संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
मा.मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा ८२ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होणार.
मा.मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा ८२ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होणार.
पाटण, दि. २२ साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी :
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तसेच पाटण विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) यांचा ८२ वा वाढदिवस शनिवार, दि. २७ डिसेंबर रोजी पाटण तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
वाढदिवसाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी बुधवार, दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता श्रीराम मंदिर, पाटण येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात येणार असून विविध उपक्रमांची जबाबदारी कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती वाढदिवस संयोजक समितीच्यावतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत पाटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन विकास, शैक्षणिक व आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी आजही जनतेच्या स्मरणात आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, स्पर्धा, शिबिरे तसेच विविध सेवा कार्ये आयोजित करण्याचा निर्धार संयोजक समितीने केला आहे.
या नियोजन बैठकीस पाटण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सदस्य, विविध संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक, बूथ समिती अध्यक्ष व सदस्य, तसेच महिला, युवक व युवती यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाढदिवस संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होणारे कार्यक्रम हे केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांतून त्यांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ठरणार असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा