संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५
जनसहकार पतसंस्थेच्या नूतन २०२६ दिनदर्शिकेचे तळमावले येथे भव्य प्रकाशन
तळमावले | प्रतिनिधी
जनसहकार पतसंस्थेच्या नूतन २०२६ दिनदर्शिकेचे तळमावले येथे भव्य प्रकाशन
आज मंगळवार दि. ३०/१२/२०२५ रोजी जनसहकार पतसंस्थेच्या नूतन 2️⃣0️⃣2️⃣6️⃣ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा तळमावले येथे उत्साहात पार पडला. संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या या सोहळ्याला मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
या शुभप्रसंगी संस्थेचे संस्थापक/चेअरमन मा. श्री. मारुती मोळावडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विलास गोडांबे शेठ (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पाटण)उपस्थित होते. तसेच व्हाइस चेअरमन मा. श्री. अमोल मोरे, संचालक ा. श्री. प्रशांत पोतदार शेठ, मा. श्री. आनंदा माने शेठ, मा. श्री. मिलिंद ताईंगडे शेठ, मा. श्री. सुनिल आडावकर शेठ, मा. श्री. संदीप टोळे शेठ आदींची उपस्थिती होती.
याशिवाय संस्थेचे सल्लागार ा. श्री. विकास मोरे शेठ, मा. डॉ. श्री. संदीप मोहिते सर, श्री. उमेश काळे शेठ, मा. श्री. सतीश सागावकर शेठ, मा. श्री. जयवंत दिंडे शेठ, व्यापारी मा. श्री. तानाजी माने शेठ श्री. नागेश शिद्रुक दादा, मा. श्री. विपुल ताईंगडे, मा. श्री. महेश करपे तसेच सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मान्यवरांनी संस्थेच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. जनसामान्यांच्या आर्थिक गरजांना तत्पर व पारदर्शक सेवा देत संस्थेने विश्वासार्हतेची परंपरा जपली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नव्या वर्षात सभासद, ठेवीदार व ग्राहकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद व उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. उत्साही वातावरणात हा प्रकाशन सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचा माने परिवाराकडून सन्मान*
तळमावले/प्रतिनिधी : माणसाच्या आयुष्यातील ७५ वे वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सव हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. या आनंदाला सामाजिक कृतज्...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा