मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

बनपुरीत एस.एस.सी. विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

बनपुरीत एस.एस.सी. विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

बनपुरी : येथील श्री नाईकबा विद्यामंदिर येथे दहावी (एस.एस.सी.) परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला एस.एस.सी. शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण व नुतन जिल्हा परिषद सदस्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना प्रेरणा, आत्मविश्वास आणि सकारात्मक उर्जा देणारा हा कार्यक्रम विशेष ठरला.

कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या प्रमुख उपस्थित होत्या. तसेच अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य (माजी सहसचिव प्रशासन, श्री स्वामी समर्थ विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) होते. युवा उद्योजक , सरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष , नाईकबा यात्रा कमिटी अध्यक्ष , मा. आनंदराव कंक आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात विधीवत सरस्वती पूजनाने करण्यात आली. मुख्याध्यापक श्री. कोळी एस. बी. यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले.

“परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक विचार हीच यशाची गुरुकिल्ली आहे,”
असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.

यावेळी मा. मृणालताई पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शिस्त, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावेत, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर. के. भोसले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासातील सातत्य, वाचनाची सवय आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे यश निश्चित मिळते, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात शाळेतील गुणवंत व विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांचा सत्कार होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वातावरण भारावून गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश लोंढे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. शेख टी. एच. यांनी मानले. शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकूणच, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा आणि यशाचा आत्मविश्वास जागवणारा हा शुभचिंतन सोहळा बनपुरीत संस्मरणीय ठरला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी निवड.

प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी  निवड. दौलतनगर : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झ...