मंगळवार, ३१ मार्च, २०२०

मुलगी परदेशातून परतल्याची माहिती डॉक्टरनी लपवली,रुग्णालय केलं सील


पनवेल | कोरोनाची लागण झाली आहे किंवा प्रवास करुन आले असले तरी त्या लपवण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. असाच आणखी एक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. साई बाल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेश मोहिते यांनी त्यांची मुलगी अमेरिकेतून परत आली होती हे लपवले. त्यामूळे पोलिसांनी त्यांचे रुग्णालय सील करण्यात आले आहे.

नवीन पनवेलमधील सेक्टर-१९ मध्ये साई बाल रुग्णालय आहे. हे रुग्णालय डॉक्टर महेश मोहिते चालवतात. त्यांची कन्या अमेरिकेहून परत आली होती. त्यामूळे शासनाच्या निर्देशानुसार तीने १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये राहणे आवश्यक होते. परंतू, तसे केले नाही तसेच मुलीच्या सानिध्यात असतानाही त्यांनी रुग्णालयात लहान मुलांवर उपचार केले होते.

याची माहिती कळताच पनवेल मगापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नोटीस पाठवत रुग्णालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, त्यांनी कोणकोणत्या लहान बाळांवर उपचार केले आणि कोणाच्या संपर्कात आले याची माहिती पोलिस घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...