शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १" : ७ मार्चपासून पाटण तालुक्यात भव्य प्रारंभ!


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज पाटण - 

पाटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे २०२६ या कालावधीत राज्यभर "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १" राबविण्यात येणार असून त्याची सुरुवात शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ पासून होत आहे.

महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढणे, नवीन तरतुदींची जनजागृती करणे आणि डिजिटल सेवांचा प्रभावी वापर वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब व तहसीलदार श्री. अनंत गुरव साहेब यांनी केले आहे.


 पाटण तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक

१️⃣ शनिवार, ७ मार्च २०२६ – ढेबेवाडी, कुठरे, तळमावले
२️⃣ शनिवार, १४ मार्च २०२६ – मल्हारपेठ, मारूल हवेली, चाफळ
३️⃣ शुक्रवार, १० एप्रिल २०२६ – म्हावशी,आवरडे तारळे

४️⃣ शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ – येराड, हेळवाक, मोरगिरी, मरळी,

५️⃣ शुक्रवार, ८ मे २०२६ – पाटण (नगरपरिषद हद्द)


६️⃣ शुक्रवार, १५ मे २०२६ – पाटण (ग्रामीण)


 शिबिरामध्ये उपलब्ध सेवा

🔹 प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे
🔹 अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क
🔹 लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा
🔹 अकृषक तरतुदीबाबत मार्गदर्शन
🔹 भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणे अद्ययावत करणे
🔹 Ease of Doing Business सुधारणा व नगरी सुविधा
🔹 ई-मोजणी सेवा
🔹 अॅग्रीस्टॅक नोंदणी
🔹 पी.एम. किसान योजना सेवा
🔹 तक्रार निवारण सेवा

 विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

✔ रहिवासी दाखला

✔ उत्पन्न दाखला

✔ जात दाखला

✔ इतर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे

✔ लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा

या शिबिरामध्ये महसूल विषयक सेवांसोबतच शैक्षणिक दाखले (उदा. रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात दाखला इ.) काढण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेच्या वेळी होणारी धावपळ आता थांबणार आहे.

कॉलेज प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा आणि इतर शैक्षणिक कारणांसाठी आवश्यक असलेले दाखले आता आपल्या गावातच, एका दिवसात मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



 अभियानाचे उद्दिष्ट

✔ महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांना Single Day Service Delivery
✔ महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी
✔ डिजिटल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करणे
✔ नागरिकांना शासन सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे


प्रशासनाचे आवाहन

“तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या शिबिरात सहभागी होऊन आपल्या महसूल विषयक समस्या त्वरित सोडवून घ्याव्यात,” असे प्रांताधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब व तहसीलदार श्री. अनंत गुरव साहेब यांनी स्पष्ट केले आहे.

राजस्व प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून पाटण तालुक्यातील जनतेसाठी ही सुवर्णसंधी आहे.

 नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह नियोजित ठिकाणी उपस्थित राहावे आणि शासनाच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी रेखाटले महाराजस्व अभियानाचे पोस्टर.

तळमावले/वार्ताहर शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या दुसऱ्या टप...