बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये पाणीटंचाईचा स्फोट!शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशनचे थेट एम वॉर्ड मुख्य जलअभियंत्याकडे निवेदन.

 
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांचे हाल अपरंपार वाढले आहेत. विशेषतः शिवप्रेरणा  वेल्फेअर असोसिएशन, विजय लक्ष्मी चाळ, विश्वकर्मा चाळ, राजगड चाळ या भागांतील रहिवाशांना या पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे.

नळाला अनियमित व कमी दाबाने पाणी येणे, काही वेळा अनेक दिवस पाणीपुरवठा खंडित राहणे, यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष संभाजी थोपटे व सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अंकुश चोरघे यांनी थेट च्या एम वॉर्ड कार्यालयात जाऊन मुख्य जलअभियंता मा. ढवळे साहेब यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून महाराष्ट्र नगर परिसरातील पाणी समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले. नागरिकांच्या रोजच्या हालअपेष्टा, अस्वच्छ पाण्याचा धोका याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली.

मुख्य जलअभियंता मा. ढवळे साहेब यांनी या निवेदनाची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच आजच संबंधित विभागाचे अभियंते (S.E) व (J.E) यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी या हालचालीचे स्वागत केले असून, प्रशासनाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर कृतीत उतरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मानखुर्द महाराष्ट्र नगरातील पाणीप्रश्नावर आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...