संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
रविवार, २६ एप्रिल, २०२०
सातारा ; कराड कोरोनाचा हाॅटस्पाॅट
शनिवार, २५ एप्रिल, २०२०
काळगाव;- मस्करवाडी येथील वीजेचा खांब धोकादायक अवस्थेत
शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०
कोरोना आणि मानसिक आरोग्य : प्रा. सुरेश यादव सर
आजपर्यंत जगाने अनेक रोगाच्या साथी अनुभवलेले आहेत सूर्य अस्ताला गेला म्हणून काय झाले नवीन दिवस पुन्हा जाणारच आहे. आयुष्यात अशी अनेक वादळे आपल्याला अनुभवास मिळणार आहेत ,परंतु या वादळात सुद्धा आपली मुळे मातीत घट्ट रोवून ठेवता आली पाहिजेत. हा समाजात गरीब, श्रीमंत ,शेतकरी ,व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी म्हणजे सर्वच घटक आज चिंतेत आहेत. मिळकत नसल्यामुळे अनेक जणांना चिंतेने ग्रासलेले आहे. संशोधकांच्या निष्कर्षानुसार यांच्या काळात 70% कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. याच वेळी सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य आपल्याला राखता आलं पाहिजे. तनावाने आपली शारीरिक प्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यावेळी एखादी मोठी समस्या आपल्यापुढे उभी राहते. त्या वेळी त्यातून एक संधी निर्माण होते. या संकटाच्या काळात आपण कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, आपले आवडते छंद जोपासणे आपले नातेवाईक मित्र यांना जरूर फोन करून संवाद साधला पाहिजे .त्यामुळे आपले मन निश्चितच हलके होईल. त्याच प्रमाणे घरातच शारीरिक व्यायाम मध्ये प्राणायाम, सूर्यनमस्कार ,योगासने, ध्यान धारणा, मनन, चिंतन यांची सांगड घालता आली पाहिजे .
सोमवार, २० एप्रिल, २०२०
सातारा :- वाटचाल रेड झोनकडे ?
सातारा जिल्हा बनतोय रेड झोन ?
मागील काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 6 होती नंतर काही दिवस एकही रुग्ण सातारा जिल्ह्यात सापडला नाही मात्र त्यानंतर दि.15 रोजी एकाच दिवसात 4 नवीन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती परंतु अचानक जिल्ह्यातील संख्या वाढून 11 वरती गेल्याने सातारा जिल्हा रेड झोनमध्ये जाण्याची भीति व्यक्त करण्यात आली होती.त्यातच दि.19 रविवारी अचानक कराड तालुक्यातील दोन तरूणांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले आहेत. कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने साताऱ्याची वाटचाल रेड झोनच्या दिशने निघाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्गीत रूग्णांची संख्या एकूण 13 झाली आहे. यापूर्वी एका महिला रूग्णाचा अहवाल 14 आणि 15 दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. ही महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे आणि एक बाधीत 35 वर्षीय युवक हा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल होता. या (35 वर्षीय) युवकाचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. दरम्यान पुष्पगुच्छ देउन या युवकाला काल दि.१८. डिस्चार्ज देण्यात आला.पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग आपली भूमिका समर्थपणे पार पाढत असले तरी जिल्हावरचे रेड झोनचे सावट दूर होणार की नाही हे आत्ता येणारा काळच ठरवेल.
रविवार, १९ एप्रिल, २०२०
कोरोना :- साताऱ्यात दोन नवे रुग्ण
शनिवार, १८ एप्रिल, २०२०
कुंभारगाव: अतिउत्साही तरूणाई सावधान नाहीतर खावी लागणार जेलची हवा.
कुंभारगाव,मान्याचीवाडी ;
कोरोना व्हायरसमुळे केंद्र शासनाकडून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, अतिउत्साही तरूण कुंभारगाव भागातील नागरिकांकडून लॉकडाऊनची ऐशी-तैशी केली जात असल्याचे दृश्य आज शनिवारी पहायला मिळाले.त्यामुळे पोलिस प्रशासनाने रस्त्यावर फिरणार्या नागरिकांसह वाडीवस्ती भागातील अतिउत्साही तरूणाईला लाठी प्रसाद दिलेला आहे तरी काही सुधारणा होत नाही म्हणून विनाकारण फिरण्याऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करणार कोणाचीही गय करणार नाही असा इशारा ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी कुंभारगाव मान्याचीवाडी येथे बोलताना दिला आहे. पोलिसांनी आणखीन कडक पवित्रा घेतला आहे.कुंभारगाव परिसरातील तरूणाईसह ज्येष्ठांना देखील कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचे पहायला मिळत आहे.
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
अबब... 150 ची बाटली 400 ते 500 रुपयाला
जिल्हा लॉकडाऊन...? मग, दारूसाठा आला कोठून?
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असले, तरी सार्यांनाच समान न्याय या तत्त्वाचा काहीसा विसर पडल्याचे दिसून येते. शहर, जिल्ह्यात नेमका हाच विषय सार्यांनाच खटकणारा आहे. लॉकडाऊनमुळे औषधे दुकाने वगळता सर्वच व्यवहार ठप्प आहेत. हॉटेल्स, बार, परमिट रूम, वाईन शॉपी एव्हाना गावठी दारूची अड्डेही शंभर टक्के बंद असताना दारू तस्करांकडे देशी, विदेशी दारूचा जिल्ह्याला पुरेल एवढा दारूसाठा आला कोठून, हा सामान्यांचा सवाल आहे.
कुंभारगाव,चाळकेवाडी ; श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वतीने मोपत मास्क वाटप
बुधवार, १५ एप्रिल, २०२०
सातारा ; तीन नवे कोरोना रुग्ण
कराड तालुक्यातील मुंबईहून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकास कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ओगलेवाडी परिसरातील रेल्वे विभागाच्या एका कर्मचाऱ्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
तळमावले ; लोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम
शनिवार, ११ एप्रिल, २०२०
सातारा : अत्यावश्यक सेवेची दुकाने ठरविक वेळेपुरती चालू राहणार
सातारा ; कोरोना विषाणूचा वाढत असणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सातारा जिल्हात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातीलआत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील तर अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावानंतर अत्यावश्यक सेवेची चालू ठेवलेली सर्व दुकाने . किराणा सामान, दुध, औषध दुकाने, कृषि सेवा केंद्रे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दि. 11 एप्रिल पासून पुढील आदेश मिळेपर्यंत रोज सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, व सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतच चालू राहतील. तथापि भाजीपाला विक्री केंद्रे फक्त सकाळी 8 ते 11 या वळेतच चालू राहतील. भाजीपाला केंद्रे संध्याकाळी चालू राहणार नाहीत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, दंड प्रक्रीया संहिताचे कलम 144, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.
काळगाव ; धामणी येथील युवकांकडून रक्तदान शिबीराचे आयोजन
मुंबई : लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढला
मुंबई ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीत आणि उपाययोजनांबाबत माहितीही घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याची घोषणा केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना, कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवले तसेच यापुढेही दाखवा,असे आवाहन केले
कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातील संख्या वाढलेली आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार आहे. आपण जेव्हा या रोगाच्या तपासण्या सुरु केल्या, तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतील देशांना बंदी होती. पण यादीत जे देश नव्हते त्यातील रुग्ण राज्यात मिसळले.आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत, ते भाग सील केले आहेत. आपल्याला जे रुग्ण सापडले आहेत, त्यांची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करत आहे. आता रुग्ण समोरुन येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजारांवर गेली आहे.
दुर्दैवाने कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, ती संख्या देखील वाढत आहे. ज्यांचे वय जास्त आहे त्यांना धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर कोरोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिलला पुढील लॉकडाऊनची रुपरेषा सांगणार असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.
कराड ; 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु
सातारा : कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल असणाऱ्या 54 वर्षे पुरुष या कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पहाटे 5 वाजता मृत्यु झाला आहे.
ही व्यक्ती मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करीत होता. तो 21 मार्च रोजी त्याच्या गावी आला. दि.30 मार्च रोजी त्याला खोकल्याचा त्रास सुरु झाला. 5 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल करण्यात आले होते.
6 एप्रिल रोजी त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता व अहवालानुसार दि.7 एप्रिल रोजी हा रुग्ण कोविड-19 बाधित पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.
या कोरोना बाधित 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु हा प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
शुक्रवार, १० एप्रिल, २०२०
शेताची ही हाक मला सतत कानी येत असते : खा.श्रीनिवास पाटील
तसेच कारखाने, मोठमोठी ऑफीसेस असं सगळं इथून तिथपर्यंत बंद आहे. उद्योजक, कामगार, गरीब, श्रीमंत असे सर्वजण घरातच आहेत. या काळात हा जगाचा पोशींदा आज सर्वांचा खऱ्या अर्थाने तारणहार झालाय. या कठीण काळात देखील आपण उपाशीपोटी नाही याचे श्रेय सर्वस्वी शेतकरी बांधवांचं आहे. एकीकडे वैद्यकीय व पोलीस यंत्रणा कोरोनाशी लढत असताना दुसरी बाजू बळीराजाने आपल्या मजबूत खांद्यावर टिकवून ठेवली आहे. म्हणूनच आपण शेती,माती आणि शेतकरी बंधू भगिनींप्रती कृतज्ञ असायलाच हवं. बळीराजाला शतशः वंदन”.
दरम्यान श्रीनिवास पाटील हे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र आहेत. दोघेही शेतकऱ्याची मुल असल्याने दोघांनाही शेतीबाबत प्रेम आहे. शरद पवारांना तर शेतीतली खडांंखडा माहिती असल्याने पवारांची महती ही कृषीतज्ञाला काही कमी नाही. मात्र त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील हे देखील शेतीत पारंगत असल्याचं आल त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे समोर आल आहे.
गुरुवार, ९ एप्रिल, २०२०
तळमावले ; स्पंदन ट्रस्ट तर्फे पोलीसांना मास्क वाटप
बुधवार, ८ एप्रिल, २०२०
तळमावले : मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले.यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत
राज्यात कोरोनाने (कोविड-19) थैमान घातले असून, त्याचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आजाराने महाराष्ट्रात काही जणांचे बळी गेले आहेत. या लढाईत सर्वांनी एकत्र येण्यासह मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
या पार्श्वभूमीवर फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले या संस्थेच्या वतीने कोरोनाविरोधातील लढाईसाठी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश गृह राज्यमंत्री मा.नामदार शंभूराज देसाई (साहेब) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संस्थापक/चेअरमन मा.अनिल निवृत्ती शिंदे(दादा),संचालक शिवाजी देसाई,महेश कोकाटे,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण,ओंकार शिंदे,संस्थेचे व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर,उपव्यवस्थापक शरद शिंदे,सुहास इंगळे उपस्थित होते
पारनेर : ग्रुप "ऍडमिन'सह तिघांना अटक, फेक मेसेज फिरवला
पारनेर ः सोशल मीडियावरून कोरोनाविषयाची खोटी माहिती पसरविल्याच्या आरोपावरून नांदूर पठार व पिंपळगाव रोठा येथील सोशल मीडियावरील एका ग्रुपच्या "ऍडमिन'सह तीन जणांना पारनेर पोलिसांनी अटक केली. हवालदार भालचंद्र दिवटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे."कोरोनाची लागण झालेली एक व्यक्ती गारगुंडी, अक्कलवाडी, वडगाव दर्या, पिंपळगाव रोठा परिसरात फिरत आहे. तो जवळ येऊन बोलतो, मला पाणी द्या किंवा आजची रात्र तुमच्याकडे मुक्काम करू द्या, असे म्हणतो, अंगावर थुंकतो तरी सावध व सतर्क राहा,' असा मेसेज नांदूर पठार येथील दत्ता भाऊ फ्रेंड सर्कल या व्हॉट्सऍप ग्रुपवर रविवारी (ता. ०५) रोजी टाकण्यात आला होता. त्यामुळे जनतेत भीती पसरविल्याबद्दल, तसेच अफवा पसरविली म्हणून हा मेसेज टाकणारे मनोज जगताप (रा. पिंपळगाव रोठा), किरण बोंटे व ग्रुप ऍडमिन दत्तात्रय आग्रे (दोघे रा. नांदूर पठार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे.
दिलासादायक : साताऱ्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण कोरोनामुक्त दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह
दरम्यान, सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत ६ कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील एकजणाचा इतर आजारातून मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी घरातून अनावश्यक कारणाकरता बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मंगळवार, ७ एप्रिल, २०२०
चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘पेपर कटींग आर्ट’ मधून साकारले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पोट्रेट
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्रात लॉकडाऊन हटणार की नाही : वाचा सविस्तर
सध्या लोकांमध्ये अफवा पसरत आहेत की पाच दिवसांचा ब्रेक असेल मग लॉक डाऊन परत सुरू होईल, आता लॉक डाऊन हटणार नाही जोपर्यंत कोरोनाचा एकही पेशंट राहत नाही. WHO च्या नावाने अनेक खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊन हटणार की नाही हे बोलताना सांगितले की १५ एप्रिलनंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार असं कुणीही गृहीत धरू नये.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की १० एप्रिल नंतर लॉकडाऊन उठवायचा का या प्रक्रियेवर चर्चेला सुरवात होणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. अशात दिवसागणिक महाराष्ट्र आणि मुख्यत्वे मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
एवढे सगळे सांगितल्यावर लॉक डाऊन वाढणार असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जोपर्यंत सरकारचा कुणी अधिकृत व्यक्ती लॉक डाऊन विषयी सांगत नाही तोपर्यंत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
सोमवार, ६ एप्रिल, २०२०
सातारा : कॅलिफोर्नियावरुन आलेल्या रुग्णाचा मृत्यू जिल्ह्यातील पहिला बळी
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या ६३ वर्षीय पुरुषाचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४६ झाली आहे आज पहााटे मृत्यू झालेल्या रुग्णाला १४ दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल पुुन्हा तपासणी केली असता तपासणीत या रुग्णाचे निगेटिव्ह आले होते. मात्र आज पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी ठरला. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतची माहिती दिली.
सातारा : ४ था कोरोना पोझिटिव्ह रुग्ण
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६९० वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही ४ वर पोहोचली असून आज एका ४५ वर्षीय रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे.
काल 4 एप्रिल रोजी कोरोना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांपैकी एका 54 वर्षीय पुरुष नागरिकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याचबरोबर 31 वर्षीय युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुणे एन.आय.व्ही यांनी कळविले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण 4 झाली असून आज सातारा येथे 4 व कराड येथे 7 अनुमानित नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारच्या ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर, मुंबई येथे मागील १४ वर्षापासून खाजगी कारचालक म्हणून एकटा राहत होता. ८ मार्च २०२० रोजी टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असुन त्यावर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. या कोराना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासितांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
रविवार, ५ एप्रिल, २०२०
थुंकी लावून फळे विकणाऱ्या माथेफिरूला अटक
मध्यप्रदेश मधील एक फळ विक्रेता थुंकी लावून फळे विकत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सत्य असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा फळ विक्रेता मध्य प्रदेशातील रायसेन येथील असून त्याचे नाव शेरू मियां आहे.
संबंदित पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश सिंह सिद्धू यांच्या माहितीनुसार हा फळ विक्रेता शेरू यांचे कुटुंबीय त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगत आहेत.
शेरू यांच्या विरोधात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. यानुसार केलेल्या तपासात हा व्हिडिओ खरा असल्याचे सिद्ध झाले आहे. फळांना थुंकी लावण्याचे हे प्रकरण 16 फेब्रुवारीचे आहे. शेरू यांची मुलगी सांगते, की तीच्या वडिलांची मानसिक स्थिती ठीक नाही. एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा संबंध कोरोनाशी जोडला जात आहे. शेरू मियांचा हा व्हायरल व्हिडियो सर्वप्रथम 16 फेब्रुवारीला टिकटॉक घेणाऱ्या दीपक नामदेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.
तळमावले : शिवसमर्थ’ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ‘लाख’ मोलाची मदत
शनिवार, ४ एप्रिल, २०२०
राज्यात 'कोरोना'चे ४७ नवीन रूग्ण आढळल्याने 'टेन्शन' वाढले
महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुटलं.. 22 हजार महिला होणार विधवा; सोशल मीडियावर अफवा
कोल्हापूर, 4 एप्रिल: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अपवा पसरवल्या जात आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई बद्दल अशीच एक अफवा पसरली आहे.
'अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटलं असून त्या मंगळसूत्रातील 22 हजार मनी हरवले आहेत. त्यामुळे 22 हजार महिला विधवा होणार आहेत. मात्र त्यावर एक उपाय आहे. तो म्हणजे महिलांनी एक दोरा घेऊन तो पिवळा करून त्याच्यावर हळकुंड बांधून तो नवऱ्याकडून गळ्यात बांधवा, असा उपाय पुजाऱ्यांनी सांगितला आहे.' अशा अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. याबाबत अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही अफवा असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.
दरम्यान, हा संदेश ज्या कुणी तयार करुन सोशल मीडियात पसरवा आहे. त्यांनी हेतू पुरस्तर समाजात भीती पसरवली, श्रीपुजकांबद्दल गैरसमज पसरवणे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
नवी मुंबई : खारघर CRPF च्या आणखी सहा जवानांना कोरोना
नवी मुंबई - शहरातील खारघर भागात असलेल्या CRPF च्या आणखी सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली असून नव्या रुग्णांची भर पडल्याने आता खारघर येथे तैनात असलेल्या CRPF च्या एकूण ११ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, CRPF च्या १४६ जवान व अधिकाऱ्यांना काल रात्री उशिरा महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील सहा जणांची चाचणी कोरोना पॉसिटीव्ह आली असल्याचं समजलं आहे.
दरम्यान केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांसाठी प्रशासनातर्फे एमजीएम हॉस्पिटलमध्ये दोन स्वतंत्र विंग तयार करण्यात आले असूनआवश्यक असणा-या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या जवानांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आलेत.
गुरुवार, २ एप्रिल, २०२०
कराडमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण
महाराष्ट्रत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आज २४२ वर पोहोचला आहे. अशातच कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ३ वर पोहोचली आहे.
दि. १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एक पुरु्ष रुग्णाचा (वय ३५ वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
सदर कोरोना बाधित व्यक्ती मुंबईहून गावाकडे आल्याची माहिती मिळत आहे. गेले काही दिवस सदर व्यक्ती गावीच राहत होता. त्यामुळे आता संपर्कात आलेल्यांची प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तळमावले : कपडे शिवणारे हात मास्क बनवतात तेव्हा..
मुंबई : "कोरोना" मानखुर्द महाराष्ट्रनगर रामभोरोस
बुधवार, १ एप्रिल, २०२०
पारनेरमध्ये एक हजारजण होम क्वॉरंटाईन
पारनेर - तालुक्यात परदेशवारी करून आले 21, राज्याच्या बाहेरून 197 तर जिल्ह्याच्या बाहेरून 16 हजार 249 जण आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागाने तब्बल सुमारे तीन हजार 967 लोकांना होमक्वॉरोंटईन केले आहे. या लोकांनी आपआपल्या घरातच व तेही स्वतंत्र विलगीकरण कक्षात थांबावे, असा सल्ला त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यात एक मार्च ते 28 मार्च अखेर सुमारे 17 हजार 93 लोक तालुका , जिल्हा , राज्य तर काही परदेश वारी करूण आले आहेत. यात तालुक्याच्या बाहेरून आलेल्यांची संख्या अवघी 542 आहे तर जिल्हयाबाहेरून तसेच राज्य व परदेश वारी केलेल्यांची संख्या त्या मानाने मोठी आहे.या आकडेवारीत अजूनही भर पडणार आहे कारण अजूनही काही गावातील हा सर्वे करणे बाकी आहे.
तालुक्यातील अळकुटी, भाळवणी, निघोज, पळवे खुर्द, कान्हूर पठार, रूई छत्रपती व खडकवाडी अशी सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांच्या मदतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. आज अखेर तालुक्यातील तीन हजार 967 लोकांना होमकोरोंटाईन केले आहे. त्यांनी स्वतःहून घराच्या बाहेर पडू नये असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे. मात्र, यातील कोही लोक घराबाहेर पडताना दिसत आहे मला काहीच झाले नाही.
या भावनेतून अनेक ठिकाणी ही मंडळी जाताना आढळतात. मात्र जर कदाचित यातील एखादा व्यक्ती पॉजिटिव्ह निघाली तर त्याचा तालुक्ाला मोठा धोका आहे. तालुक्यातील ज्या लोकांना होमकोरोंटाईन केले आहे त्यांनी 14 दिवस आपली स्वताःची काळजी घ्यावी घराबाहेर पडू नये घरातही वेगळे थांबावे, स्वताःचे, कुटुंबाचे व समाजाचेही रक्षण करावे.
- डॉ. प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी.
साताऱ्यातील 11 तर कराडमधील चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह
करोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल झालेले साताऱ्यातील 11 व कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील 4 अशा पंधरा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात करोनाचे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या सातारा जिल्ह्यातील अनुमानित अकरा जणांचा ररिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
अनुमानित रुग्ण म्हणूनत्यांना दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्यातील 'एनआयव्ही'कडे तपासणीकरीता पाठविण्यात आले होतो. परदेशातून प्रवास करुन आलेले सात प्रवाशी, इस्लामपूर येथील करोना रुग्णाच्या संपर्कात आलेले दोन व इतर दोन असे एकूण 11 जणांचे आणि कराड - येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये करोना अनुमानित म्हणून उपचारासाठी दाखल झालेल्या चारही रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पाटण : माजी सरपंचाच्या घरातच शिरला बिबट्या
मारुलहवेली, ता. पाटण :
येथील माजी सरपंच नितीन शिंदे यांच्या घरात सोमवारी रात्री बिबट्या शिरल्याची माहिती सारंग पाटील यांना मिळाल्यावर त्यांनी याची माहिती वन विभागाला आणि रोहन भाटे यांना दिली. भाटे यांनी परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे व जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांना माहिती दिली.
हाडा यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जायला सांगितल्यावर ते शिंदे यांच्या घराच्या परिसरात दाखल झाले. त्यावेळी घराच्या पोटमाळ्यावर बिबट्या बसलेला दिसला. त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, त्यात न सापडता बिबट्या पसार झाला.
रोहन भाटे, परिक्षेत्र वनाधिकारी काळे, वनरक्षक रमेश जाधवर, सौरभ लाड हे पिंजरा, वाघर व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.बिबट्या सापळ्यात येत नसल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महादेव मोहिते यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडील प्राण्यांना बेशुद्ध करण्याची बंदूक मागवण्यात आली. कोल्हापूर येथून वन विभागाचे डॉ. वाळवेकर व पथक बोलाविण्यात आले. मध्यरात्री दोन वाजता डॉ. वाळवेकर यांनी बिबट्याला इंजेक्शन मारले. मात्र, तो बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर अनेक प्रयत्न करण्यात आले.
एक इंजेक्शन बिबट्याच्या उजव्या पायाच्या मांडीत लागले. पुन्हा दीड तासाने तेथेच इंजेक्शन लागले. मात्र, तरीही बिबट्या बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वाघर कौलावर अंथरुन त्या खालची कौले काढण्यात आली. त्याच वेळी बिबट्याने कौले काढलेल्या ठिकाणावरून पत्र्यावर आणि तेथून शेतात उडी मारून तो पसार झाला. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भागात पिंजरे लावण्यात आले आहेत. नितीन शिंदे, प्रकाश पाटील, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, डॉ. वाळवेकर व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...