रविवार, ५ एप्रिल, २०२०

थुंकी लावून फळे विकणाऱ्या माथेफिरूला अटक

मध्यप्रदेश  मधील  एक फळ विक्रेता थुंकी लावून फळे विकत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सत्य असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा फळ विक्रेता मध्य प्रदेशातील रायसेन येथील असून त्याचे नाव शेरू मियां आहे.

संबंदित पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश सिंह सिद्धू यांच्या माहितीनुसार हा फळ विक्रेता शेरू यांचे कुटुंबीय त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगत आहेत.

यामुळे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिसांनी शेरूविरोधात कलम 269 आणि कलम 270 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शेरू यांच्या विरोधात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. यानुसार केलेल्या तपासात हा व्हिडिओ खरा असल्याचे सिद्ध झाले आहे. फळांना थुंकी लावण्याचे हे प्रकरण 16 फेब्रुवारीचे आहे. शेरू यांची मुलगी सांगते, की तीच्या वडिलांची मानसिक स्थिती ठीक नाही. एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा संबंध कोरोनाशी जोडला जात आहे. शेरू मियांचा हा व्हायरल व्हिडियो सर्वप्रथम 16 फेब्रुवारीला टिकटॉक घेणाऱ्या दीपक नामदेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...