संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६
तळमावले - संत निरंकारी मिशन मार्फत ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता.
तळमावले 24.02.2026
संत निरंकारी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी डॉ. राजेंद्र यादव , डॉ. सौरभ खोडके, ढेबेवाडी ग्रामपंचायतिच्या सरपंच रुपाली पाटील, उपसरपंच अभिजित कडव, आण्णा कारंडे, संत निरंकारी मिशन प्रचारक दीपक कणसे, ढेबेवाडी ब्रँच मुखी उषाताई दिंडे, सेवादल इन्चार्ज अभिजित देशमुख, वनिता बडेकर यांच्यासह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व संत निरंकारी मिशन अनुयायी यांची उपस्थिती होती.
डॉ. राजेंद्र यादव म्हणाले की संत निरंकारी मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. सद्गुरूंच्या शिकवणीतून सर्व अनुयायी स्वयंप्रेरनेने मनोभावे सेवा करत आहेत. ही केलेली सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने केली गेली आहे.
संत निरंकारी मंडळ ब्रँच ढेबेवाडी च्या सर्व सदस्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूचा सर्व परिसर स्वच्छ केल्यानंतर दिपक कणसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्संग कार्यक्रम संपन्न झाला.
सदर अभियानास ग्रामपंचायत ढेबेवाडी व ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यकामाचे सूत्रसंचलन गोपी जाधव यांनी केले तर आभार उषाताई दिंडे यांनी मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा