सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन.
सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पावन स्मृतींना आज कराड येथील **प्रितीसंगम** येथे उपमुख्यमंत्री **सुनेत्रा अजित पवार** यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे आगमन झाल्यावर त्यांनी थेट प्रितीसंगम गाठत, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर आदरभाव आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी **मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील**, **राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर**, **खासदार सुनील तटकरे**, **खासदार नितीन पाटील**, **माजी खासदार श्रीनिवास पाटील**, **माजी आमदार बाळासाहेब पाटील**, **जिल्हाधिकारी संतोष पाटील**, **पोलीस अधीक्षक तुषार दोशी**, **कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव** कार्याध्यक्ष. संजयजी देसाई यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कराड व प्रितीसंगमाशी असलेले अतूट नाते महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात अजरामर आहे. त्याच परंपरेचा आदर राखत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या पवित्र स्थळी उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. यशवंतराव चव्हाण यांचे योगदान, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि सामाजिक समतेसाठीचे कार्य यांची प्रकर्षाने आठवण झाली. प्रितीसंगम परिसरात काही काळ गंभीर आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...