शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

शाहूवाडीचे शेतकरी करणार मुंबईत आंदोलन...

कोल्हापूर शाहूवाडी;- 
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेती पिकांचे वन्यजीवांकडून नुकसान होते. काही वेळा वन्यजीवांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होतात. त्यामुळे यंदाच्या हंगामात जवळपास तीनशे हेक्‍टर जमीन नापिक ठेवली आहे. यात केवळ वन्यजीवांच्या उपद्रवाला त्रासूनही शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची दखल वन्यजीव विभागाने घेतली नसल्याने याबाबत दाद मागण्यासाठी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेती वाचवा जनसंघर्ष कृती समितीतर्फे आंदोलनाची तयारी सुरू आहे.
शाहूवाडी तालुक्‍यातील उखळू नावाचे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे.

उखळू, आंबाईवाडा परिसरापासून पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची हद्द सुरू होते. गावानजीक जंगल आहे. तेथील गवे, माकडे, रान डुक्कर, मोर प्रकल्पाजवळील शेतीत येतात. पूर्णवाढ झालेले किंवा कोवळे पीक खाऊन टाकतात. अशात रात्री शेतीची राखण करण्यास जाणेही धोकादायक बनते. कारण गव्यांचा कळप असतो, किंवा एखादा गवाही रस्त्यात, शेतीत कधीही येऊ शकतो. एकट्यादुकट्या व्यक्तींवर अशा वन्यजीवांकडून हल्ले होतात तर बिबट्यांचाही वावर या परिसरात आहे. त्यामुळे भीतीने शेतीची राखण करणेही मुश्‍कील होते. त्यातूनही कोणी चिकाटीने शेती केली तर वन्यजीवांकडून नुकसान झाल्यास विविध कागदोपत्री पुरावे द्यावे लागतात, पंचनामा होतो. त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर नुकसानभरपाई मिळते. यात अनेकदा जितका शेतीला खर्च झाला त्यापेक्षा निम्मी अधिक रक्कम मिळाल्याचा अनुभवही काही शेतकऱ्यांनी घेतला आहे.

तीन महिन्यांत कोल्हापुरात नाईट लँडिंग....

हा मनस्ताप टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी ठरवून पीक घेतले नाही. त्यामुळे उखळू नजीकच्या दोन गावात जवळपास २५० हेक्‍टर जमिनी पडिक ठेवली गेली. शेतकऱ्यांनी वन्यजीव विभागाकडे दाद मागतली. मात्र, त्याची दखल घेतली नाही म्हणून शाहूवाडी तालुक्‍यातील अन्य गावातील जंगला नजीकच्या शेतीत वन्यजीवांकडून नुकसान होते अशा सात ते आठ गावातील शेतकरी एकत्र येऊन सर्वजन एकत्र वनमंत्र्यांकडे दाद मागणार आहेत. त्यासाठी मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. त्याचे नियोजन होत आहे. त्यानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे आंदोलन होईल.

शेती वाचवा जनसंघर्ष कृती समितीतर्फे वन्यजीवांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत वन्यजीव विभागाकडे दाद मागण्यात येणार आहे. या समितीत परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आहेत. भागातील बहुतेक शेतकऱ्यांच्या घरातील एखादी व्यक्ती रोजगारासाठी मुंबईत आहे. त्यांचीही शेतजमीन येथील जंगलानजीकच्या गावात आहे. त्यामुळे त्या व्यक्तींच्या सहभागाने मुंबईत आंदोलन होणार आहे.
हरीष कांबळे, निमंत्रक, कृती समिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...