मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

कल्याण डोंबिवली लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत; फेऱ्या वाढवण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी


मुंबई डोंबिवली :कुमजाई पर्व ऑनलाइन

 डोंबिवलीमधील लोकलच्या गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. डोंबिवली स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या असते. त्यातच डोंबिवली लोकल असूनदेखील ती लोकल कल्याण स्थानकावरुन सुटत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारने तातडीने याकडे लक्ष घालण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली लोकलमध्ये जास्त गर्दी आणि लोकलमध्ये वेळेचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला. कल्याण स्थानकावरुन येणारी ट्रेन जेव्हा डोंबिवलीला येते तेव्हा महिला चा डबासुद्धा गर्दीने पूर्ण भरलेली असते. त्यामुळे डोंबिवलीकरांना ट्रेनमध्ये चढणं उतरण अशक्य होतं. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे मी वारंवार तक्रार केली. मात्र यावर अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळेंनी नियम ३७७ च्या अंतर्गत तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींनुसार हा मुद्दा उपस्थित करत लवकरात लवकर डोंबिवली स्थानकावरुन सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या जास्तीत जास्त वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...