संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६
ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.
ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने आज दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
सदर रूट मार्च ढेबेवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मंद्रूलकोळे, ढेबेवाडी बाजारपेठ, मालदन, तळमावले बाजारपेठ व कुंभारगाव या गावांमधून काढण्यात आला. निवडणुकीच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती करणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा रूट मार्च घेण्यात आला.
या रूट मार्चमध्ये ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे २ पोलीस अधिकारी, ०७ पोलीस अंमलदार तसेच ४० होमगार्ड जवान सहभागी झाले होते. रूट मार्च दरम्यान नागरिकांशी संवाद साधण्यात आला व शांतता व सहकार्य राखण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलीस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*
मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा