कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त* *सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती मा. श्री. संजय देसाई साहेब व संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल, कुंभारगाव येथे विविध सामाजिक उपक्रमां अंतर्गत वृक्षारोपण व विद्यार्थांना खाऊ वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले* होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी *लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्कुल मधील विद्यार्थ्यांनी दादांच्या कार्या बद्दल मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनाच्या निमित्ताने भारताचा नकाशा रांगोळीच्या माध्यमातून काढुन त्यामध्ये निसर्गातील वस्तुचा वापर करून सुदंर आकर्षक डिझाइन तयार करून कडेला मेणबत्त्या ठेवून प्रज्वलित करण्यात आल्या तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी स्कुलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.* तसेच *विद्यार्थ्यांना खाऊ वाटप* केले दादांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. *संजिवन प्रतिष्ठानचे सचिव प्रा सचिन पुजारी सर आपल्या मनोगतात लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या कार्याची माहिती व अनुभव व्यक्त करून विनम्र अभिवादन* केले
*सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण अर्थ व क्रिडा सभापती मा श्री संजय देसाई यांनी आपल्या मनोगतात म्हणाले कि, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांनी सामाजिक, शैक्षणिक ,कृषी विकासात्मक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.दादांनी घालून देण्यात आलेल्या विचारांचा वसा व वारसा परंपरा इथुन पुढील काळात देखील आम्ही सदैव चालु ठेऊ असे आश्वासन दिले.* . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ खोत मॅडम यांनी केले व सुत्रसंचलन सौ वर्षा साळुंखे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ अर्चना पुजारी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढील प्रमाणे उपस्थित होते -
मा श्री प्रशांत पाटील संचालक रयत साखर कारखाना शेवाळवाडी (म्हासोली) , श्री वसंतराव पतंगे शेठ (कापड व्यापारी) , श्री संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य), श्री दिलीप देसाई (प्रगतशील शेतकरी), श्री सुनील धर्माधिकारी (सामाजिक कार्यकर्ते) , श्री विजय कचरे (माजी ग्रामपंचायत सदस्य),, श्री सोमनाथ गुरव (युवा उद्योजक), प्रा सचिन पुजारी सर तसेच नवभारत को आॉप क्रेडिट सोसायटी सर्व प्रशासकिय स्टाफ आणि संजिवन प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संपूर्ण छायाचित्र व शुटिंग दै.कृष्णाकाठ व साप्ताहिक स्पंदनचे पत्रकार व कुंभारगाव सोसायटीचे संचालक मा श्री राजेंद्र पुजारी यांनी केले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा