शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

कुंभारगावात वार्ड रचनेवरून संताप! तलाठींची मनमानी? ग्रामस्थ आक्रमक.

कुंभारगाव ता. पाटण  – ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर नव्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच वार्ड रचनेवरून कुंभारगावात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वार्ड रचना बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 पूर्वीची रचना कुंभारगाव ग्रामपंचायतीत एकूण ११ सदस्य आणि ४ वार्ड आहेत –
श्रीराम वार्ड
लक्ष्मी वार्ड
मरीआई वार्ड
नाईकबा वार्ड
मागील पंचवार्षिक निवडणुकीत –

श्रीरामवार्ड, लक्ष्मीवार्ड, मरीआई या प्रत्येक वार्डातून ३ सदस्य
नाईकबा वार्डातून २ सदस्य
अशी रचना होती.

  यंदा करण्यात आलेल्या बदलानुसार –
श्रीराम – ३ सदस्य
मरीआई – ३ सदस्य
नाईकबा – ३ सदस्य
लक्ष्मी – २ सदस्य
अशी नवीन विभागणी करण्यात आली आहे.

याबाबत भैरव दरा हा लक्ष्मीवार्ड मध्ये असलेला भाग लक्ष्मी वार्डातच राहावा या वार्डाला नाईकबा वार्ड मध्ये सामील केले आहे याबाबत भैरवडा येथील ग्रामस्थांना विश्वासात न देता हा निर्णय घेतलेला आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या
वार्ड रचनेबाबत कोणतीही पूर्वसूचना, नोटीस  देण्यात आली नाही.
नाईकबा वार्डातील मतदार संख्या कमी आहे कारण देत बदलाबाबत कोणतीही चर्चा न करता निर्णय लादण्यात आला.
हा निर्णय एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने घेण्यात आल्याने लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाला आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर एका ग्रामस्थाने सांगितले की,“नाईकबा वार्डातील बदल आम्हाला मान्य नाही. आम्ही लवकरच तहसीलदार साहेबांकडे लेखी तक्रार अर्ज देणार आहोत. अर्ज दिल्यावर नाव छापा.”

याबाबत तलाठी बाळासाहेब गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही केवळ “कच्ची चिठ्ठी” असल्याचे सांगितले. नाईकबा वार्डातील बदलाबाबत विचारले असता त्यांनी,
“तुमचे तलाठी आकाश गुरव आहेत, त्यांना विचारा. ग्रामस्थांना का कळवले नाही ते तेच सांगतील,”
असे उत्तर दिल्याचे समजते.

दरम्यान, दोन तलाठींच्या परस्पर जबाबदारी ढकलण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये अधिक संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांकडून लवकरच तहसीलदार, पाटण यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली जाणार असल्याचे समजते. जर प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही, तर गावात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
कुंभारगावातील ही वार्ड रचना प्रकरण आता केवळ प्रशासकीय निर्णय न राहता लोकशाही हक्क आणि पारदर्शकतेचा प्रश्न बनला आहे.
ग्रामस्थांचा आक्रोश वाढत असताना प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी रेखाटले महाराजस्व अभियानाचे पोस्टर.

तळमावले/वार्ताहर शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या दुसऱ्या टप...