मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

महाराष्ट्रात लॉकडाऊन हटणार की नाही : वाचा सविस्तर

सध्या लोकांमध्ये अफवा पसरत आहेत की पाच दिवसांचा ब्रेक असेल मग लॉक डाऊन परत सुरू होईल, आता लॉक डाऊन हटणार नाही जोपर्यंत कोरोनाचा एकही पेशंट राहत नाही. WHO च्या नावाने अनेक खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊन हटणार की नाही हे बोलताना सांगितले की १५ एप्रिलनंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार असं कुणीही गृहीत धरू नये.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की १० एप्रिल नंतर लॉकडाऊन उठवायचा का या प्रक्रियेवर चर्चेला सुरवात होणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. अशात दिवसागणिक महाराष्ट्र आणि मुख्यत्वे मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

या रुग्णांमध्ये रोज वाढ देखील होतेय, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारसाठी महाराष्ट्रात कोरोना लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेणं अडचणीचं झालंय.

एवढे सगळे सांगितल्यावर लॉक डाऊन वाढणार असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जोपर्यंत सरकारचा कुणी अधिकृत व्यक्ती लॉक डाऊन विषयी सांगत नाही तोपर्यंत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...