महाराष्ट्रत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आज २४२ वर पोहोचला आहे. अशातच कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ३ वर पोहोचली आहे.
दि. १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एक पुरु्ष रुग्णाचा (वय ३५ वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
सदर कोरोना बाधित व्यक्ती मुंबईहून गावाकडे आल्याची माहिती मिळत आहे. गेले काही दिवस सदर व्यक्ती गावीच राहत होता. त्यामुळे आता संपर्कात आलेल्यांची प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा