सदर बैठकीस जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे व विविध गावचे सरपंच जन आरोग्य
समितीचे सदस्य व हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव, डॉ. क्षितिजा पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आणि नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मागील बैठकीच्या इतिवृत्तावर चर्चा करून त्यातील विषयांचा पाठपुरावा करण्यात आला. तसेच आरोग्य केंद्रातील उपलब्ध औषधसाठा, स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, उपक्रम अडचणी यांवर चर्चा झाली. आरोग्यविषयक विविध आणि केंद्रासमोरील
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य
सेवा मिळणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आरोग्य केंद्रातील समस्या मार्गी लावून उपलब्ध सुविधांचा अधिक प्रभावी वापर करण्याबरोबरच आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि समिती सदस्यांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.
एच पी व्ही लसीकरणाबाबत श्रीकांत पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगावचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडला तसेच क्षय रुग्णांना माननीय जिल्हा परिषद सदस्य आरोग्य समिती सदस्य सातारा लालासाहेब जगदाळे व जन आरोग्य समितीचे सदस्य यांच्या हस्ते फूड बस्केट देण्यात आले
तेव्हा उपस्थित विविध गावचे सरपंच तसेच जन आरोग्य समितीचे सदस्य व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते तेव्हा आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका आरोग्य सेव्य सेविका आरोग्य सेवक सेविका औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच आशा गटप्रवर्तक उपस्थित होते
राजू बानगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून, आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा