गुरुवार, २ एप्रिल, २०२०

तळमावले : कपडे शिवणारे हात मास्क बनवतात तेव्हा..

कपडे शिवणारे हात मास्क बनवतात तेव्हा..
तळमावले/वार्ताहर
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूमुळे सर्वजण आपाआपल्या घरी आहेत. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लाॅकडाऊन केला आहे. काही अपवाद वगळता सर्वत्र शांततेत लाॅकडाऊन पाळण्यात येत आहे. याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. महिला आपल्या घरगुती कामात मग्न आहेत.
घरात शिलाई मशीन असणाÚया स्त्रिया मशीन वर आपला वेळ घालवत आहेत. कुंभारगाव येथील सौ.सुवर्णा अनिल देसाई या एक कुशल महिला शिलाई कारागीर आहेत. त्यांनी काही वर्षापासून आपल्या परिसरातील महिला, मुली यांना मशीन क्लास अत्यंत अल्प दरात शिकवला आहे.
अनेक मंडळे यामध्ये जावून देखील त्यांनी महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी शिलाई मशीनची शिबीरे घेतली आहेत. त्यातून अनेक महिला स्वयंपूर्ण झाल्या आहेत.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागात अजूनही मास्क मिळत नाहीत. आणि जरी उपलब्ध असले तरी ते अत्यंत महागडे आहेत. ग्रामीण भागातील लोक ते विकत घेूव शकत नाहीत. यामुळे सदर मास्क आपल्याला करता येतील का याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. या कल्पनेला मुर्त स्वरुप शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनामुळे आले. त्यांनी यासाठी मास्कचे कापड, लेस व इतर आवश्यक साहित्य त्यांना पुरवले. सौ. सुवर्णा देसाई यांनी या कापडाच्या माध्यमातून मास्क तयार करण्यास सुरुवात केली. मास्क हा शिलाईमधील नवीन प्रकार असला तरी सौ. देसाई यांना शिलाई कामाची आवड आणि कुटूंबियांची मिळणारी साथ यातून त्यांनी मास्क शिवायला सुरुवात केली.
घरातील दैनंदिन कामे केल्यानंतर फावल्या वेळेत त्या मास्क शिवण्याचे काम करतात. या वेळेत सुमारे 100 ते 150 मास्क त्या शिवतात. या मास्कना परिसरातून चांगली पसंतीदेखील मिळत आहे. सौ.सुवर्णा देसाई यांचे शिलाई कौशल्य यातून दिसून येते. मास्क शिवण्याच्या कामी त्यांना पती अनिल देसाई, मुलगी निशा देसाई, मुलगा शंभूराज देसाई हे मदत करत असतात. सदर मास्क हे ग्रामीण शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या वतीने मोफत वितरित करण्यात येणार आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

सध्याचे वातावरण पाहता शासनाचे दिलेल्या सुचनांचे पालन करुन समाजासाठी आपल्याला काही करता येईल का? अशी भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकांना वापरता येतील असे अल्पदरातील मास्क आपण करावे असा निश्चय केला आािण त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे साहेब यांनी ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे.
-सौ.सुवर्णा देसाई

२ टिप्पण्या:

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...