शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

घणसोलीचा दमदार आवाज महानगरपालिकेत !श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समितीवर निवड.


नवी मुंबई : 

घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे युवा व अभ्यासू नगरसेवक श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती पदी निवड झाल्याने घणसोली परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्यांना सुलभ करण्यासाठी कार्य करणाऱ्या या महत्त्वपूर्ण समितीवर शिंदे यांची नियुक्ती ही त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची आणि लोकाभिमुख भूमिकेची पावती मानली जात आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, रुग्णालये व दवाखान्यांच्या सुविधा सुधारणा, औषधसाठा, स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी यांसारख्या जबाबदाऱ्या या समितीमार्फत पार पाडल्या जातात. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व आहे.

श्री. सौरभ शिंदे यांनी यापूर्वीही घणसोली परिसरात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या निवडीमुळे प्रभाग ९ मधील आरोग्य सुविधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

यावेळी बोलताना श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे म्हणाले की “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन अधिक परिणामकारक सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांना उत्तम आणि सुलभ आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न करेन,” 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨 कराड : सातारा जिल्ह्यातील कराडल...