संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
“मंत्र्यांची फौज आली तरी फरक पडणार नाही; मंद्रूळकोळे विजय आमचाच” – ना. शंभूराज देसाई
मंद्रूळकोळे जि. प. मतदारसंघातील विजय आमचाच; कोणाच्या ताकदीला घाबरत नाही – ना. शंभूराज देसाई यांचा निर्धार
ढेबेवाडी | साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी
पाटण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीत मंद्रूळकोळे जिल्हा परिषद मतदारसंघातील विजय निश्चितपणे आपलाच असणार आहे, असा ठाम आणि आक्रमक दावा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केला.
“माझे पूर्ण लक्ष ढेबेवाडी विभागातील जिल्हा परिषद मतदारसंघांवर आहे. कोण उभं राहणार, किती मोठी ताकद लावणार, कोण प्रचाराला येणार याची आम्हाला अजिबात भीती नाही. आम्ही निवडणुकीपुरते नाही तर कायम जनतेत आहोत. त्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची आमची नोंद जनतेच्या मनात आहे,” असे ठणकावून सांगत ना. देसाई यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले.
कामाच्या जोरावरच विजय – प्रचाराची भीती नाही
मंद्रूळकोळे खुर्द (ता. पाटण) येथे ग्रामीण रस्ते विकास ३०५४ योजनेतून होत असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी **डॉ. दिलीपराव चव्हाण (माजी चेअरमन), विलास गोडांबे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), ज्योतीराज काळे, पंजाबराव देसाई, संतोष गिरी, दिलीपराव जानुगडे, मनोज मोहित, रणजीत पाटील, प्रकाश पवार, आदर्श सरपंच रविंद्र माने, सरपंच मनोज पाटील, सरपंच आत्माराम पाचुपते यांची प्रमुख उपस्थिती होती.
“मंत्रिमंडळातील माझे सहकारी जरी इथे प्रचाराला आले तरी फरक पडत नाही. तुम्ही घाबरू नका, मी समर्थ आहे,” असे सांगत ना. देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला.
सत्ता सेवा करण्यासाठी, गटबाजीसाठी नव्हे.
ना. देसाई पुढे म्हणाले,
“लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई आणि स्व. आबासाहेब देसाई यांची एकच शिकवण होती – सत्ता, पद, अधिकार मिळाले की गटातटाचा विचार न करता काम करा. कारण ही पदं लोकांच्या सेवेसाठी असतात.”
राजकारणात टिकायचं असेल तर **लोकांशी प्रामाणिक राहावं लागतं, अन्यथा जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेते, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
संकटात कोण उभं राहिलं हे जनता विसरत नाही.
“पूर, अतिवृष्टी, दरड कोसळणे, रस्ते बंद होणे, कोरोना महामारी – प्रत्येक संकटात कोण जनतेच्या पाठीशी ठाम उभं राहिलं, हे लोकांनी अनुभवलं आहे. संकटात न दिसणारे लोक निवडणुकीपुरते पुढे येतात, पण जनता अशांना ओळखते,” असा टोला देत निवडणूकपुरत्या राजकारणावर त्यांनी जोरदार प्रहार केला.
माथाडी चळवळ म्हणजे सामाजिक बांधिलकी.
स्व. अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत माथाडी कामगारांना एकत्र आणले. त्या चळवळीच्या पाठीशी स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सरकारची संपूर्ण ताकद उभी केली. “ही केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर सामाजिक बांधिलकी होती,” असे सांगत ना. देसाई यांनी आपल्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
१ कोटी ५५ लाखांचा निधी – कार्यकर्त्यांचा अभिमान.
उपसरपंच संजय लोहार म्हणाले,
“ना. शंभूराज देसाई हे राज्यातील प्रभावी मंत्री आहेत, याचा तालुक्याला अभिमान आहे. त्यांचा कार्यकर्ता चिवट व स्वाभिमानी आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी मंद्रूळकोळे खुर्दसाठी १ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी दिला, याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.”
३०५४ च्या निधीवर श्रेयलढाई करणाऱ्यांना टोला
ना. शंभूराज देसाई म्हणाले,
“मंद्रूळकोळे खुर्दच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू दिला जाणार नाही. ग्रामीण रस्ते विकास ३०५४ योजनेतून या गावासाठी **५० लाख रुपये मीच तातडीने मंजूर केले**. या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ३०५४ योजनेतील कामे ही **स्थानिक आमदाराच्या शिफारशीनेच** होत असतात, हे श्रेय लाटणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. अज्ञान पाजळू नये,” असा थेट टोला त्यांनी नाव न घेता हाणला.
या कार्यक्रमात अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष सागर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
यावेळी प्रा. सुरेश पाटील, रोहित चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. रविंद्र उर्फ राजू रोडे यांनी स्वागत केले, तर रणजित पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सतिश कापसे, अविनाश साळुंखे, बबन पाटील, अविनाश कापसे, अनिल लोहार, प्रकाश पाटील, सदाशिव काळुगडे, सदाशिव कदम महाराज, बजरंग भुरुगडे, दीपक पाटील, सर्जेराव कुंभार, अविनाश काटकर, नयन दुर्गावळे, राम काटकर, सचिन लोहार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...
-
ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ गवत कापणाऱ्या महिलेवर अचानक झडप; हाताला गंभीर दुखापत. ढेबेवाडी (ता. पाटण) : तालुक्यातील भालेकरवाडी (बनप...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
ढेबेवाडी खोऱ्यात अंगावर काटा आणणारा थरार! एसटी बससमोरच ‘तारा’ वाघिणीचा रस्त्यावर अवतार. |साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी ढेबेवाडी - पाट...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा