मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

*कोयना दौलतची रणनिती निर्णायक! भाजपचा एकहाती डाव फसला, मंत्री देसाईंच्या भूमिकेवर जिल्हा परिषद सत्तेचा किल्ला*

कोयना दौलतची रणनिती निर्णायक! भाजपचा एकहाती डाव फसला, मंत्री देसाईंच्या भूमिकेवर जिल्हा परिषद सत्तेचा किल्ला 🔥

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान “पालकमंत्री कोणीही असूदे” अशी उपरोधिक टिप्पणी करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वारंवार डिवचले. मात्र, आता निकालानंतरचे राजकीय चित्र पाहता जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी देसाई यांचीच भूमिका निर्णायक ठरली आहे—हेच वास्तव समोर आले आहे.

जिल्हा परिषदेत एकूण ६५ गट असून बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता आहे. निकालात भारतीय जनता पार्टी ला केवळ २७ जागा मिळाल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस – २०, शिवसेना – १५, काँग्रेस – १, स्वाभिमानी पक्ष – १ अशी एकूण ३७ जागांची आघाडी तयार झाली आहे.
➡️ थोडक्यात, भाजपला स्वबळावर सत्ता मिळवण्यापासून रोखण्यात राष्ट्रवादी–शिवसेनेला यश आले आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच भाजपने महायुतीतील घटक पक्षांना डावलण्याची भूमिका घेतली. उलट, त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला. याच पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीकडे भाजपच्या वरिष्ठांनी पाठ फिरवली.
याला प्रत्युत्तर म्हणून कोयना दौलत या देसाई यांच्या निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आला.
कोयना दौलतवर झालेल्या बैठकीत मंत्री मकरंद पाटील, खा.नितीन पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

 या बैठकीत जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित लढण्याचा ठोस निर्णय झाला. त्यानुसार मतदारसंघनिहाय रणनिती ठरवण्यात आली—आणि त्याचे स्पष्ट पडसाद निकालात उमटले.

आता राष्ट्रवादी (२०) + शिवसेना (१५) = ३५ हे संख्याबळ सत्तेसाठी पुरेसे ठरत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्ता कोयना दौलतवरील वाटाघाटी, समन्वय आणि रणनितीवरच अवलंबून राहणार, हे निश्चित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

“समर्थनात मिळालेल्या व विरोधात पडलेल्या प्रत्येक मताचा सन्मान जनसेवेच्या माध्यमातून राखला जाईल” - मृणालताई महेश पाटील.“मी तुमची लेक आहे…” — शब्द नव्हते ते नातं होतं; मंद्रुळकोळेत मृणालताईंचा ऐतिहासिक विजय

“मी तुमची लेक आहे…” — शब्द नव्हते ते नातं होतं; मंद्रुळकोळेत मृणालताईंचा ऐतिहासिक विजय “ समर्थनात मिळालेल्या व विरोधात पडलेल्या प्रत्येक मत...