस रात्री दहा वाजता या भुयाराचे कुलूपबंद दरवाजे मंदिराचे सालकरी स्वत: उघडतात, ते भुयारात उतरतात. शिवलिंगाची स्वच्छता करून जलाभिषेक पूजा करून परतताच रात्री अकरापासून पहाटे पाचपर्यंत भाविकांना दर्शनबारीतून दर्शनासाठी भुयारात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर पुन्हा हे भुयार कुलूपबंद करतील. महाशिवरात्रीनिमित्त भुयारातील शिवलिंगाचे दर्शनासाठी भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन मंदिर ट्रस्टीने जय्यत तयारी केली आहे.

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

चीन विमान अजून पोहोचले नाही...पृथ्वीराज चव्हाण संपर्कात आहेत...

कराड ;- कोरोना व्हायरस साथीमुळे चीनमध्ये अडकलेल्या साताऱ्याची विवाहिता अश्विनी पाटील यांच्यासह नव्वद भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र शासनाने खास विमानाची सोय केली आहे. येत्या 20 फेब्रुवारीला विशेष विमान त्यांना आणण्यासाठी जाणार होते. मात्र अद्याप विमान पोहोचलेले नाही. मात्र मी संपर्कात आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले की सकाळी वूहानला अश्विनी पाटील यांच्याशी बोललो. आज सरकार वायुसेनेचे सी-१३० विमान चीनमध्ये अजून अडकलेल्या सुमारे ९० भारतीयांना परत आणण्यासाठी पाठवित आहे. काही अडचणींमुळे अजून विमान पोहोचले नाही. दूतावासाने सर्वांना निघण्यासाठी तयार रहावयाला सांगितले आहे.मी संपर्कात आहे.
चीनमधील वुहान प्रांतात अडकलेल्या साताऱ्याची विवाहिता आश्‍विनी पाटील त्यांच्याशी व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची नेमकी समस्या जाणून घेतली होती. तसेच त्यांना भारतात परत आणण्यासाठी ते स्वत: परराष्ट्र व्यवहार मंत्री तसेच भारताचे चीनमधील राजदुत यांच्याशी संपर्क करून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. आमदार श्री. चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परराष्ट्र मंत्रालय येथे पत्रव्यवहार करून पाटील यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या हालचाली कराव्यात, अशी मागणी केली होती.

चेंबूरमध्ये शुक्रवारपासून 'थाळी महाराष्ट्राची', राज्यभरातल्या पक्वान्नांचा आस्वाद मिळणार

महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील खाद्यपदार्थ आणि संस्कृती यांचे एकत्रित दर्शन घडविणारा, 'थाळी महाराष्ट्राची' हा तीन दिवसीय खाद्यमहोत्सव येत्या शुक्रवार, 21 फेब्रुवारीपासून चेंबूर जिमखाना येथे रंगणार आहे.

श्री राधा फाऊंडेशन' प्रस्तुत आणि खासदार राहुल शेवाळे आयोजित या खाद्यमहोत्सवाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ातील महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांना आपले पाककौशल्य जनतेसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, 'श्री राधा फाऊंडेशन'च्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. कोकण, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या प्रांतातील पदार्थांची चव या खाद्य महोत्सवातून खवय्यांना चाखता येणार आहे. यानिमित्ताने तिन्ही दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर, 'श्री राधा फाऊंडेशन'च्या अध्यक्षा कामिनी शेवाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारही उपस्थित राहणार आहेत.

विविध कार्यक्रमांची रेलचेल

21 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता 'थाळी महाराष्ट्राची' महोत्सवाचे उद्घाटन होईल. या दिवशी 'सप्तरंग संस्कृतीचे' या संगीतमय नृत्याविष्काराचे आयोजन केले आहे. शनिवारी 'जल्लोष महाराष्ट्रा'चा आणि रविवारी 'जागर मराठी संस्कृती'चा या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

सातारा;-कॉंग्रेसला जिल्हाध्यक्षपदी डॉ.सुरेश जाधव यांची नियुक्ती

सातारा : तब्बल दहा महिन्यानंतर साताऱ्यातील जिल्हा कॉंग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळाला पण तोही प्रभारी. पुसेगाव येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व खटाव तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांना कॉंग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते माढाचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुक झाली. या सर्व परिस्थितीत सातारा जिल्हा कॉंग्रेसची वाटचाल ही जिल्हाध्यक्षाविनाच राहिली. त्यानंतर राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडी झाल्या. शेवटी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.
मागील एक दोन महिन्यांत पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत आढावा घेतला होता. या सर्व बैठकांतील चर्चेनुसार कोरेगाव किंवा कऱ्हाडचाच जिल्हाध्यक्ष होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, सर्वांना धक्का देत खटाव तालुक्‍यातील पुसेगावचे नेते डॉ. सुरेश जाधव यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून आज प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र राज्य सरचिटणीस गणेश पाटील यांनी श्री. जाधव यांना पाठविले आहे.

पालघर ;- वाढवण बंदर विकासामुळे पर्यावरणाला मोठा फटका?

पालघर जिल्ह्य़ात वाढवण इथं जेएनपीटीच्या धर्तीवर मोठं बंदर उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण बंदर उभारणसाठी ५१ हजार कोटी रुपये खर्चालाही मान्यता देण्यात आली. पण मच्छीमार, शेतकरी आणि नागरिकांमध्ये पुन्हा संतापाची लाट निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट जेएनपीटी प्रमुख भागीदार असून, स्पेशल पर्पज व्हेईकल अर्थात एसपीव्ही कंपनीची स्थापना केली जाणार आहे. पण हा पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील विभाग असून, येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व कायदे, नियम, आणि न्यायालयीन आदेश पायदळी तुडवून, जोर जबरदस्तीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्याचा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. वाढवण बंदराचा लढा अधिक तीव्र करून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा वाढवण बंदर संघर्ष समितीने दिला आहे.
कशी होणार वाढवण बंदराची निर्मिती?बंदरासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा स्थापन केलेल्या कंपनीमार्फत विकसित केल्या जातील. त्यात समुद्रात भराव टाकून जमीन तयार करणे, बॅकवॉटरसाठी बांधकाम करणे, बंदरासाठी आवश्यक त्या दळणवळण सुविधा निर्माण करणे या कामांचा समावेश आहे. ही कामे सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून केली जाणार आहेत. वाढवण बंदराच्या ठिकाणी समुद्रात सुमारे वीस मीटर नैसर्गिक खोली आहे. त्यामुळे या बंदरावर मोठ्या जहाजांची हाताळणी करणे शक्य होणार आहे. या बंदरासाठी साडेतीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचे, केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले आहे.

गेल्या वीस वर्षांपासून वाढवण बंदराला येथील स्थानिक जनता,वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून विरोध करीत आहे. डहाणूतील पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागाचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण नियुक्त करण्यात आले आहे. या प्राधिकरणाने वाढवण बंदर उभारणीस परवानगी नाकारलेली असतानाही आणि ते आदेश अजूनही कायम असतानासुद्धा केंद्रसरकारनं ते धाब्यावर बसवून वाढवण बंदर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढवणच्या पर्यावरणाला मोठा धोका?

वाढवण बंदर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील विभाग असून, येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहे. मच्छीमारी पार उध्वस्त होऊन जाणार आहे. तसेच पाच हजार एकर समुद्रात भराव टाकला जाणारअसल्याने अडणारे पाणी खाड्यांतून गावात जाऊन गावंच्या गावे समुद्रात गडप होण्याची भीती इथले नागरिक व्यक्त करत आहेत.

वाढवण बंदरविरोधाचा इतिहास

२२ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या 'अॅजडव्हाण्टेज महाराष्ट्र' या कार्यक्रमात वाढवण बंदराची प्रथम घोषणा करण्यात आली होती. १९९६ ते १९९८ दरम्यान या बंदराला स्थानिक पातळीवर विविध प्रकारे विरोध झाला होता. बंदराला विरोध करण्यासाठी धरणे, उपोषण, मोर्चे आणि इतर आंदोलने करण्यात आली होती आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्या १२६ जणांना अटकही झाली होती. या बंदराला विरोध करणाऱ्या नागरिकांनी 'वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती'च्या माध्यमातून प्रकल्पाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे वर्ग केली. त्यानंतर सुनावणीदरम्यान प्राधिकरणाने सर्व संबंधितांची बाजू ऐकून १९९८ मध्ये पाच आदेश पारित केले होते. या आदेशांमुळे वाढवण बंदराची उभारणी करणे कठीण झाले होते. दरम्यान, त्याकाळी विधानभवनावर निघालेला मोर्चा आणि इतर आंदोलनांची दखल घेऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढवण इथं पाठवून स्थानिक जनतेचे मत जाणून घेतल्यानंतर हा बंदर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय जाहीर घेतला होता.

वाढवण बंदर विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

१९९८ ते २०१४ दरम्यान या प्रकल्पाविषयी परिस्थिती 'जैसे थे' राहिली होती. २०१४ मध्ये केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर या बंदराच्या उभारणीच्या हालचालीला पुन्हा सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या अनुषंगाने २०१५-१७ दरम्यान सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. त्यावेळी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने पुन्हा डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे अपील केले. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ११ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या प्राधिकरणाने सुनावणी घेऊन १९९८ मध्ये पारित केलेले पाचही आदेश कायम ठेवले. प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेली नसल्याने या बंदराची उभारणी अशक्य होती. पण आता सरकारनं निर्णय़ घेऊन टाकलाय. पण या बंदरामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत सांगत आहेत.

दरम्यान, प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे २०१९ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नव्याने नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यापलिकडे जाऊन केंद्र सरकारने डहाणू प्राधिकरण विसर्जित करून या परिसरातील पर्यावरण रक्षणाची जबाबदारी अन्य शासकीय प्राधिकरणाकडे सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याला वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि अन्य संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

वाढवण बंदराबाबत शिवसेना पक्ष स्थानिक जनतेसोबत राहील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारादरम्यान जाहीर केले होते. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून त्यांच्या भूमिकेकडे सळ्यांचं लक्ष लागले आहे.



कृषी प्रदर्शनासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावी ; ना.शंभूराज देसाई

सातारा पाटण  :-
 लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त दौलतनगर (ता. पाटण) येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरले आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल, यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथिनिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. यावेळी देसाई बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे आदी उपस्थित होते.
दौलतनगर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विभागा बरोबरच इतर विभागांनीही स्टॉल उभे करून शासनाच्या विविध योजनांची माहिती द्यावी. पाटण तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेतात. या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल याची माहिती असणारा स्वतंत्र स्टॉल उभा करून प्रत्यक्ष तांत्रिकदृष्ट्या ऊस पीक कसे घ्यावे, याचे प्रात्यक्षिकही या प्रदर्शनामध्ये दाखविण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पीक स्पर्धांचेही आयोजन करण्यात यावे.
कृषी प्रदर्शनाचे मोठ्या स्वरूपात आयोजन करावयाचे असल्याने निधीसाठी प्रस्ताव कृषी विभागाने पाठवावा. निधीसाठी लवकरच कृषिमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊ, असेही वित्त व नियोजन राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...