गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

महाआघाडी सरकार: आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल.


मुंबई: प्रतिनिधी 
 गेल्या काहीी दिवसांपासून संपूर्ण राज्याला प्रतिक्षा असलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकारकडून खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे
२८ नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. कालपर्यंत गृहखाते शिवसेनेकडेच राहील, असे सांगितले जात होते. मात्र, अंतिम क्षणी यामध्ये बदल करण्यात आला आहे असे समजते. त्यानुसार उपमुख्यमंत्रिपदाची तसेच गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्याकडे सोपविली जाणार आहेत. तर शिवसेनेला नगरविकास, उच्च व तंत्र शिक्षण, जलसंपदा, राज्य रस्ते विकास महामंडळ, परिवहन, उद्योग, सामान्य प्रशासन, विधी, सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा अशी दहा मंत्रालये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गृह, अर्थ, ग्रामीण विकास, सहकार, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण आणि कामगार अशा विभागांची जबाबदारी येणार आहे. काँग्रेसला महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण तसेच महिला आणि बालकल्याण मंत्रालये सोपविली जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...