पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे.
पीएमसी बँकेच्या सुमारे ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण ठेव काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
याचबरोबर एकावेळी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती आज लोकसभेत अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, रिझर्व्ह बँकेबरोबर सकारात्मक समन्वयाद्वारे याबाबत सरकार पावलं उचलत आहे. तसेच, अचानक आरोग्य विषयक उद्भवलेली गंभीर स्थिती, लग्न समारंभ, शिक्षणातील अडचणी आदी प्रसंगी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना खात्यातून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देखील असल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी दिली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा