संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
ढेबेवाडी - समग्र शिक्षणांतर्गत आयसीटी उपक्रमामुळे राज्यातील गरीब विद्यार्थी बनणार संगणक साक्षर
समग्र शिक्षणांतर्गत आयसीटी उपक्रमामुळे राज्यातील गरीब विद्यार्थी बनणार संगणक साक्षर.
ढेबेवाडी | साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये आधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून, प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र संगणक इन्स्ट्रक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. आधुनिक युगात टिकून राहण्यासाठी संगणक साक्षरता अत्यावश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालक ीमती आर. विमला यांनी आयसीटी (Information Communication Technology) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील तब्बल ३८ शाळांमध्ये संगणक शिक्षणाचा उपक्रम यशस्वीरीत्या सुरू असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळणीचे ज्ञान दिले जात आहे. राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर. विमला यांच्या सूचनेनुसार व सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
आजच्या संगणकयुगात शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच संगणकाचे मूलभूत ज्ञान मिळणे आवश्यक आहे. विशेषतः गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार असून, त्यांच्या शैक्षणिक व भविष्यातील करिअरच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरेल. येणाऱ्या काळात या संगणक प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात निश्चितच भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
ढेबेवाडी प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा