सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

🔥 पाटणमध्ये राजकीय भूकंप! २२ वर्षीय मृणाल पाटील ठरल्या ‘जायंट किलर’ – भाजपला जबर धक्का 🔥



🔥 पाटणमध्ये राजकीय भूकंप! २२ वर्षीय मृणाल पाटील ठरल्या ‘जायंट किलर’ – भाजपला जबर धक्का 🔥

पाटण तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय बातमी समोर आली आहे. मंद्रुळ कोळे जिल्हा परिषद गटातून भाजपला जबर धक्का बसला असून, माथाडी कामगार नेते यांच्या पत्नी प्राचीताई नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला आहे.

विशेष बाब म्हणजे, अवघ्या २२ वर्षांच्या मृणाल पाटील यांनी हा पराभव घडवून आणत संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. मृणाल पाटील या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत होत्या, तर प्राची पाटील भाजपच्या कमळ चिन्हावर उभ्या होत्या.


अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक.

ही लढत केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित न राहता, ती शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत यांनी राजकीय ताकद दाखवत नरेंद्र पाटील यांच्या गटावर निर्णायक मात केली.

२२ वर्षांच्या तरुणीने प्रस्थापित नेत्याच्या पत्नीचा पराभव केल्याने पाटण तालुक्यात राजकीय खळबळ उडाली असून, मृणाल पाटील यांची चर्चा आता “खऱ्या अर्थाने जायंट किलर” म्हणून होत आहे.


तिकीट वाटपातच शिवसेनेचा डाव यशस्वी

निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या टप्प्यातच शिवसेनेने रणनीतिक डाव टाकत नरेंद्र पाटील यांच्या पत्नीसमोर तरुण चेहरा म्हणून मृणाल पाटील यांना संधी दिली.
हा निर्णय धाडसी असला तरी तो अचूक ठरल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे.


युवा मतदारांचा ओढा, पारंपरिक शिवसैनिकांची साथ

या विजयामागे अनेक निर्णायक घटक ठरले—२२ वर्षांच्या मृणाल पाटील यांच्याकडे युवा मतदारांचा मोठा कल . शंभूराज देसाई यांची प्रभावी ताकद व नेतृत्व . मृणाल पाटील यांचे वडील, उद्योजक महेश पाटील यांचा दांडगा जनसंपर्क   पारंपरिक शिवसैनिकांची एकसंघ साथ

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून मृणाल पाटील यांनी आघाडी घेतली, आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. अखेर शिवसेनेचं धनुष्यबाण विजयी झालं.


विजयानंतर मंद्रुळ कोळेत जल्लोष

या ऐतिहासिक विजयानंतर मृणाल पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. “युवाशक्तीचा विजय” म्हणून हा निकाल ओळखला जात असून, पाटण तालुक्यातील राजकारणाची दिशा बदलणारा निकाल म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*“छत्रपती महाराजस्व अभियानाचा धडाका — हजारो महसूल तक्रारींचा झटपट निपटारा”*

सणबुर प्रतिनिधी – महेश जाधव सणबुर : सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित महसूल प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “...