शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

घणसोली - नगरसेविका सौ.वैशालीताई सुनील मस्कर यांची महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी निवड.

घणसोली - नगरसेविका सौ.वैशालीताई सुनील मस्कर यांची महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी निवड.

घणसोली (प्रभाग क्रमांक ९) मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सौ. वैशालीताई सुनील मस्कर यांची च्या महिला व बालकल्याण समिती सदस्य पदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

घणसोलीकरांनी दाखवलेला विश्वास आणि भरघोस मतांनी दिलेला कौल यामुळे वैशालीताईंना नगरसेविका पदाची जबाबदारी मिळाली होती. आता महिला व बालकल्याण समिती सदस्यपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याने घणसोली प्रभागाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

यावेळी बोलताना सौ. वैशालीताई सुनील मस्कर म्हणाल्या की,“घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. प्रभागातील महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. महिला सक्षमीकरण, बालकांच्या आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा, तसेच मूलभूत सोयीसुविधांच्या उभारणीवर माझा विशेष भर राहील.”

महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून परिसरातील अंगणवाडी सुविधा, आरोग्य सेवा, पोषण आहार योजना, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

घणसोली प्रभागातील पाणी, रस्ते, गटारे, स्वच्छता, उद्याने आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही ठोस भूमिका घेत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

घणसोलीच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सौ. वैशालीताई मस्कर यांच्या या निवडीमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये महिला नेतृत्वाची नवी ताकद निर्माण झाली असून, आगामी काळात विकासकामांचा वेग अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*

*🏆 जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात* कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि जिंकण्याची जि...