शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १" : ७ मार्चपासून पाटण तालुक्यात भव्य प्रारंभ!


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज पाटण - 

पाटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे २०२६ या कालावधीत राज्यभर "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १" राबविण्यात येणार असून त्याची सुरुवात शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ पासून होत आहे.

महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढणे, नवीन तरतुदींची जनजागृती करणे आणि डिजिटल सेवांचा प्रभावी वापर वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब व तहसीलदार श्री. अनंत गुरव साहेब यांनी केले आहे.


 पाटण तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक

१️⃣ शनिवार, ७ मार्च २०२६ – ढेबेवाडी, कुठरे, तळमावले
२️⃣ शनिवार, १४ मार्च २०२६ – मल्हारपेठ, मारूल हवेली, चाफळ
३️⃣ शुक्रवार, १० एप्रिल २०२६ – म्हावशी,आवरडे तारळे

४️⃣ शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ – येराड, हेळवाक, मोरगिरी, मरळी,

५️⃣ शुक्रवार, ८ मे २०२६ – पाटण (नगरपरिषद हद्द)


६️⃣ शुक्रवार, १५ मे २०२६ – पाटण (ग्रामीण)


 शिबिरामध्ये उपलब्ध सेवा

🔹 प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे
🔹 अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क
🔹 लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा
🔹 अकृषक तरतुदीबाबत मार्गदर्शन
🔹 भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणे अद्ययावत करणे
🔹 Ease of Doing Business सुधारणा व नगरी सुविधा
🔹 ई-मोजणी सेवा
🔹 अॅग्रीस्टॅक नोंदणी
🔹 पी.एम. किसान योजना सेवा
🔹 तक्रार निवारण सेवा

 विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

✔ रहिवासी दाखला

✔ उत्पन्न दाखला

✔ जात दाखला

✔ इतर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे

✔ लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा

या शिबिरामध्ये महसूल विषयक सेवांसोबतच शैक्षणिक दाखले (उदा. रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात दाखला इ.) काढण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेच्या वेळी होणारी धावपळ आता थांबणार आहे.

कॉलेज प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा आणि इतर शैक्षणिक कारणांसाठी आवश्यक असलेले दाखले आता आपल्या गावातच, एका दिवसात मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



 अभियानाचे उद्दिष्ट

✔ महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांना Single Day Service Delivery
✔ महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी
✔ डिजिटल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करणे
✔ नागरिकांना शासन सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे


प्रशासनाचे आवाहन

“तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या शिबिरात सहभागी होऊन आपल्या महसूल विषयक समस्या त्वरित सोडवून घ्याव्यात,” असे प्रांताधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब व तहसीलदार श्री. अनंत गुरव साहेब यांनी स्पष्ट केले आहे.

राजस्व प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून पाटण तालुक्यातील जनतेसाठी ही सुवर्णसंधी आहे.

 नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह नियोजित ठिकाणी उपस्थित राहावे आणि शासनाच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

कुंभारगावात वार्ड रचनेवरून संताप! तलाठींची मनमानी? ग्रामस्थ आक्रमक.

कुंभारगाव ता. पाटण  – ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर नव्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच वार्ड रचनेवरून कुंभारगावात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वार्ड रचना बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 पूर्वीची रचना कुंभारगाव ग्रामपंचायतीत एकूण ११ सदस्य आणि ४ वार्ड आहेत –
श्रीराम वार्ड
लक्ष्मी वार्ड
मरीआई वार्ड
नाईकबा वार्ड
मागील पंचवार्षिक निवडणुकीत –

श्रीरामवार्ड, लक्ष्मीवार्ड, मरीआई या प्रत्येक वार्डातून ३ सदस्य
नाईकबा वार्डातून २ सदस्य
अशी रचना होती.

  यंदा करण्यात आलेल्या बदलानुसार –
श्रीराम – ३ सदस्य
मरीआई – ३ सदस्य
नाईकबा – ३ सदस्य
लक्ष्मी – २ सदस्य
अशी नवीन विभागणी करण्यात आली आहे.

याबाबत भैरव दरा हा लक्ष्मीवार्ड मध्ये असलेला भाग लक्ष्मी वार्डातच राहावा या वार्डाला नाईकबा वार्ड मध्ये सामील केले आहे याबाबत भैरवडा येथील ग्रामस्थांना विश्वासात न देता हा निर्णय घेतलेला आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या
वार्ड रचनेबाबत कोणतीही पूर्वसूचना, नोटीस  देण्यात आली नाही.
नाईकबा वार्डातील मतदार संख्या कमी आहे कारण देत बदलाबाबत कोणतीही चर्चा न करता निर्णय लादण्यात आला.
हा निर्णय एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने घेण्यात आल्याने लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाला आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर एका ग्रामस्थाने सांगितले की,“नाईकबा वार्डातील बदल आम्हाला मान्य नाही. आम्ही लवकरच तहसीलदार साहेबांकडे लेखी तक्रार अर्ज देणार आहोत. अर्ज दिल्यावर नाव छापा.”

याबाबत तलाठी बाळासाहेब गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही केवळ “कच्ची चिठ्ठी” असल्याचे सांगितले. नाईकबा वार्डातील बदलाबाबत विचारले असता त्यांनी,
“तुमचे तलाठी आकाश गुरव आहेत, त्यांना विचारा. ग्रामस्थांना का कळवले नाही ते तेच सांगतील,”
असे उत्तर दिल्याचे समजते.

दरम्यान, दोन तलाठींच्या परस्पर जबाबदारी ढकलण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये अधिक संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांकडून लवकरच तहसीलदार, पाटण यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली जाणार असल्याचे समजते. जर प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही, तर गावात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
कुंभारगावातील ही वार्ड रचना प्रकरण आता केवळ प्रशासकीय निर्णय न राहता लोकशाही हक्क आणि पारदर्शकतेचा प्रश्न बनला आहे.
ग्रामस्थांचा आक्रोश वाढत असताना प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये पाणीटंचाईचा स्फोट!शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशनचे थेट एम वॉर्ड मुख्य जलअभियंत्याकडे निवेदन.

 
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांचे हाल अपरंपार वाढले आहेत. विशेषतः शिवप्रेरणा  वेल्फेअर असोसिएशन, विजय लक्ष्मी चाळ, विश्वकर्मा चाळ, राजगड चाळ या भागांतील रहिवाशांना या पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे.

नळाला अनियमित व कमी दाबाने पाणी येणे, काही वेळा अनेक दिवस पाणीपुरवठा खंडित राहणे, यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष संभाजी थोपटे व सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अंकुश चोरघे यांनी थेट च्या एम वॉर्ड कार्यालयात जाऊन मुख्य जलअभियंता मा. ढवळे साहेब यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून महाराष्ट्र नगर परिसरातील पाणी समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले. नागरिकांच्या रोजच्या हालअपेष्टा, अस्वच्छ पाण्याचा धोका याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली.

मुख्य जलअभियंता मा. ढवळे साहेब यांनी या निवेदनाची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच आजच संबंधित विभागाचे अभियंते (S.E) व (J.E) यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी या हालचालीचे स्वागत केले असून, प्रशासनाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर कृतीत उतरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मानखुर्द महाराष्ट्र नगरातील पाणीप्रश्नावर आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाटणच्या खोऱ्यात तीर्थ क्षेत्र श्री धारेश्वर मठ(मंदिर).

तळमावले = श्री क्षेत्र धारेश्वर मठ (मंदिर) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दिवशी खुर्द येथे हे मठ (मंदिर) आहे हे पाटण पासून 17 किलोमीटर अंतरावर आहे याचे वैशिष्ट्य हे अत्यंत जागृत आणि रहस्यमय स्वयंभू महादेवाचे स्थान मानले जाते या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरण आहे उंच डोंगर कपारीत तीर्थक्षेत्र श्री धारेश्वर मठ (मंदिर) असून पाटण वरून जाताना नागमोडी वळणे असून डोंगराच्या पायथ्यापासून तीव्र घाट चालू होतो ही वेडी वाकडी वळणे घेत उंच ठिकाणी धारेश्वर मठ मंदिर दिसून येतो या उंच डोंगरावर अत्यंत प्राचीन गुफा असून येथे श्रीराम, पाचपांडव, विभि षण, हनुमान, यांनी लिंग पूजा अनुष्ठान केलेले आहे गंगा भगीरथी, गंगोत्री, जमनात्रि कुंड, सप्त जलदेवता, केदारनाथ, लक्ष्मण, वीरभद्र व आदे श्ववर बाबा तीर्थक्षेत्र असून आदीश्वरचरणी शिर अर्पण करून शिव रक्षा मिळवण्यासाठी श्री प्रभूरामानी कपिला षष्ठीस असते तेव्हा पाषाणमई श्रीरामाचे शिरातून व करवत उपक्षेत्रातील धडातून दुग्धगंगा येते त्या पर्वकाळात दुधासारखे असलेले जल हे एरवी साधे पाणी दिसते ते कधी आटत नाही तेजल गुरु तीर्थ म्हणून साठ गाव पाटण परगना विविध प्रांतातील वीरशैव भक्त माहेश्वर तथा भाविक जण आपापल्या गावातील देवांना तसेच घरच्या देव देवतांना अभिषेक करण्याकरता येथील पाणी नेतात संतती -संपत्ती दायक अशा आदी मठ संस्थान धारेश्वर महाशिवतीर्थ क्षेत्रामध्ये पर्यावरण आदी गुरुपीठ असल्याने असल्याने हे "प्रयागसम" पवित्र क्षेत्र आहे राजापूरला गंगा येथे तेव्हा येथील धार कमी होते या धारेच्या पाण्यामुळे त्वचारोग बरे होतात या पाण्याला शेवळ होत नाही येथे गणपती नाही केवळ तो द्वादिश लिंग युक्त कलश गुरु गादी म्हणून परंपरेने आग्र पूजेचा मान आहे श्रीम दुज्जनीय सध्दमृ सिंहासनाचे वृष्टी सूत्र नंदी गोत्रिय नंदी गोत्रिय कक्षिकांत उपसूत्रिय आदिमठ संस्थान श्री धारेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे या मठावर 33 शिवचार्य त्यापैकी 21 शिवचार्यांची समाधी येथील गुफेमध्ये असून पुणे- तीन, ढालगाव तीन, कसबे सागाव- दोन (कागल), कोडोली वारणा - एक, बागलकोट (बाळापुर) एक, शिवनगी - एक, घरेडी (सांगोला)-एक, काशी एक, वगैरे ठिकाणी समाध्या आहेत..
खासदार, मंत्री, तथा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत तीर्थक्षेत्र क आणि ब मधून रस्ते पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छतागृह, सभागृह इत्यादी कामे झालेले आहेत परंतु घाट मार्गाचा विचार करता पूर्ण घाट मार्गावर संरक्षक बॅरगेट लावणे आवश्यक आहे . वार्षिक यात्रा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दीपावलीच्या लक्ष दीपोत्सव, मानाची काटेपालखी हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे .. या ठिकाणी दर महिन्याच्या अमावस्या दिवशी श्री धारेश्वर मठ मंदिरात स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक, महाआरती केल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यादरम्यान श्री क्षेत्र धारेश्वर देवस्थानचे मठाधीकारी राष्ट्रसंत ज्ञानराज पद्मभास्कर धर्मरक्षक श्री,ष, ब्र,१०८ डॉ, निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज येणाऱ्या भक्तांसाठी उपस्थित राहून समस्या व अडचणी जाणून घेत त्याबाबतीत योग्य मार्गदर्शन करतात , चौकट =. दरमहाआरोग्य,रक्तदान,संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते व ५१ ते५४ गायी वगोवंशाचे योग्य प्रकारे संगोपन केले जाते या पवित्र ठिकाणी शेती आहे परंतु पाण्याअभावी त्या शेतातून विविध प्रकारची पिके घेता येत नाहीत या ठिकाणी विहीर खोदून पाणी मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे पावसाळ्यातील अतिवृष्टी, भूस्खलन मध्ये असलेल्या पूर्वी असलेल्या विहिरी बुजून गेल्या आता २ नवीन विहिरी साठी पंचवीस लाख खर्च केले आहेत वीज व सौर प्रकल्प राबवून शेतीच्या माध्यमातून शेतीचा विकास साधला जाईल असे नूतन मठाअधिपती बालब्रह्मचारी श्री,ष,ब, बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य स्वामी यांच्याकडून सांगण्यात आले.

“तहानलेल्या जीवांसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार”सोनवडेतील विद्यार्थ्यांची ‘पक्ष्यांसाठी पाणपोई’—उन्हाळ्यात मानवतेचा हृदयस्पर्शी संदेश.


पाटण :
आजच्या वाढत्या तापमानामुळे माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही तीव्र पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे नद्या, ओढे आणि पाणवठे कोरडे पडत असून, पक्ष्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली “पक्ष्यांसाठी पाणपोई” हा उपक्रम हाती घेतला. शाळेच्या परिसरातील झाडांखाली तसेच झाडांवर मातीच्या भांड्यांमध्ये स्वच्छ पाणी आणि धान्य ठेवण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ शाळेपुरतेच मर्यादित न राहता, आपल्या घरासमोरही पाण्याची भांडी ठेवण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी दररोज त्या भांड्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारीही स्वतःवर घेतली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ एकदिवसीय न राहता सातत्यपूर्ण सेवा कार्य ठरत आहे.
“पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा” असा प्रभावी संदेशही यामधून देण्यात आला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शरद शेजवळ सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की,

“अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि संवेदनशीलता विकसित होते. लहानशा कृतीतून मोठा बदल घडवता येतो, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.”

उन्हाळ्याच्या तडाख्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी सरसावलेले हे हात खऱ्या अर्थाने मानवतेचे प्रतीक ठरले आहेत. समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा नावीन्यपूर्ण उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले असून, विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

तळमावले - संत निरंकारी मिशन मार्फत ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता.

तळमावले 24.02.2026 संत निरंकारी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी डॉ. राजेंद्र यादव , डॉ. सौरभ खोडके, ढेबेवाडी ग्रामपंचायतिच्या सरपंच रुपाली पाटील, उपसरपंच अभिजित कडव, आण्णा कारंडे, संत निरंकारी मिशन प्रचारक दीपक कणसे, ढेबेवाडी ब्रँच मुखी उषाताई दिंडे, सेवादल इन्चार्ज अभिजित देशमुख, वनिता बडेकर यांच्यासह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व संत निरंकारी मिशन अनुयायी यांची उपस्थिती होती. डॉ. राजेंद्र यादव म्हणाले की संत निरंकारी मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. सद्गुरूंच्या शिकवणीतून सर्व अनुयायी स्वयंप्रेरनेने मनोभावे सेवा करत आहेत. ही केलेली सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने केली गेली आहे. संत निरंकारी मंडळ ब्रँच ढेबेवाडी च्या सर्व सदस्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूचा सर्व परिसर स्वच्छ केल्यानंतर दिपक कणसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. सदर अभियानास ग्रामपंचायत ढेबेवाडी व ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यकामाचे सूत्रसंचलन गोपी जाधव यांनी केले तर आभार उषाताई दिंडे यांनी मानले.

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

कराड : सातारा जिल्ह्यातील कराडलगतच्या मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा मोठा पर्दाफाश झाला असून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत तिघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई कराड पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


🔎 कसा लागला मागोवा?

सध्या देशभर बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविषयी मोठी चर्चा सुरू असताना कराड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मुंढे येथील सह्याद्री रेसिडेन्सी या इमारतीत काही संशयित परदेशी नागरिक राहत आहेत.

पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी पथकासह तात्काळ धाड टाकली. चौकशीत बिलाल सलालउद्दीन मोल्ला याच्यासह तिघे जण गेल्या सहा महिन्यांपासून येथे राहत असल्याचे उघड झाले.


📌 मुंबईतून बनावट आधारकार्ड तयार

कसून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
या घुसखोरांनी मुंबईत बनावट पत्त्याचे आधारकार्ड तयार करून घेतल्याची कबुली दिली. कोणतीही वैध कागदपत्रे नसताना त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.

अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे:

  • बिलाल सलालउद्दीन मोल्ला
  • आयेशा अदिल शेख
  • नसरिन अब्दुलसालाय मोल्ला

(सर्व मूळ रहिवासी – बांगलादेश)


⚖️ आश्रय देणाऱ्यावरही गुन्हा

या बांगलादेशी नागरिकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा करण बापू कांबळे (वय 29) याच्यावरही कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीररित्या देशात प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणे हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


🚔 कराड पोलिसांची सतर्कता कौतुकास्पद

या कारवाईमुळे कराड शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

घणसोलीचा दमदार आवाज महानगरपालिकेत !श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समितीवर निवड.


नवी मुंबई : 

घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे युवा व अभ्यासू नगरसेवक श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती पदी निवड झाल्याने घणसोली परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्यांना सुलभ करण्यासाठी कार्य करणाऱ्या या महत्त्वपूर्ण समितीवर शिंदे यांची नियुक्ती ही त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची आणि लोकाभिमुख भूमिकेची पावती मानली जात आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, रुग्णालये व दवाखान्यांच्या सुविधा सुधारणा, औषधसाठा, स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी यांसारख्या जबाबदाऱ्या या समितीमार्फत पार पाडल्या जातात. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व आहे.

श्री. सौरभ शिंदे यांनी यापूर्वीही घणसोली परिसरात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या निवडीमुळे प्रभाग ९ मधील आरोग्य सुविधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

यावेळी बोलताना श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे म्हणाले की “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन अधिक परिणामकारक सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांना उत्तम आणि सुलभ आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न करेन,” 



घणसोली - नगरसेविका सौ.वैशालीताई सुनील मस्कर यांची महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी निवड.

घणसोली - नगरसेविका सौ.वैशालीताई सुनील मस्कर यांची महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी निवड.

घणसोली (प्रभाग क्रमांक ९) मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सौ. वैशालीताई सुनील मस्कर यांची च्या महिला व बालकल्याण समिती सदस्य पदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

घणसोलीकरांनी दाखवलेला विश्वास आणि भरघोस मतांनी दिलेला कौल यामुळे वैशालीताईंना नगरसेविका पदाची जबाबदारी मिळाली होती. आता महिला व बालकल्याण समिती सदस्यपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याने घणसोली प्रभागाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

यावेळी बोलताना सौ. वैशालीताई सुनील मस्कर म्हणाल्या की,“घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. प्रभागातील महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. महिला सक्षमीकरण, बालकांच्या आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा, तसेच मूलभूत सोयीसुविधांच्या उभारणीवर माझा विशेष भर राहील.”

महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून परिसरातील अंगणवाडी सुविधा, आरोग्य सेवा, पोषण आहार योजना, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

घणसोली प्रभागातील पाणी, रस्ते, गटारे, स्वच्छता, उद्याने आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही ठोस भूमिका घेत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

घणसोलीच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सौ. वैशालीताई मस्कर यांच्या या निवडीमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये महिला नेतृत्वाची नवी ताकद निर्माण झाली असून, आगामी काळात विकासकामांचा वेग अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा मुंबई येथे गौरव माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत राज्यात अव्वल राज्यपाल उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते एक कोटीचा पुरस्कार

ढेबेवाडी: वार्ताहर 
माझी वसुंधरा अभियान ४.०  स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा शनिवारी मुंबई येथील कार्यक्रमात गौरव करण्यात आला.   महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत ,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज आदिंच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र माने, सदस्य दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने, पोलीस पाटील विकास माने, अधिकराव माने, इंदुमती माने, सुरेखा माने, पवणजीत माने, रमेश गुंजाळकर आदिंनी हा पुरस्कार स्वीकारला.  
  राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.  
मान्याची वाडी ग्रामपंचायतीने या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून हॅट्रिक केली आहे. 
     ही स्पर्धा ग्रामीण आणि शहरी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राबवली जाते. पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचतत्त्वावर या स्पर्धेचे मूल्यांकन केले जाते.  यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाची पाहणी करण्यात येते. सन 2023 -24 या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव परिसरामध्ये केलेले वृक्षारोपण  त्याचबरोबर जुन्या झाडांचे संगोपन, रूप टॉप वॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरणीय दृष्ट्या प्रबोधन आणि जनजागृती, अपारंपारिक ऊर्जा, बायोगॅस, सौर पंप, सौर ऊर्जा त्याचबरोबर ई- वेहिकल, ई- चार्जिंग सेंटर, कंपोस्ट खत, ओला कचरा, सुका कचरा यावरती प्रक्रिया आदी बाबींवर मूल्यांकन केले जाते.
    या ग्रामपंचायतीने अपारंपारिक ऊर्जा विकास मध्ये काम करताना महाराष्ट्रातले पहिले सौर ग्राम म्हणून बहुमान मिळवला आहे. माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये मान्याचीवाडीने सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून एक कोटी रुपयांच्या पुरस्कारासह या स्पर्धेत हॅट्रिक मिळवली आहे.  या यशाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,  जिल्हाधिकारी संतोष पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी सरिता पवार आदिंनी अभिनंदन केले.

ना. शंभूराज देसाई यांच्याकडून मंद्रूळकोळे गटात परफेक्ट नियोजन करत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम.

ढेबेवाडी प्रतिनिधी मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीत राज्याचे पर्यटन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मतदार संघात येऊन दिलेल्या शब्दाप्रमाणे या मतदार संघात बारकाईने लक्ष ठेवत एकाच फटक्यात राजकीय पटावरची सारी समीकरणे उलथवून टाकली. प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई म्हणून भावनिक हाक देणाऱ्या विरोधकांचा सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन ना. शंभूराज देसाई यांनी परफेक्ट नियोजन करून करेक्ट कार्यक्रम केला. अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. ढेबेवाडी विभाग देसाई गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखा जातो, ही निवडणूक फक्त निवडणूक नव्हती, तर वर्चस्वाची निर्णायक लढत होती. निवडणूक लागल्या नंतर या विभागात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ना. शंभूराज देसाई यांनी मंद्रूळकोळे गटाकडे माझे विशेष लक्ष असणार हे अधोरेखित करून सांगतो असे सांगितले होते. यानुसार या लढतीत ना. देसाई यांनी विरोधकांचा ‘गेम ओव्हर’ करत विरोधकांचे कांडके पाडले. याची चांगलीच चर्चा सुरू आहे. या लढतीत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी सभापती सत्यजित पाटणकर, ना. नरेंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील तसेच ज्येष्ठ नेते माजी शेती सभापती हिंदूराव पाटील यांच्यासह स्थानिक पातळीवरील सगळी आघाडी धुळीस मिळाली. विरोधकांनी एकत्र येत ताकद आजमावली; पण देसाई यांच्या नियोजनबद्ध डावपेचांपुढे ती सारी ताकद निष्प्रभ ठरली. या विजयाने एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित झाली कोट्यावधी रुपयांचा झालेला विकास हे सर्वात महत्वाचे भांडवल ठरले. ढेबेवाडी परिसरात असणारे अनेक प्रश्न - अतिवृष्टी, महापुरांचा तडाखा, जंगली जनावरांचा उपद्रव, कोरोना महामारीची झळ अशी अनेक संकटे यावेळी त्याच्यावर मार्ग काढणे लोकांना मदत करणे त्यांची कामे हिरहिरीने सोडविणे हे काम ना. देसाई यांनी तळमळीने केले यामुळे त्यांची सर्वसामान्य लोकांशी नाळ जुळली आहे. या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पालकमंत्री म्हणून देसाई यांनी प्राधान्याने केले. रस्ते, पाणी, वीज, पुनर्वसन, शासकीय मदत—प्रत्येक बाबतीत ढेबेवाडी मतदारसंघाला झुकते माप देत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. म्हणूनच येथील मतदार कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आदेश मानून मतांचे दान देसाई यांच्या पारड्यात टाकतात. पाटण तालुक्यात निवडणूक कोणतीही असो—देसाई यांच्या बैठकीत एकदा ठरले की ठरले! यंदा जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा कंडका पाडायचाच, असा ‘शंभू राज’ांचा हुकूम झाला आणि कार्यकर्ते झोकून देऊन कामाला लागले. देसाई गटाचे वैशिष्ट्य म्हणजे नेता ते कार्यकर्ता असा थेट संवाद. शेताच्या बांधावरून असो वा शासकीय कार्यालयातून—सामान्य माणूस थेट मंत्र्यांशी संवाद साधतो. त्यामुळे कामे त्वरित होतात आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश कायम राहतो. मंद्रुळकोळे गटात विधानसभेला देसाई यांना नेहमी आघाडी मिळते; ग्रामपंचायत निवडणुकीतही गटाचे वर्चस्व असते. मात्र जि.प. आणि पं.स. निवडणुकांत याआधी पाटणकर गटाला यश मिळाले होते. हाच धोका ओळखून देसाई यांनी आधीच चंग बांधला—“यंदा हा गड काबीज करायचाच!” निवडणुकीपूर्वीच त्यांनी पावले उचलत सणबूर येथील पाटणकर गटाच्या बड्या कार्यकर्त्याला गळाला लावले. सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष संदिप जाधव यांच्यासह तब्बल चारशे कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणला. पारंपरिक पाटणकर गड मानल्या जाणाऱ्या सणबूरमध्ये ही मुसंडी निर्णायक ठरली. संदिप जाधव अंतर्गत कुरघोडीचे बळी ठरत होते, क्षमता असूनही त्यांना दुय्यम वागणूक मिळत होती. हीच संधी ओळखत देसाई यांचे सुपुत्र व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी त्यांना आपल्या कवेत घेतले. जाधव यांच्या पत्नी संपदा जाधव यांना उमेदवारी देत अचूक डाव साधला. परिणामी शिवसेनेच्या जि.प. उमेदवार मृणाल पाटील यांना सणबूर गणातून उच्चांकी मताधिक्य मिळाले आणि भाजपच्या डॉ. प्राची पाटील यांना अखेरपर्यंत लढूनही पराभव पत्करावा लागला. अवघ्या बावीस वर्षांच्या मृणालकडून झालेला हा पराभव विरोधकांसाठी जबर धक्का ठरला. दुसरीकडे, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील यांनी पुत्र नितीन पाटील यांना निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र ऐनवेळी उमेदवारी बदलत देसाई यांनी मुंबईत कार्यरत नितीन काळे यांना संधी दिली. मालदन व परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये प्लसिंगची आखणी करून त्यांनी संपूर्ण गण फिरवला आणि नितीन पाटील यांचा पराभव घडवून आणला. ही खेळी गेमचेंजर ठरली. या संपूर्ण रणनितीमागे युवा नेते यशराज देसाई यांची सूक्ष्म आखणी होती. माजी जि.प. सदस्य विजय पवार व माजी पं.स. सदस्य संतोष गिरी यांच्यावर गुप्त जबाबदारी सोपवून गटाची सखोल छाननी करण्यात आली. जनतेच्या मनाचा अचूक वेध घेत उमेदवारी निश्चित करण्यात आली. परिणामी माथाडी सारख्या बलाढ्य शक्तीचाही पराभव शक्य झाला. दरम्यान, पालकमंत्री देसाई यांच्यावर गणेश नाईक, जयकुमार गोरे, चित्रा वाघ तसेच स्थानिक नेत्यांनी सडकून टीका केली. मात्र देसाई यांनी संयम ढळू दिला नाही. प्रतिटिप्पणी न करता त्यांनी फक्त विकासाकडे जनतेचे लक्ष वेधले. “विकासावर निवडणूक जिंकू शकतो,” हा आत्मविश्वास त्यांनी कृतीतून दाखवून दिला. शेवटी निकाल लागला—आणि भाजपला चारी मुंड्या चित करत देसाई गटाने मंद्रुळकोळेवर झेंडा रोवला. आश्वासनांपेक्षा शाश्वत विकासाला मतदारांनी पसंती दिली. “मी जे बोललो तेच करून दाखवले,” हा संदेश संपूर्ण जिल्ह्यात गेला. मंद्रुळकोळेचा गड हा देसाई गटाचा अभेद्य बालेकिल्ला आहे, हे या विजयाने ठसठशीतपणे सिद्ध झाले.

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

धामणी - वसंतगड ते चव्हाणवाडी: शिवज्योतीच्या तेजात दुमदुमला परिसर! इतिहासाचा अभिमान, समाजकार्याची शपथ आणि विज्ञानाची झेप — अविस्मरणीय शिवजयंती सोहळा!

धामणी -  वसंतगड ते चव्हाणवाडी: शिवज्योतीच्या तेजात दुमदुमला परिसर! इतिहासाचा अभिमान, समाजकार्याची शपथ आणि विज्ञानाची झेप — अविस्मरणीय शिवजयंती सोहळा! 

चव्हाणवाडी (धामणी) येथे यंदाची शिवजयंती अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक वारसा, सामाजिक बांधिलकी आणि आधुनिक विज्ञानाची जोड देत हा सोहळा परिसरासाठी आदर्शवत ठरला.

किल्ले वसंतगड येथून   शिवज्योत प्रज्वलित करून चव्हाणवाडीपर्यंत आणली ,तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत इतिहासाच्या सुवर्णक्षणांची उजळणी केली.

कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धा आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम. या निमित्ताने शिवशक्ती वाचनालय आणि पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला चालना देण्याचा तसेच नागरिकांना शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरला.

महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी एकोपा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी शिवचरित्रावर भाष्य करत युवकांना इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी पाणी या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. पाणीटंचाईसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट उपस्थितांनी लक्षपूर्वक पाहिला.

कार्यक्रमात विज्ञानाची जोड देत टेलिस्कोपच्या माध्यमातून आकाशगंगा दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच व्ही.आर. सेटच्या सहाय्याने सौरमालेचे थरारक दर्शन घडवण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना अवकाशविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुवर्णसंधी लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिवभक्तांसाठी महाभोजनाचे आयोजन करण्यात आले.शेकडो नागरिकांनी एकत्र येत बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश दिला.

इतिहासाची प्रेरणा, समाजसेवेची भावना, सांस्कृतिक जतन आणि विज्ञानाची सांगड घालत चव्हाणवाडी (धामणी) येथील हा शिवजयंती सोहळा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला. ग्रामस्थांची एकजूट आणि कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

शिवशक्ती मित्र मंडळ, चव्हाणवाडी (धामणी) यांच्या वतीने कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. 

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

सलग तिसऱ्यांदा राज्यात नंबर वन! मान्याचीवाडीचा पर्यावरणात दबदबा कायम / एक कोटींचे बक्षीस जाहीर.

 सलग तिसऱ्यांदा राज्यात नंबर वन! मान्याचीवाडीचा पर्यावरणात दबदबा कायम / एक कोटींचे बक्षीस जाहीर.

पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनात राज्यात सलग तिसऱ्यांदा अव्वल ठरून हॅट्‌ट्रिक नोंदवली आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत ग्रामपंचायतीने एक कोटी रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह आपल्या नावावर केले. ही आनंदवार्ता समजताच गावकऱ्यांनी सकाळी एकत्र येत  जल्लोष साजरा केला.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पंचतत्त्वांच्या आधारे मूल्यमापन केले जाते. पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या घटकांवर आधारित कामांची पाहणी करून गुणांकन केले जाते. मान्याचीवाडीने २०२३-२४ या वर्षात केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे राज्यात अव्वल स्थान मिळवले.


🌱 पर्यावरणपूरक उपक्रमांची भक्कम पायाभरणी

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांमध्ये —

  • मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि जुन्या वृक्षांचे संगोपन
  • रूफटॉप वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीची अंमलबजावणी
  • पर्यावरण जनजागृती आणि प्रबोधन मोहिमा
  • बायोगॅस प्रकल्प, सौरपंप, सौरऊर्जा वापर
  • ई-वाहने आणि ई-चार्जिंग सेंटरची सुविधा
  • ओला व सुका कचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत निर्मिती

या सर्व उपक्रमांमुळे गावाने शाश्वत विकासाचा आदर्श उभा केला आहे.

विशेष म्हणजे, अपारंपरिक ऊर्जा विकासात भरीव कामगिरी करत महाराष्ट्रातील पहिले ‘सौरग्राम’ म्हणूनही मान्याचीवाडीने बहुमान मिळवला आहे.


🎉 गावकऱ्यांचा जल्लोष, मान्यवरांचे अभिनंदन

या यशाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई तसेच गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवार, दि. २१ रोजी मुंबई येथे भव्य सन्मान सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक यशामुळे पाटण तालुक्याचा नावलौकिक राज्यभर उजळला असून, पर्यावरण संवर्धनात ग्रामीण भागही कशी क्रांती घडवू शकतो याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.



बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

मालदन येथे दहावी निरोप समारंभ उत्साहात; मृणालताई पाटील व नितीनदादा काळे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छातर विविध गावांमध्ये आभार दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालदन येथे दहावी निरोप समारंभ उत्साहात; मृणालताई पाटील व नितीनदादा काळे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

तर विविध गावांमध्ये आभार दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 मालदन, ता. पाटण – दहावी निरोप समारंभ व पारितोषिक वितरण

दि.17 फेब्रुवारी मालदन (ता. पाटण) येथील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल, मालदन येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मा. कु. मृणाल महेश पाटील व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मा. श्री. नितीन काळे (दादा) प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटी ठेवून उत्तम यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गुणवंत व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमात शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.


 आभार दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा परिषद सदस्या मा. कु. मृणाल महेश पाटील व पंचायत समिती सदस्या मा. सौ. संपदा संदीप जाधव यांच्या आभार दौऱ्याला विविध गावांत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले.


 हुंबरने, ता. पाटण

हुंबरने येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ग्रामस्थांनी मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी गावातील प्रलंबित प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते व इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन देत सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


 काहीर, ता. पाटण

काहीर येथेही आभार दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गावातील विविध समस्या व विकासकामांबाबत चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. ग्रामस्थांनी नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.


 आंबेघर, ता. पाटण

आंबेघर येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मान्यवरांनी गावातील अडचणी ऐकून घेतल्या व त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. सर्व ग्रामस्थांनी नव्या नेतृत्वाचे स्वागत करून विश्वास व्यक्त केला.


 गोकुळ तर्फ मरळी, ता. पाटण

गोकुळ तर्फ मरळी येथेही आभार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
ग्रामस्थांनी सन्मानपूर्वक स्वागत करत गावाच्या विकासासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित सदस्यांनी सर्व प्रश्नांचा आढावा घेऊन लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.


 विकासाच्या दिशेने नवी वाटचाल

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या विकासकामे या निवडणुकीत यशाचे गमक असल्याचे जाणवले या संपूर्ण आभार दौऱ्यात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, विश्वास आणि अपेक्षा स्पष्टपणे जाणवत होत्या.
नवनिर्वाचित प्रतिनिधींनी “गाव विकास हीच प्राथमिकता” असल्याचे सांगत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहण्याचा कु. मृणाल महेश पाटील यांनी निर्धार व्यक्त केला.

 या दौऱ्यामुळे गावोगावी नव्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी निवड.

प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी  निवड.

दौलतनगर : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या प्रतिष्ठेच्या परीक्षेत यांनी घवघवीत यश संपादन करत ‘कृषी अधिकारी’ (Agriculture Officer) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय यशामुळे दौलतनगर परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्या सध्या येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल (अध्यक्ष, मोरणा शिक्षण संस्था) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी प्रा. जाधव यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

तसेच, चे चेअरमन , युवा नेते , तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीनेही त्यांचे कौतुक करण्यात आले.

या गौरवास्पद यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य , सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्रा. तेजश्री जाधव यांच्या या यशामुळे महाविद्यालय व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


प्रेरणादायी वाटचाल

ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. परिश्रम, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त होत आहे.

प्रा. कु. तेजश्री जाधव यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 

बनपुरीत एस.एस.सी. विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

बनपुरीत एस.एस.सी. विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

बनपुरी : येथील श्री नाईकबा विद्यामंदिर येथे दहावी (एस.एस.सी.) परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला एस.एस.सी. शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण व नुतन जिल्हा परिषद सदस्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना प्रेरणा, आत्मविश्वास आणि सकारात्मक उर्जा देणारा हा कार्यक्रम विशेष ठरला.

कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या प्रमुख उपस्थित होत्या. तसेच अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य (माजी सहसचिव प्रशासन, श्री स्वामी समर्थ विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) होते. युवा उद्योजक , सरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष , नाईकबा यात्रा कमिटी अध्यक्ष , मा. आनंदराव कंक आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात विधीवत सरस्वती पूजनाने करण्यात आली. मुख्याध्यापक श्री. कोळी एस. बी. यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले.

“परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक विचार हीच यशाची गुरुकिल्ली आहे,”
असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.

यावेळी मा. मृणालताई पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शिस्त, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावेत, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर. के. भोसले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासातील सातत्य, वाचनाची सवय आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे यश निश्चित मिळते, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात शाळेतील गुणवंत व विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांचा सत्कार होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वातावरण भारावून गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश लोंढे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. शेख टी. एच. यांनी मानले. शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकूणच, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा आणि यशाचा आत्मविश्वास जागवणारा हा शुभचिंतन सोहळा बनपुरीत संस्मरणीय ठरला. 

पाटणचा पुढचा ‘सत्ता कर्णधार’ कोण? सभापती-उपसभापतीपदावरून जोरदार चर्चा! १३ जागांचा भक्कम बहुमत… पण सभापती कोण? पाटणमध्ये राजकीय सस्पेन्स शिगेला!

 पाटणचा पुढचा ‘सत्ता कर्णधार’ कोण? सभापती-उपसभापतीपदावरून जोरदार चर्चा!

पाटण - पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तालुक्यातील १४ गणांपैकी तब्बल १३ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने स्पष्ट बहुमत सिद्ध केले, तर केवळ १ सदस्य भाजपाकडून निवडून आला आहे. या भक्कम जनादेशानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांकडे.


🔶 सभापतीपदासाठी ‘सर्वसाधारण महिला खुला’ आरक्षण

यंदा पंचायत समिती सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिला (खुला) प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील निवडून आलेल्या महिला सदस्यांमध्ये चुरस वाढली आहे.

सभापतीपदाच्या शर्यतीत पुढील नावे चर्चेत आहेत –

  • विद्या शिंदे (येराड गण)
  • सविता पवार (मुरूड गण)
  • अर्चना पाटील (मल्हारपेठ गण)
  • प्रियांका देसाई (मारूल हवेली गण)

या चारही सदस्यांनी आपल्या-आपल्या गणात भक्कम विजय मिळवत संघटन कौशल्य आणि जनसंपर्काची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे यापैकी कोणाला संधी मिळणार? याबाबत तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी आणि पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


🔷 उपसभापतीपदासाठी सचिन यादव आघाडीवर?

दरम्यान, उपसभापती पदासाठी ढेबेवाडी विभागातील कुंभारगाव गणातून निवडून आलेले सचिन यादव यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्तरावर त्यांना व्यापक पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांशी सलोखा यामुळे त्यांचे नाव पुढे येत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.


 तालुक्याचे लक्ष एका निर्णयाकडे

पाटण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असले तरी सभापती आणि उपसभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ही निवड केवळ पदाची नसून, पुढील पाच वर्षांच्या सत्तेच्या समीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि हालचाली वाढल्या आहेत.

अंतिम शिक्कामोर्तब कोणाच्या नावावर होते आणि पाटण पंचायत समितीच्या सत्तेचा कारभार कोणाच्या हाती जातो!हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल.

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

शिंदेवाडी येथे नवनिर्वाचित प्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात.

 शिंदेवाडी येथे नवनिर्वाचित प्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात.


दिनांक – 15 फेब्रुवारी 2026 शिंदेवाडी, चोरगेवाडी व आंबवडे परिसरात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या कु. मृणाल महेश पाटील आणि पंचायत समिती सदस्या सौ. संपदा संदीप जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात हा सोहळा संपन्न झाला.

सत्कारावेळी बोलताना कु. मृणाल पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही जिल्हा परिषद निवडणूक सोपी नव्हती. माझ्या विरोधात तगड्या उमेदवार होत्या. मात्र या भागात पालकमंत्री ना. श्री. शंभूराज देसाई साहेबांनी केलेल्या विकासकामांमुळे मतदारांनी विकासाला कौल देत मला आणि आमच्या गटातील दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले.”

त्यांनी पुढे सांगितले की, श्री. रविराज देसाई दादा, कारखान्याचे चेअरमन श्री. यशराज देसाई दादा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे वडील श्री. महेश पाटील साहेब यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे ही निवडणूक सुलभ झाली. “आपण मला निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा पूर्ण प्रयत्न करेन,” असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उद्योजक महेश पाटील साहेब, मनोज मोहिते बापू, शिवाजीराव शेवाळे आण्णा, जयवंत जानुगडे तात्या, विकास गिरीगोसावी, सुरेश सपकाळ, विक्रम जगदाळे, संदीप जाधव, लोकनियुक्त सरपंच मनोज पाटील, एकनाथराव जाधव, नाना साबळे, अतुल कंक, राजेंद्र हनबर, माजी सरपंच कृष्णात सुर्वे तसेच आंबवडे गावचे सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

“समर्थनात मिळालेल्या व विरोधात पडलेल्या प्रत्येक मताचा सन्मान जनसेवेच्या माध्यमातून राखला जाईल” - मृणालताई महेश पाटील.“मी तुमची लेक आहे…” — शब्द नव्हते ते नातं होतं; मंद्रुळकोळेत मृणालताईंचा ऐतिहासिक विजय

“मी तुमची लेक आहे…” — शब्द नव्हते ते नातं होतं; मंद्रुळकोळेत मृणालताईंचा ऐतिहासिक विजय

समर्थनात मिळालेल्या व विरोधात पडलेल्या प्रत्येक मताचा सन्मान जनसेवेच्या माध्यमातून राखला जाईल” — हा केवळ निवडणूकपश्चात दिलेला शब्द नव्हता, तर मंद्रुळकोळे गटातील जनतेशी बांधलेलं एक पवित्र नातं होतं.आणि या नात्यालाच जनतेनं मतांच्या रूपाने कौल दिला.


मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यांनी मिळवलेला विजय हा आकड्यांचा नव्हता, तर विश्वासाचा, भावनेचा आणि लेकीवर ठेवलेल्या भरोशाचा विजय होता.
जिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवार म्हणून मृणालताईंनी इतिहास रचला आणि भाजपच्या तगड्या उमेदवार प्राची नरेंद्र पाटील यांना पराभवाचा धक्का दिला.

मतदान नव्हतं, आशेचं दान होतं…

साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूजशी संवाद साधताना मृणालताई म्हणाल्या,
“जनतेनं मला दिलेली संधी मी आयुष्यभर जपणार आहे. माझ्या बाजूने पडलेलं असो वा विरोधात — प्रत्येक मत माझ्यासाठी तितकंच पवित्र आहे. त्या प्रत्येक मताचा सन्मान मी माझ्या कामातून करेन.”

हे शब्द ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळलं — कारण जनतेनंही या निवडणुकीत मत नव्हे, तर आपली अपेक्षा, आपलं भविष्य आणि आपली लेक मतपेटीत टाकली होती.

विकासाच्या वाटेवरची लेक

पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य — विकासाची पायाभरणी मजबूत झाली.
“बरंच काम झालं आहे, काही कामं सुरू आहेत आणि जे अपूर्ण आहे ते पूर्ण करणं हीच माझी खरी कसोटी आहे,” असे सांगताना मृणालताईंच्या शब्दांत आत्मविश्वासही होता आणि जबाबदारीची जाणीवही.

वडिलांचा संस्कार, लेकीचा संकल्प

या विजयामागे मृणालताईंचे वडील उद्योजक महेश पाटील यांची निस्वार्थ सेवा, प्रचंड लोकसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी भक्कम आधार ठरली.
“आजपर्यंत माझ्या वडिलांनी या भागातील जनतेची सेवा केली, कोणताही स्वार्थ न ठेवता. त्या सेवेची परंपरा पुढे नेणं हीच माझी खरी ओळख असेल,” असे सांगताना मृणालताईंचा स्वर क्षणभर थरथरला.

“मी फक्त बनपुरीची लेक नाही…”

निवडणूक प्रचारादरम्यान मृणालताईंनी केलेलं आवाहन आजही प्रत्येक घरात चर्चेचा विषय आहे —
मी आता फक्त महेश पाटलांची किंवा बनपुरीची लेक राहिलेली नाही. मी या संपूर्ण विभागाची लेक म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. लेकीलाच आईवडिलांच्या घराची काळजी असते… मला सेवेची संधी द्या.

या शब्दांनी मंद्रुळकोळे गटातील मने जिंकली.

मंत्र्यांची साद आणि जनतेचा हुंकार

या भावनिक लढ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली साद निर्णायक ठरली —
“एक वेळ मला विधानसभेला मतदान करू नका, पण गट-तट विसरून तुमच्या लेकीच्या पाठीशी उभे राहा,” असे आवाहन त्यांनी केलं.
आणि जनतेनं ते मनावर घेतलं.

हा विजय एका घराचा नाही, संपूर्ण गटाचा आहे

भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल मृणालताईंनी मंद्रुळकोळे गटातील मतदार बंधू-भगिनींचे हात जोडून आभार मानले.
हा विजय सत्ता मिळवण्याचा नसून सेवेची जबाबदारी स्वीकारण्याचा आहे.

आज मंद्रुळकोळे गटात एक नवा विश्वास उगवला आहे —
लेक जिंकली आहे… आणि लेक कधीही आपल्या माणसांना विसरत नाही

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

*कोयना दौलतची रणनिती निर्णायक! भाजपचा एकहाती डाव फसला, मंत्री देसाईंच्या भूमिकेवर जिल्हा परिषद सत्तेचा किल्ला*

कोयना दौलतची रणनिती निर्णायक! भाजपचा एकहाती डाव फसला, मंत्री देसाईंच्या भूमिकेवर जिल्हा परिषद सत्तेचा किल्ला 🔥

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान “पालकमंत्री कोणीही असूदे” अशी उपरोधिक टिप्पणी करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वारंवार डिवचले. मात्र, आता निकालानंतरचे राजकीय चित्र पाहता जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी देसाई यांचीच भूमिका निर्णायक ठरली आहे—हेच वास्तव समोर आले आहे.

जिल्हा परिषदेत एकूण ६५ गट असून बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता आहे. निकालात भारतीय जनता पार्टी ला केवळ २७ जागा मिळाल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस – २०, शिवसेना – १५, काँग्रेस – १, स्वाभिमानी पक्ष – १ अशी एकूण ३७ जागांची आघाडी तयार झाली आहे.
➡️ थोडक्यात, भाजपला स्वबळावर सत्ता मिळवण्यापासून रोखण्यात राष्ट्रवादी–शिवसेनेला यश आले आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच भाजपने महायुतीतील घटक पक्षांना डावलण्याची भूमिका घेतली. उलट, त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला. याच पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीकडे भाजपच्या वरिष्ठांनी पाठ फिरवली.
याला प्रत्युत्तर म्हणून कोयना दौलत या देसाई यांच्या निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आला.
कोयना दौलतवर झालेल्या बैठकीत मंत्री मकरंद पाटील, खा.नितीन पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

 या बैठकीत जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित लढण्याचा ठोस निर्णय झाला. त्यानुसार मतदारसंघनिहाय रणनिती ठरवण्यात आली—आणि त्याचे स्पष्ट पडसाद निकालात उमटले.

आता राष्ट्रवादी (२०) + शिवसेना (१५) = ३५ हे संख्याबळ सत्तेसाठी पुरेसे ठरत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्ता कोयना दौलतवरील वाटाघाटी, समन्वय आणि रणनितीवरच अवलंबून राहणार, हे निश्चित आहे.

पाटणमध्ये सत्ता बदलली नाही—ती अधिक भक्कम झाली; आणि ‘शंभूराज देसाई पॅटर्न’ने तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला.


पाटणवर ‘शंभूराज देसाई पॅटर्न’ची सत्ता! पाटणकर गटाचा बालेकिल्ला जमीनदोस्त – शिवसेनेचा एकतर्फी भगवा फडकला


पाटण :साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज.
पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचा ‘शंभूराज देसाई पॅटर्न’ अक्षरशः फुल्ल चालला असून, पाटणकर गटाचा राजकीय सुपडा साफ झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच पाटणकरांच्या तथाकथित बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असून, जनतेने निर्णायक कौल देत पालकमंत्री यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

७ जिल्हा परिषद गटांपैकी ६ गटांवर शिवसेना–देसाई गटाने मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर भाजप–पाटणकर गटाला केवळ म्हावशी गटात कसाबसा विजय मिळवावा लागला. पंचायत समितीच्या १४ गणांपैकी १३ गणांवर मंत्री शंभूराज देसाई गटाचा भगवा फडकला, तर भाजपला फक्त एका म्हावशी गणावर समाधान मानावे लागले. हा निकाल म्हणजे पाटण तालुक्यातील सत्तासमीकरणांवरचा थेट ‘जनतेचा स्ट्राईक’ मानला जात आहे.

भाजपमध्ये प्रवेशानंतर पाटणकर गट मंत्री देसाई यांची घोडदौड रोखेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात देसाई गटाची वज्रमुठ अधिकच घट्ट झाली. या निवडणुकीत भाजपकडून , , यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. त्यामुळे जोरदार टक्कर अपेक्षित होती; पण पाटणकर जनतेने भाजपला स्पष्ट नकार देत देसाई यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला.

या निकालानंतर पाटण तालुक्यात विजयाचा गुलाल, ढोल-ताशे आणि जल्लोष उसळला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. हा विजय केवळ संख्याबळाचा नाही, तर विकास, कामगिरी आणि नेतृत्वावर विश्वास दाखवणारा जनादेश आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
थोडक्यात, पाटणमध्ये सत्ता बदलली नाही—ती अधिक भक्कम झाली; आणि ‘शंभूराज देसाई पॅटर्न’ने तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला.

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

🔥 पाटणमध्ये राजकीय भूकंप! २२ वर्षीय मृणाल पाटील ठरल्या ‘जायंट किलर’ – भाजपला जबर धक्का 🔥



🔥 पाटणमध्ये राजकीय भूकंप! २२ वर्षीय मृणाल पाटील ठरल्या ‘जायंट किलर’ – भाजपला जबर धक्का 🔥

पाटण तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय बातमी समोर आली आहे. मंद्रुळ कोळे जिल्हा परिषद गटातून भाजपला जबर धक्का बसला असून, माथाडी कामगार नेते यांच्या पत्नी प्राचीताई नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला आहे.

विशेष बाब म्हणजे, अवघ्या २२ वर्षांच्या मृणाल पाटील यांनी हा पराभव घडवून आणत संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. मृणाल पाटील या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत होत्या, तर प्राची पाटील भाजपच्या कमळ चिन्हावर उभ्या होत्या.


अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक.

ही लढत केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित न राहता, ती शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत यांनी राजकीय ताकद दाखवत नरेंद्र पाटील यांच्या गटावर निर्णायक मात केली.

२२ वर्षांच्या तरुणीने प्रस्थापित नेत्याच्या पत्नीचा पराभव केल्याने पाटण तालुक्यात राजकीय खळबळ उडाली असून, मृणाल पाटील यांची चर्चा आता “खऱ्या अर्थाने जायंट किलर” म्हणून होत आहे.


तिकीट वाटपातच शिवसेनेचा डाव यशस्वी

निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या टप्प्यातच शिवसेनेने रणनीतिक डाव टाकत नरेंद्र पाटील यांच्या पत्नीसमोर तरुण चेहरा म्हणून मृणाल पाटील यांना संधी दिली.
हा निर्णय धाडसी असला तरी तो अचूक ठरल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे.


युवा मतदारांचा ओढा, पारंपरिक शिवसैनिकांची साथ

या विजयामागे अनेक निर्णायक घटक ठरले—२२ वर्षांच्या मृणाल पाटील यांच्याकडे युवा मतदारांचा मोठा कल . शंभूराज देसाई यांची प्रभावी ताकद व नेतृत्व . मृणाल पाटील यांचे वडील, उद्योजक महेश पाटील यांचा दांडगा जनसंपर्क   पारंपरिक शिवसैनिकांची एकसंघ साथ

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून मृणाल पाटील यांनी आघाडी घेतली, आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. अखेर शिवसेनेचं धनुष्यबाण विजयी झालं.


विजयानंतर मंद्रुळ कोळेत जल्लोष

या ऐतिहासिक विजयानंतर मृणाल पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. “युवाशक्तीचा विजय” म्हणून हा निकाल ओळखला जात असून, पाटण तालुक्यातील राजकारणाची दिशा बदलणारा निकाल म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे.


🔥 पाटण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात! भाजपचा सुपडासाफ – जनतेने दिला स्पष्ट कौल 🔥 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : सविस्तर निकाल

🔥 पाटण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात! भाजपचा सुपडासाफ – जनतेने दिला स्पष्ट कौल 🔥


पाटण तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेने ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचा जनतेने अक्षरशः सुपडासाफ करत विकासाला आणि स्थानिक नेतृत्वाला कौल दिला आहे.

🟠 जिल्हा परिषद – ७ पैकी ६ गटांवर शिवसेनेचा भगवा

तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटांपैकी ६ गटांवर शिवसेनेने विजय मिळवत बहुमत सिद्ध केले आहे.

हेळवाक तर्फ पाटण, तारळे, मल्हारपेठ, मारुल हवेली, मंद्रुळकोळे आदी प्रमुख गटांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजप व इतर पक्षांना मोठ्या फरकाने पराभूत केले.

भाजपकडे फक्त म्हावशी गटापुरतेच समाधान उरले आहे.

🟠 पंचायत समिती – १४ पैकी १३ गणांवर शिवसेनेची एकहाती सत्ता

पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने १४ पैकी तब्बल १३ गणांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.

हेळवाक, येराड, मुरुड, तारळे, मल्हारपेठ, मारुल हवेली, मंद्रुळकोळे, सणबूर, नाडे, नाटोशी, काळगाव, कुंभारगाव या सर्वच भागांत शिवसेनेच्या उमेदवारांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला.


🗳️ पाटण तालुका – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : सविस्तर निकाल


🔶 ४७ हेळवाक तर्फ पाटण – जिल्हा परिषद गट

  1. दत्तात्रय (बाळासाहेब) कदम – भाजप : 9533
  2. संतोष कदम – राष्ट्रीय काँग्रेस : 347
  3. शिवाजी कांबळे – बहुजन समाज पार्टी : 158
  4. अशोक पाटील – शिवसेना : 10579 (विजयी)
  5. महेश शेलार – शिवसेना (ठाकरे) : 490
  6. प्रविण गुरव – अपक्ष : 54

🔶 ९३ हेळवाक तर्फ पाटण – पंचायत समिती गण

  1. वैशाली कांबळे – भाजप : 4331
  2. रेखा चव्हाण – शिवसेना (ठाकरे) : 416
  3. पुनम माने – राष्ट्रीय काँग्रेस : 274
  4. मंगल माने – शिवसेना : 4895 (विजयी)

🔶 ९४ येराड – पंचायत समिती गण

  1. रिया कांबळे – शिवसेना (ठाकरे) : 252
  2. वंदना शिंदे – भाजप : 4908
  3. विद्या शिंदे – शिवसेना : 5742 (विजयी)

🔶 ४८ तारळे – जिल्हा परिषद गट

  1. स्वप्ना पाटील – शिवसेना : 14333 (विजयी)
  2. डॉ. क्रांती साळुंखे – भाजप : 9734
  3. NOTA : 376

🔶 ९५ मुरुड – पंचायत समिती गण

  1. रेखा घाडगे – भाजप : 4139
  2. सविता पवार – शिवसेना : 7452 (विजयी)
  3. रुपाली निकम – अपक्ष : 319
  4. NOTA : 133

🔶 ९६ तारळे – पंचायत समिती गण

  1. अभिजीत जाधव – भाजप : 5592
  2. विकास जाधव – शिवसेना : 6507 (विजयी)
  3. NOTA : 301

🔶 ४९ म्हावशी – जिल्हा परिषद गट

  1. भरत ढेरे – शिवसेना (ठाकरे) : 591
  2. राजेश पवार – भाजप : 11763 (विजयी)
  3. अरविंद महाबळ – मनसे : 120
  4. भरत साळुंखे – शिवसेना (शिंदे) : 11382
  5. महेश तोडकर – अपक्ष : 92
  6. NOTA : 138

🔶 ९७ म्हावशी – पंचायत समिती गण

  1. शंकर घाडगे – भाजप : 6169 (विजयी)
  2. मंगेश मोळावडे – शिवसेना (शिंदे) : 4533
  3. शिवाजी साळुंखे – शिवसेना (ठाकरे) : 167
  4. NOTA : 98

🔶 ९८ चाफळ – पंचायत समिती गण

  1. कमल झोरे – भाजप : 5523
  2. राधिका पाटील – शिवसेना (शिंदे) : 7427 (विजयी)
  3. NOTA : 170

🔶 ५० मल्हारपेठ – जिल्हा परिषद गट

  1. विजया कुंभार – शिवसेना : 16275 (विजयी)
  2. सुजाता कुंभार – भाजप : 8947
  3. NOTA : 331

🔶 ९९ मल्हारपेठ – पंचायत समिती गण

  1. सुमन चव्हाण – भाजप : 5837
  2. अर्चना पाटील – शिवसेना : 8268 (विजयी)
  3. NOTA : 255

🔶 १०० नाडे – पंचायत समिती गण

  1. चंद्रशेखर ढवळे – भाजप : 3353
  2. विजय पवार – शिवसेना : 7563 (विजयी)
  3. विकास कदम – राष्ट्रीय समाज पक्ष : 167
  4. NOTA : 110

🔶 ५१ मारुल हवेली – जिल्हा परिषद गट

  1. योगिता गिरी – शिवसेना : 16203 (विजयी)
  2. वैशाली गुरव – भाजप : 7164
  3. NOTA : 285

🔶 १०१ मारुल हवेली – पंचायत समिती गण

  1. प्रियांका देसाई – शिवसेना : 9347 (विजयी)
  2. पुनम मोरे – भाजप : 2774
  3. विद्या सुर्यवंशी – राष्ट्रीय समाज पक्ष : 116
  4. NOTA : 137

🔶 १०२ नाटोशी – पंचायत समिती गण

  1. रंगराव जाधव – भाजप : 4396
  2. प्रशांत पवार – शिवसेना : 6585 (विजयी)
  3. शांताराम सुर्वे – शिवसेना (ठाकरे) : 213
  4. NOTA : 84

🔶 ५२ मंद्रुळ कोळे – जिल्हा परिषद गट

  1. डॉ. प्राची पाटील – भाजप : 13285
  2. मृणाल पाटील – शिवसेना : 14304 (विजयी)
  3. NOTA : 224

🔶 १०३ सणबूर – पंचायत समिती गण

  1. आकांक्षा खेडेकर – भाजप : 5318
  2. संपदा जाधव – शिवसेना : 7064 (विजयी)
  3. NOTA : 140

🔶 १०४ मंद्रुळ कोळे – पंचायत समिती गण

  1. नितीन काळे – शिवसेना : 7703 (विजयी)
  2. अमरजित पाटील – राष्ट्रीय काँग्रेस : 194
  3. नितीन पाटील – भाजप : 7223
  4. साहिल भालेकर – शिवसेना (ठाकरे) : 89
  5. विलास सावंत – अपक्ष : 23
  6. NOTA : 60

🔶 ५३ काळगाव – जिल्हा परिषद गट

  1. सुनिता चाळके – शिवसेना (शिंदे) : 13560 (विजयी)
  2. प्राजक्ता पाटील – भाजप : 8682
  3. सिताबाई मोडक – शिवसेना (ठाकरे) : 429
  4. मेघना माने – अपक्ष : 132
  5. NOTA : 137

🔶 १०५ कुंभारगाव – पंचायत समिती गण

  1. संजय कळंत्रे – शिवसेना (ठाकरे) : 397
  2. रमेश मोरे – भाजप : 4804
  3. सचिन यादव – शिवसेना (शिंदे) : 6380 (विजयी)
  4. NOTA : 238

🔶 १०६ काळगाव – पंचायत समिती गण

  1. अनिल डाकवे – भाजप : 4711
  2. पंजाबराव देसाई – शिवसेना (शिंदे) : 5813 (विजयी)
  3. संदिप माने – शिवसेना (ठाकरे) : 244
  4. आदित्य मोरे – राष्ट्रीय काँग्रेस : 240
  5. NOTA : 113


शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला.

कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला.

कराड तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला चढवला.

तालुक्यातील शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात अधिराज यांना दुखापत झाली असून ते जखमी आहेत.

कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटातून उदयसिंह पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी रात्री या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिराज शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते. तेथून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ते परत येत होते.

धनाजी पाटील हे त्यांच्यासोबत होते. उंडाळे ते शेवाळेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेत अधिराज पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अधिराज यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत.

या घटनेनंतर धनाजी पाटील व अधिराज पाटील हे तातडीने लोकवस्तीत आले. त्यांना उपचारासाठी उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

“मी तालुक्याचा मालक नाही, माझी मायबाप जनता मालक आहे!”अजूनही विरोधकांची हाऊस जिरली नसेल, तर ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या फरकाने पराभव पाहायला मिळेल.”विरोधकांना इशारा देत शंभूराज देसाईंचा ढेबेवाडीत तुफान हल्लाबोल.

 “मी तालुक्याचा मालक नाही, माझी मायबाप जनता मालक आहे!”अजूनही विरोधकांची हाऊस जिरली नसेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या फरकाने पराभव पाहायला मिळेल.”

विरोधकांना इशारा देत शंभूराज देसाईंचा ढेबेवाडीत तुफान हल्लाबोल.


विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवा, नाहीतर जनतेकडून चोख उत्तर मिळेल!**

पाटण तालुका म्हणजे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबावर संकट आलं, तर मी ढाल बनून समोर उभा राहीन—अशा ठाम आणि कडक शब्दांत राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

ढेबेवाडी येथील सांगता सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी या तालुक्याचा मालक नाही. माझी मायबाप जनता खरी मालक आहे. देसाई कुटुंबापूर्वी पाटण तालुका माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.”

विधानसभा निवडणुकीतील टीकेचा संदर्भ देताना ना. देसाई म्हणाले, “माझ्यावर आरोप झाले, टीका झाली, पण उत्तर मी दिलं नाही—जनतेनेच दिलं! आणि सत्यजित पाटणकरांचा तब्बल ३५ हजार मतांनी पराभव केला. अजूनही विरोधकांची हाऊस जिरली नसेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या फरकाने पराभव पाहायला मिळेल.”

विरोधकांना थेट आव्हान देताना त्यांनी स्पष्ट सांगितले, “निवडणूक टीकेवर नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर लढूया! तुम्ही किती साकव बांधले? किती शाळा खोल्या उभारल्या? किती गावांना पाणी दिलं? पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले का? रस्ते केले का? आधी याची उत्तरं द्या. माझ्यावर टीका करताना लक्षात ठेवा—माझा एक कार्यकर्ता एकटाच तुम्हाला पुरून उरेल!”

उपमुख्यमंत्री यांच्या कार्यकाळातील लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’, महिलांसाठी एस.टी. प्रवास सवलत अशा योजनांमुळे महायुती सरकारने जनतेचा विश्वास जिंकला असल्याचे सांगितले.

मंद्रुळकोळे गटातील मतदारांना थेट आवाहन करताना ना. देसाई म्हणाले, “जिल्हा परिषदेसाठी मृणाल महेश पाटील, पंचायत समितीसाठी नितीन काळे आणि संपदा पवार यांना मतदान करा. या उमेदवारांना दिलेलं मत म्हणजे थेट शंभूराज देसाईंना दिलेलं मत आहे—हे लक्षात ठेवा!”

या सभेला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जि.प. उमेदवार मृणाल पाटील, पं.स. उमेदवार नितीन काळे, संपदा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे प्रदेश सचिव नरेश देसाई यांनीही शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.

एकूणच पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आता “विकास विरुद्ध टीका” या थेट मुद्द्यावर रंगली असून, शंभूराज देसाईंच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.



गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने आज दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. सदर रूट मार्च ढेबेवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मंद्रूलकोळे, ढेबेवाडी बाजारपेठ, मालदन, तळमावले बाजारपेठ व कुंभारगाव या गावांमधून काढण्यात आला. निवडणुकीच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती करणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा रूट मार्च घेण्यात आला. या रूट मार्चमध्ये ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे २ पोलीस अधिकारी, ०७ पोलीस अंमलदार तसेच ४० होमगार्ड जवान सहभागी झाले होते. रूट मार्च दरम्यान नागरिकांशी संवाद साधण्यात आला व शांतता व सहकार्य राखण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन.
सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पावन स्मृतींना आज कराड येथील **प्रितीसंगम** येथे उपमुख्यमंत्री **सुनेत्रा अजित पवार** यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे आगमन झाल्यावर त्यांनी थेट प्रितीसंगम गाठत, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर आदरभाव आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी **मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील**, **राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर**, **खासदार सुनील तटकरे**, **खासदार नितीन पाटील**, **माजी खासदार श्रीनिवास पाटील**, **माजी आमदार बाळासाहेब पाटील**, **जिल्हाधिकारी संतोष पाटील**, **पोलीस अधीक्षक तुषार दोशी**, **कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव** कार्याध्यक्ष. संजयजी देसाई यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कराड व प्रितीसंगमाशी असलेले अतूट नाते महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात अजरामर आहे. त्याच परंपरेचा आदर राखत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या पवित्र स्थळी उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. यशवंतराव चव्हाण यांचे योगदान, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि सामाजिक समतेसाठीचे कार्य यांची प्रकर्षाने आठवण झाली. प्रितीसंगम परिसरात काही काळ गंभीर आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

मालदनच्या मातीत परिवर्तनाचा एल्गार! जनसागर उसळला!..

मालदनच्या मातीत परिवर्तनाचा एल्गार! जनसागर उसळला!..

मालदन परिसरात राजकीय इतिहास घडला! मंद्रूळकोळे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कु. मृणाल महेश पाटील आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार मा. श्री. नितीन दत्तात्रय काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गावोगावातून, वाड्या-वस्त्यांतून आलेल्या जनतेने परिसर फुलून गेला आणि विजयाची नांदी दिली.

या ऐतिहासिक सभेला पालकमंत्री साहेबांनी उपस्थित राहून प्रभावी मार्गदर्शन केले. ढेबेवाडी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला शब्द आणि उपस्थित जनतेच्या डोळ्यांतील विश्वास — हे दृश्य प्रत्येकाच्या काळजाला भिडणारे होते.

🗣️ सभेत बोलताना उमेदवार नितीन दत्तात्रय काळे यांनी भावना व्यक्त केल्या की,

“ही सभा केवळ राजकीय नव्हती, तर एक कुटुंब म्हणून आपण एकत्र आलो आहोत याची साक्ष होती.”

त्याचबरोबर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कु. मृणाल महेश पाटील व पंचायत समिती गणाचे उमेदवार  श्री.नितीन दत्तात्रय काळे तरुण, अभ्यासू आणि विकासाभिमुख उमेदवार यांच्या पाठीशी उभा असलेला हा जनसागर म्हणजे परिवर्तनाची स्पष्ट ग्वाही आहे.

  • रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षणासाठी ठोस विकास
  • ढेबेवाडी विभागाचा सर्वांगीण कायापालट
  • सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य

मंद्रूळकोळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या लेकीला आणि भावाला साथ द्या!
ही गर्दी, हा उत्साह आणि हा विश्वास एकच सांगतो — विजय निश्चित आहे!

🗳️ निशाणी: 🏹 धनुष्यबाण
📅 मतदान: ७ फेब्रुवारी २०२६

विकासासाठी मतदान करा, परिवर्तनासाठी एकवटून उभे रहा!

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...