इस्लामपूर /प्रतिनिधी
येथील लोकराज्य विद्या फाँडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचे ‘अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण‘ पुरस्कार उद्योजक सर्जेराव यादव व तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना घोषित केले आहेत.
शनिवार दि. २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे व राज्याचे माजी मंत्री, जेष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती फौडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी दिली.
शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सांगली रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरमधील सार्वजनिक स्मशानभूमीत हा समारंभ होणार आहे. फौंडेशनने गेल्या दोन वर्षात स्मशानभूमींची स्वच्छता करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवून अंधश्रध्दा निर्मूलनाचेही काम केले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी आ. भगवानराव साळुखे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील,पक्षप्रतोद विक्रम पाटील, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार–पोतदार, संजय पाटील–ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा समारंभ यशस्वीतेसाठी फाँडशनचे अध्यक्ष सुवर्णा कोळेकर, उपाध्यक्ष मानसिंग ठोंबरे, सदस्य आशा तांदळे यांच्यासह अन्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा