संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६
पाटणच्या खोऱ्यात तीर्थ क्षेत्र श्री धारेश्वर मठ(मंदिर).
तळमावले = श्री क्षेत्र धारेश्वर मठ (मंदिर) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दिवशी खुर्द येथे हे मठ (मंदिर) आहे हे पाटण पासून 17 किलोमीटर अंतरावर आहे याचे वैशिष्ट्य हे अत्यंत जागृत आणि रहस्यमय स्वयंभू महादेवाचे स्थान मानले जाते या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरण आहे उंच डोंगर कपारीत तीर्थक्षेत्र श्री धारेश्वर मठ (मंदिर) असून पाटण वरून जाताना नागमोडी वळणे असून डोंगराच्या पायथ्यापासून तीव्र घाट चालू होतो ही वेडी वाकडी वळणे घेत उंच ठिकाणी धारेश्वर मठ मंदिर दिसून येतो या उंच डोंगरावर अत्यंत प्राचीन गुफा असून येथे श्रीराम, पाचपांडव, विभि षण, हनुमान, यांनी लिंग पूजा अनुष्ठान केलेले आहे गंगा भगीरथी, गंगोत्री, जमनात्रि कुंड, सप्त जलदेवता, केदारनाथ, लक्ष्मण, वीरभद्र व आदे श्ववर बाबा तीर्थक्षेत्र असून आदीश्वरचरणी शिर अर्पण करून शिव रक्षा मिळवण्यासाठी श्री प्रभूरामानी कपिला षष्ठीस असते तेव्हा पाषाणमई श्रीरामाचे शिरातून व करवत उपक्षेत्रातील धडातून दुग्धगंगा येते त्या पर्वकाळात दुधासारखे असलेले जल हे एरवी साधे पाणी दिसते ते कधी आटत नाही तेजल गुरु तीर्थ म्हणून साठ गाव पाटण परगना विविध प्रांतातील वीरशैव भक्त माहेश्वर तथा भाविक जण आपापल्या गावातील देवांना तसेच घरच्या देव देवतांना अभिषेक करण्याकरता येथील पाणी नेतात संतती -संपत्ती दायक अशा आदी मठ संस्थान धारेश्वर महाशिवतीर्थ क्षेत्रामध्ये पर्यावरण आदी गुरुपीठ असल्याने असल्याने हे "प्रयागसम" पवित्र क्षेत्र आहे राजापूरला गंगा येथे तेव्हा येथील धार कमी होते या धारेच्या पाण्यामुळे त्वचारोग बरे होतात या पाण्याला शेवळ होत नाही येथे गणपती नाही केवळ तो द्वादिश लिंग युक्त कलश गुरु गादी म्हणून परंपरेने आग्र पूजेचा मान आहे श्रीम दुज्जनीय सध्दमृ सिंहासनाचे वृष्टी सूत्र नंदी गोत्रिय नंदी गोत्रिय कक्षिकांत उपसूत्रिय आदिमठ संस्थान श्री धारेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे या मठावर 33 शिवचार्य त्यापैकी 21 शिवचार्यांची समाधी येथील गुफेमध्ये असून पुणे- तीन, ढालगाव तीन, कसबे सागाव- दोन (कागल), कोडोली वारणा - एक, बागलकोट (बाळापुर) एक, शिवनगी - एक, घरेडी (सांगोला)-एक, काशी एक, वगैरे ठिकाणी समाध्या आहेत..
खासदार, मंत्री, तथा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत तीर्थक्षेत्र क आणि ब मधून रस्ते पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छतागृह, सभागृह इत्यादी कामे झालेले आहेत परंतु घाट मार्गाचा विचार करता पूर्ण घाट मार्गावर संरक्षक बॅरगेट लावणे आवश्यक आहे . वार्षिक यात्रा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दीपावलीच्या लक्ष दीपोत्सव, मानाची काटेपालखी हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे ..
या ठिकाणी दर महिन्याच्या अमावस्या दिवशी श्री धारेश्वर मठ मंदिरात स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक, महाआरती केल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यादरम्यान श्री क्षेत्र धारेश्वर देवस्थानचे मठाधीकारी राष्ट्रसंत ज्ञानराज पद्मभास्कर धर्मरक्षक श्री,ष, ब्र,१०८ डॉ, निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज येणाऱ्या भक्तांसाठी उपस्थित राहून समस्या व अडचणी जाणून घेत त्याबाबतीत योग्य मार्गदर्शन करतात , चौकट =. दरमहाआरोग्य,रक्तदान,संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते व ५१ ते५४ गायी वगोवंशाचे योग्य प्रकारे संगोपन केले जाते या पवित्र ठिकाणी शेती आहे परंतु पाण्याअभावी त्या शेतातून विविध प्रकारची पिके घेता येत नाहीत या ठिकाणी विहीर खोदून पाणी मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे पावसाळ्यातील अतिवृष्टी, भूस्खलन मध्ये असलेल्या पूर्वी असलेल्या विहिरी बुजून गेल्या आता २ नवीन विहिरी साठी पंचवीस लाख खर्च केले आहेत वीज व सौर प्रकल्प राबवून शेतीच्या माध्यमातून शेतीचा विकास साधला जाईल असे नूतन मठाअधिपती बालब्रह्मचारी श्री,ष,ब, बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य स्वामी यांच्याकडून सांगण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ.
कुंभारगाव (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव च...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा