महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढीचा दुचाकी वाहन वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी शिवडे (ता. कराड) : 23 डिसेंबर महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, शिवडे (ता. कराड, जि. सातारा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने दुचाकीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सल्लागार श्री. प्रकाश मुसळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आली.
यानंतर संस्थेचे संचालक श्री. संजय देशमाने यांच्या हस्ते करण जगन्नाथ शेडगे यांना दुचाकीचे वितरण करण्यात आले. तसेच सल्लागार श्री. कमलेश दळवी यांच्या हस्ते सुशांत संदीप देशमाने यांना दुचाकी सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमामुळे सभासदांना दैनंदिन कामकाजास तसेच रोजगार व व्यवसायासाठी मोठा हातभार लागणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या वेळी संस्थेचे कुटुंब प्रमुख महेश उबारे साहेब, चेअरमन श्री. प्रमोद देशमाने, व्हाईस चेअरमन सौ. उज्वला उबारे, संचालक नागेश अडसुळे, कांतीलाल जगदाळे, संजय शेजवळ, संजय देशमाने, सूर्यकांत म्हेत्रे, विजय देशमाने, अनुप कात्रे, तसेच मनीषा अडसुळे, मनीषा वाघमारे, उमा कळसकर आदी संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय सल्लागार संजय नागमल, धनंजय केंजळे, अरुणा येवले मॅडम, सीमा वाघमारे व इतर मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यवस्थापक श्री. तानाजी वेताळ यांनी उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री. कांतीलाल जगदाळे यांनी आभार प्रदर्शन करून संस्थेच्या या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा