काळगाव,ता.पाटण ;-
गाव परिसरात वाढत असलेली गुन्हेगारी ही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्हींचा उपयोग होतो. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला आळा बसू शकतो
हे लक्षात घेऊन काळगाव येथे ढेबेवाडी पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक मा.श्री.उत्तमराव भजनावळे साहेब यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत काळगाव यांच्या यांच्याकडून काळगाव गाव परिसरात CCTV आणि भरेवाडी फाटा येथे प्रत्येकी 1 या प्रमाणे दोन 120 वॅट चे 4 LED बल्प हायमास्ट बसवण्यात आले आणि अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काळगाव यांच्या वतीने भरेवाडी फाटा येथे CCTV बसवण्यात आले.तरी या कामासाठी ग्रामविकास अधिकारी काळगाव,सरपंच,सदस्य तसेच अष्टविनायक पतसंस्था यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.ह्या ठिकाणी CCTV बसवल्यामुळे चोरी व इतर गैरप्रकारांना नक्की आळा बसेल अशी माहिती श्री.नितीन पाटील पोलीस पाटील काळगाव यांनी "कुमजाई पर्व" शी बोलताना दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा