रुवले ता.पाटण;-
वाल्मिकी ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गुरुवर्य प.पूज्य सदगुरु श्री सोनाजी महाराज संकल्पित पाटीलवाडी,रुवले ता.पाटण येथे श्री।सदगुरु दत्त सेवा संस्था (रामचंद्र नगर ठाणे ) यांच्या योगदानाने भव्य मांदिर बांधण्याचा संकल्प केला व तो पूर्णत्वास नेला.
या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमचा शुभारंभ मंगळवार दि.२५ रोजी सकाळी स्थलशुद्धी,श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, श्री मूर्ती अभिषेक, श्रीच्या मूर्तीची मिरवणूक, जलाधिवास,धान्यादिवास, करून होणार आहे रात्रौ ९.०० वाजता ह.भ.प.श्री संदीप महाराज कोळेकर ( नेहरू टेकडी) यांचे प्रासादिक कीर्तन होणार आहे
बुधवार दि.२६.रोजी सकाळी ७.३० वाजता मुख्य देवता पूजन,होमहवन, मुर्ती प्राणप्रतिष्ठा,व ११.३० वाजता कलशारोहन सोहळा प.पु.गगनगिरी महाराज आश्रम ढाणकळ मठाधीपती (कोयना धरण) प.पु.स्वामी मयेकर महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे व दुपारी १२.३०वाजता पूर्णाहुती विधी होणार आहे.
त्यानंतर दुपारी १.०० वा.महाआरती होईल व दुपारी २.००वा. महाप्रसाद होणार आहे
तरी आपण सहकुटुंब,सहपरिवार उपस्थित राहून ह्या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री।सदगुरु दत्त सेवा संस्था (रामचंद्र नगर ठाणे ) दत्तभक्त,सेवेकरीआणि ग्रामस्थ
मंडळ पाटीलवाडी,रुवले यांच्या वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा