रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

पिंपरखेड (ता. शिरूर) ; दयानंद ढोमे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

टाकळी हाजी -पोलीस सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद हरिश्‍चंद्र ढोमे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दयानंद ढोमे यांना दोनवेळा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. पोलीस सेवेमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रायगड, सातारा, पुणे, कोल्हापूर येथे उत्कृष्ट सेवा करून आतापर्यंत त्यांना 621 पदके मिळाली आहेत.
तसेच राज्यस्तरीय पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व विविध पुरस्कार मिळाले आहेत. तंटामुक्ती अभियान उत्कृष्टरित्या सातारा येथे राबविल्याने माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.गुन्हे अन्वेषण विभाग, दारूबंदी, विविध गुन्ह्यांचा तपास, तंटामुक्ती, कायदा सुव्यवस्था या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचे हस्ते राष्ट्रपती पदक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील व पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल उपस्थित होते.याप्रसंगी सौ. मंदाताई रामदास बोंबे सरपंच ग्रामपंचायत पिंपरखेड, ग्रामस्थ आणि समाजसेवक श्री रामदासशेठ बोंबे यांनी श्री ढोमे साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...