बुधवार, १ एप्रिल, २०२०

पाटण : माजी सरपंचाच्या घरातच शिरला बिबट्या

मारुलहवेली, ता. पाटण :

येथील माजी सरपंच नितीन शिंदे यांच्या घरात सोमवारी रात्री बिबट्या शिरल्याची माहिती सारंग पाटील यांना मिळाल्यावर त्यांनी याची माहिती वन विभागाला आणि रोहन भाटे यांना दिली. भाटे यांनी परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे व जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांना माहिती दिली.

हाडा यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जायला सांगितल्यावर ते शिंदे यांच्या घराच्या परिसरात दाखल झाले. त्यावेळी घराच्या पोटमाळ्यावर बिबट्या बसलेला दिसला. त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, त्यात न सापडता बिबट्या पसार झाला.

रोहन भाटे, परिक्षेत्र वनाधिकारी काळे, वनरक्षक रमेश जाधवर, सौरभ लाड हे पिंजरा, वाघर व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.बिबट्या सापळ्यात येत नसल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महादेव मोहिते यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडील प्राण्यांना बेशुद्ध करण्याची बंदूक मागवण्यात आली. कोल्हापूर येथून वन विभागाचे डॉ. वाळवेकर व पथक बोलाविण्यात आले. मध्यरात्री दोन वाजता डॉ. वाळवेकर यांनी बिबट्याला इंजेक्‍शन मारले. मात्र, तो बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर अनेक प्रयत्न करण्यात आले.

एक इंजेक्‍शन बिबट्याच्या उजव्या पायाच्या मांडीत लागले. पुन्हा दीड तासाने तेथेच इंजेक्‍शन लागले. मात्र, तरीही बिबट्या बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वाघर कौलावर अंथरुन त्या खालची कौले काढण्यात आली. त्याच वेळी बिबट्याने कौले काढलेल्या ठिकाणावरून पत्र्यावर आणि तेथून शेतात उडी मारून तो पसार झाला. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भागात पिंजरे लावण्यात आले आहेत. नितीन शिंदे, प्रकाश पाटील, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, डॉ. वाळवेकर व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...