संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, १७ डिसेंबर, २०२५
आरोग्य सेवक होणार आता ग्राम आरोग्य अधिकारी.
आरोग्य सेवक होणार आता ग्राम आरोग्य अधिकारी
सातारा: राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना. प्रकाश आबीटकर यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात भेट घेतली. या बैठकीत राज्यातील आरोग्य सेवकांचे पदनाम बदल व प्रलंबित असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती राज्य प्रवक्ते अरुण गादगे यांनी दिली. ग्रामीण व्यवस्थेचा कणा असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याचे 'आरोग्यसेवक' हे पदनाम बदलून त्यांना समाजातील सन्मान अधोरेखित करणारे 'ग्राम आरोग्य अधिकारी' किंवा 'आरोग्य उपनिरीक्षक' त्याऐवजी अधिक सकारात्मक अर्थ असलेले 'ग्राम आरोग्य दूत' असे पदनाम देण्याची सूचना आरोग्य मंत्र्यांनी मांडली. मात्र राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांचा शैली दर्जा व कामाचा अनुभव लक्षात घेता ग्राम आरोग्य अधिकारी असे पदनाम बदल करणे बाबत निवेदन दिले. ग्रामपंचायत अधिकारी, तलाठ्याचे ग्राम महसूल अधिकारी,
तंत्रज्ञ यांचे प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी असे पदनाम बदल झाल्याचे निदर्शनास आणून दिले व 'ग्राम आरोग्य अधिकारी' हेच नाव करावे असे सुचवले याबाबत आरोग्य मंत्र्यांनी स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन दिले. आरोग्य सेवकांच्या नवीन सेवा प्रवेश नियमानुसार आरोग्य सेवकाची शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान उत्तीर्ण केली असून सॅनिटरी कोर्स बंधनकारक केला आहे तर पदोन्नतीसाठी कृषी सेवकांचे कृषी सहाय्यक अधिकारी, प्रयोगशाळा बीएससी पदवी पूर्ण असल्याचे बंधनकारक आहे. शैक्षणीक पात्रता व आरोग्यविषयक अत्यंत जबाबदारीचे काम त्यामुळे 'ग्राम आरोग्य अधिकारी' हे पदनाम होण्यास कोणतीही अडचण येत नाही. या बैठकीत राष्ट्रसेवा संघटनेने आरोग्य विभागाशी
संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. हिवताप विभागाचा सुधारित आकृतीबंध तात्काळ लागू करणे, हिवताप विभागातील पदे शहरी भागात वाढवणे, रखडलेल्या, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक पदोन्नती तातडीने देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. कोरोना महामारीच्या काळात तर आरोग्य सेवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाडी-वस्ती, दुर्गम भागांमध्ये जाऊन नागरिकांना आरोग्य सेवा पुरव ली. गरोदर माता, नवजात व लहान मुले, किशोरवयीन, वृद्ध नागरिक अशा घटकांपर्यंत सातत्याने पोहोचून सेवा देणारा हा घटक खऱ्या अर्थाने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरला आहे. वर्षभर साथ रोगाच्या काळात संसर्गजन्य, असंसर्गजन्य भागातून फिरती व उपाययोजना करावी लागतात त्यामुळे ग्रामसेवकंप्रमाणे कायम फिरती भत्ता पाच हजार रूपये तसेच आरोग्य भत्ता मिळावा, ग्रामसेवक व तलाठी यांच्याप्रमाणे पदोन्नतीचे टप्पे ठेऊन आरोग्य सेवकावरील अन्याय मिटावा याकरिता मंत्रालयीन बैठकीमध्ये मुद्दे मांडणार असल्याचे राज्य प्रवक्ते अरुण गादगे, गणेश दहिफळे, बंडा पाटील यांनी दिली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...
-
ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ गवत कापणाऱ्या महिलेवर अचानक झडप; हाताला गंभीर दुखापत. ढेबेवाडी (ता. पाटण) : तालुक्यातील भालेकरवाडी (बनप...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
ढेबेवाडी खोऱ्यात अंगावर काटा आणणारा थरार! एसटी बससमोरच ‘तारा’ वाघिणीचा रस्त्यावर अवतार. |साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी ढेबेवाडी - पाट...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा