शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

ना. शंभूराज देसाई यांच्याकडून मंद्रूळकोळे गटात परफेक्ट नियोजन करत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम.

ढेबेवाडी प्रतिनिधी मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीत राज्याचे पर्यटन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मतदार संघात येऊन दिलेल्या शब्दाप्रमाणे या मतदार संघात बारकाईने लक्ष ठेवत एकाच फटक्यात राजकीय पटावरची सारी समीकरणे उलथवून टाकली. प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई म्हणून भावनिक हाक देणाऱ्या विरोधकांचा सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन ना. शंभूराज देसाई यांनी परफेक्ट नियोजन करून करेक्ट कार्यक्रम केला. अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. ढेबेवाडी विभाग देसाई गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखा जातो, ही निवडणूक फक्त निवडणूक नव्हती, तर वर्चस्वाची निर्णायक लढत होती. निवडणूक लागल्या नंतर या विभागात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ना. शंभूराज देसाई यांनी मंद्रूळकोळे गटाकडे माझे विशेष लक्ष असणार हे अधोरेखित करून सांगतो असे सांगितले होते. यानुसार या लढतीत ना. देसाई यांनी विरोधकांचा ‘गेम ओव्हर’ करत विरोधकांचे कांडके पाडले. याची चांगलीच चर्चा सुरू आहे. या लढतीत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी सभापती सत्यजित पाटणकर, ना. नरेंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील तसेच ज्येष्ठ नेते माजी शेती सभापती हिंदूराव पाटील यांच्यासह स्थानिक पातळीवरील सगळी आघाडी धुळीस मिळाली. विरोधकांनी एकत्र येत ताकद आजमावली; पण देसाई यांच्या नियोजनबद्ध डावपेचांपुढे ती सारी ताकद निष्प्रभ ठरली. या विजयाने एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित झाली कोट्यावधी रुपयांचा झालेला विकास हे सर्वात महत्वाचे भांडवल ठरले. ढेबेवाडी परिसरात असणारे अनेक प्रश्न - अतिवृष्टी, महापुरांचा तडाखा, जंगली जनावरांचा उपद्रव, कोरोना महामारीची झळ अशी अनेक संकटे यावेळी त्याच्यावर मार्ग काढणे लोकांना मदत करणे त्यांची कामे हिरहिरीने सोडविणे हे काम ना. देसाई यांनी तळमळीने केले यामुळे त्यांची सर्वसामान्य लोकांशी नाळ जुळली आहे. या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पालकमंत्री म्हणून देसाई यांनी प्राधान्याने केले. रस्ते, पाणी, वीज, पुनर्वसन, शासकीय मदत—प्रत्येक बाबतीत ढेबेवाडी मतदारसंघाला झुकते माप देत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. म्हणूनच येथील मतदार कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आदेश मानून मतांचे दान देसाई यांच्या पारड्यात टाकतात. पाटण तालुक्यात निवडणूक कोणतीही असो—देसाई यांच्या बैठकीत एकदा ठरले की ठरले! यंदा जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा कंडका पाडायचाच, असा ‘शंभू राज’ांचा हुकूम झाला आणि कार्यकर्ते झोकून देऊन कामाला लागले. देसाई गटाचे वैशिष्ट्य म्हणजे नेता ते कार्यकर्ता असा थेट संवाद. शेताच्या बांधावरून असो वा शासकीय कार्यालयातून—सामान्य माणूस थेट मंत्र्यांशी संवाद साधतो. त्यामुळे कामे त्वरित होतात आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश कायम राहतो. मंद्रुळकोळे गटात विधानसभेला देसाई यांना नेहमी आघाडी मिळते; ग्रामपंचायत निवडणुकीतही गटाचे वर्चस्व असते. मात्र जि.प. आणि पं.स. निवडणुकांत याआधी पाटणकर गटाला यश मिळाले होते. हाच धोका ओळखून देसाई यांनी आधीच चंग बांधला—“यंदा हा गड काबीज करायचाच!” निवडणुकीपूर्वीच त्यांनी पावले उचलत सणबूर येथील पाटणकर गटाच्या बड्या कार्यकर्त्याला गळाला लावले. सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष संदिप जाधव यांच्यासह तब्बल चारशे कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणला. पारंपरिक पाटणकर गड मानल्या जाणाऱ्या सणबूरमध्ये ही मुसंडी निर्णायक ठरली. संदिप जाधव अंतर्गत कुरघोडीचे बळी ठरत होते, क्षमता असूनही त्यांना दुय्यम वागणूक मिळत होती. हीच संधी ओळखत देसाई यांचे सुपुत्र व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी त्यांना आपल्या कवेत घेतले. जाधव यांच्या पत्नी संपदा जाधव यांना उमेदवारी देत अचूक डाव साधला. परिणामी शिवसेनेच्या जि.प. उमेदवार मृणाल पाटील यांना सणबूर गणातून उच्चांकी मताधिक्य मिळाले आणि भाजपच्या डॉ. प्राची पाटील यांना अखेरपर्यंत लढूनही पराभव पत्करावा लागला. अवघ्या बावीस वर्षांच्या मृणालकडून झालेला हा पराभव विरोधकांसाठी जबर धक्का ठरला. दुसरीकडे, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील यांनी पुत्र नितीन पाटील यांना निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र ऐनवेळी उमेदवारी बदलत देसाई यांनी मुंबईत कार्यरत नितीन काळे यांना संधी दिली. मालदन व परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये प्लसिंगची आखणी करून त्यांनी संपूर्ण गण फिरवला आणि नितीन पाटील यांचा पराभव घडवून आणला. ही खेळी गेमचेंजर ठरली. या संपूर्ण रणनितीमागे युवा नेते यशराज देसाई यांची सूक्ष्म आखणी होती. माजी जि.प. सदस्य विजय पवार व माजी पं.स. सदस्य संतोष गिरी यांच्यावर गुप्त जबाबदारी सोपवून गटाची सखोल छाननी करण्यात आली. जनतेच्या मनाचा अचूक वेध घेत उमेदवारी निश्चित करण्यात आली. परिणामी माथाडी सारख्या बलाढ्य शक्तीचाही पराभव शक्य झाला. दरम्यान, पालकमंत्री देसाई यांच्यावर गणेश नाईक, जयकुमार गोरे, चित्रा वाघ तसेच स्थानिक नेत्यांनी सडकून टीका केली. मात्र देसाई यांनी संयम ढळू दिला नाही. प्रतिटिप्पणी न करता त्यांनी फक्त विकासाकडे जनतेचे लक्ष वेधले. “विकासावर निवडणूक जिंकू शकतो,” हा आत्मविश्वास त्यांनी कृतीतून दाखवून दिला. शेवटी निकाल लागला—आणि भाजपला चारी मुंड्या चित करत देसाई गटाने मंद्रुळकोळेवर झेंडा रोवला. आश्वासनांपेक्षा शाश्वत विकासाला मतदारांनी पसंती दिली. “मी जे बोललो तेच करून दाखवले,” हा संदेश संपूर्ण जिल्ह्यात गेला. मंद्रुळकोळेचा गड हा देसाई गटाचा अभेद्य बालेकिल्ला आहे, हे या विजयाने ठसठशीतपणे सिद्ध झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨 कराड : सातारा जिल्ह्यातील कराडल...