संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६
*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.
= कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना आणि कलश रोहन समारंभ तसेच सभामंडप असा संयुक्त लोकार्पण सोहळा रविवार १६/१७ ऑगस्ट २०२६ या दोन दिवशी रोजी संपन्न होत आहे, १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ते ४ या वेळेत कुंभारगाव येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवी मंदिर येथून शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, या मूर्ती कलश भव्य मिरवणूक तुतारीच्या निनादात, टाळ टाळ, मृदंगाच्या तालावर विठुरायाचा देव देवतांचा गजर करत हा सोहळा पार पडणार आहे यावेळी श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडी यांचा सहभाग असणार आहे सायंकाळी ६ ते ७ वाजता जला धीवास, धान्य निवास, शयना धीवास विधि होणार आहे , ७ ते ९ वाजता झी, टॉकीज फेम, ह,भ,प, श्री सागर पवार यांची कीर्तन सेवा होणार आहे यानंतर स्नेह भोजनाचे करण्यात आले आहे, सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी गणेश पूजन, पुण्याहवाचन, होम हवन, अभिषेक यानंतर ११ ते १२ वाजता श्री,ष,ब्र,प्र.१०८ ज्ञानराज पद्म भास्कर राष्ट्रसंत डॉ, निळकंठ शिवाचार्य धारेश्वर (महास्वामीजी) यांचे हस्ते शिवलिंग, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलश रोहन आणि महाआरती होणार आहे, दुपारी १२ ते १२,३० माहेर वाशिन ओटी भरणे, सत्कार समारंभ झाल्यानंतर महाप्रसाद याचे आयोजन केले आहे, दुपारी एक वाजता शिवशंभो सभामंडपाचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभर देसाई साहेब यांचे शुभ हस्ते आहे या पवित्र व मंगल सोहळ्या निमित्त आपण उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करावा असे आव्हान शिवशक्ती गणेश मंडळ व ग्रामस्थ मंडळ माटेकरवाडी तालुका पाटण यांनी केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.
= कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा