सातारा जिल्हा बनतोय रेड झोन ?
मागील काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 6 होती नंतर काही दिवस एकही रुग्ण सातारा जिल्ह्यात सापडला नाही मात्र त्यानंतर दि.15 रोजी एकाच दिवसात 4 नवीन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती परंतु अचानक जिल्ह्यातील संख्या वाढून 11 वरती गेल्याने सातारा जिल्हा रेड झोनमध्ये जाण्याची भीति व्यक्त करण्यात आली होती.त्यातच दि.19 रविवारी अचानक कराड तालुक्यातील दोन तरूणांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले आहेत. कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने साताऱ्याची वाटचाल रेड झोनच्या दिशने निघाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्गीत रूग्णांची संख्या एकूण 13 झाली आहे. यापूर्वी एका महिला रूग्णाचा अहवाल 14 आणि 15 दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. ही महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे आणि एक बाधीत 35 वर्षीय युवक हा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल होता. या (35 वर्षीय) युवकाचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. दरम्यान पुष्पगुच्छ देउन या युवकाला काल दि.१८. डिस्चार्ज देण्यात आला.पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग आपली भूमिका समर्थपणे पार पाढत असले तरी जिल्हावरचे रेड झोनचे सावट दूर होणार की नाही हे आत्ता येणारा काळच ठरवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा