सोमवार, ६ एप्रिल, २०२०

सातारा : ४ था कोरोना पोझिटिव्ह रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६९० वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही ४ वर पोहोचली असून आज एका ४५ वर्षीय रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे.

काल 4 एप्रिल रोजी कोरोना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांपैकी एका 54 वर्षीय पुरुष नागरिकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याचबरोबर 31 वर्षीय युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुणे एन.आय.व्ही यांनी कळविले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण 4 झाली असून आज सातारा येथे 4 व कराड येथे 7 अनुमानित नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारच्या ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर, मुंबई येथे मागील १४ वर्षापासून खाजगी कारचालक म्हणून एकटा राहत होता. ८ मार्च २०२० रोजी टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असुन त्यावर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. या कोराना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासितांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...